शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

पहिल्या-वहिल्या महिला सैन्यतुकडीचा निर्माता, गणनायक गणाधिपती!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: October 13, 2020 7:30 AM

'दुसऱ्यावर विसंबला, त्याचा कार्यभाग बुडाला' या समर्थवचनाप्रमाणे, आपल्या अब्रुरक्षणासाठी अन्य कोणी येऊन आपली मदत करेल, हा विचार सोडून द्या.

ठळक मुद्देदरदिवशी अनेक प्रकारचे असूर भेटणार आहेत. त्यांच्याशी प्रतिकार करण्यासाठी युद्धकलेत निपुण व्हा.जे हात सुग्रास मोदक बनवतात, तेच हात जेव्हा स्वसंरक्षणार्थ उठतील, त्यादिवशी महानैवेद्य महागणपतीला पोहोचेल.

ज्योत्स्ना गाडगीळ 

स्त्री हे मुळात आदिशक्तीचे रूप आहे. ती प्रसंगी दूर्गा बनते, तर कधी गौरी. स्वसंरक्षणार्थ ती दुसऱ्यांवर विसंबून असते, हा समस्त मानवजातीचा गैरसमज आहे. ती लढवय्यी आहेच, फक्त काळानुकाळ पुरुषी वर्चस्वाखाली दबल्या गेलेल्या स्त्रीला तिच्या आत्मभानाची ओळख करून देणारा श्रीगणेशासारखा धुरंदर सोबत हवा! गणेपुराणातील एक कथा, महिलांच्या पहिल्या वहिल्या सैन्यतुकडीची माहिती करून देते. अर्थात, त्या तुकडीचा नायक होता, गणाधिपती गणनायक!

हेही वाचा: गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा... शक्तीपेक्षा युक्ती वापरून जिंकायला शिकवणारा बाप्पा!

माघ गणेश जन्माच्या वेळी ही कथा आपण अनेकदा ऐकली असेल. नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर आपण या कथेकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहू.

देवांतक आणि नरांतक नावाचे राक्षस, यांनी अनेक वर्षे तपश्चर्या करून देवाधिदेव महादेवांना प्रसन्न करून घेतले. दिवसा किंवा रात्री, देव, दानव किंवा मानव यांच्याकडून आपला वध होणार नाही, असा वर मागून घेतला. भोळ्या महादेवांनी तथास्तू म्हटले. उन्मत्त झालेल्या दोन्ही भावंडांनी जगाला त्राहिमाम करून सोडले. स्वर्ग, मृत्यू, पाताळी आपले साम्राज्य प्रस्थापित करण्यासाठी ते दानवांच्या फौजेसह चाल करून गेले. सगळे देव गणेशाला शरण आले. गणेशाने त्यांना अभय दिले आणि महोत्कट या नावाने ते असूरांशी युद्धाला सामोरे गेले.

कित्येक महिने हे युद्ध सुरू होते. दोघे भाऊ दोन्ही बाजूंनी घनघोर युद्ध करत होते. त्यांना युद्धात अडकवून पराभूत करण्यासाठी भगवान गणेशांनी आपली पत्नी रिद्धी आणि सिद्धी यांना सांगून महिला सैन्याची तुकडी तयार करण्यास सांगितली. महिला आपल्याशी लढा देतील, हा विचारही मनात न आल्याने देवांतक आणि नरांतकाने वर मागताना महिलांचा उल्लेख केलाच नव्हता. त्यांना स्त्रिशक्ती कळावी, म्हणून गणनायकाने स्त्रियांची कुमके तयार करायला सांगितले. आपण युद्धाचे नेतृत्व केले आणि रिद्धी-सिद्धीसह समस्त महिला सैन्याच्या तुकडीबरोबर देवांतक आणि नरांतकाचा दारुण परावभव केला. 

या प्रसंगातून भगवंताने स्त्री जातीवर केवळ विश्वास दर्शवला नसून, त्यांच्या अंगभूत शक्तीला आवाहन केले आहे. 'दुसऱ्यावर विसंबला, त्याचा कार्यभाग बुडाला' या समर्थवचनाप्रमाणे, आपल्या अब्रुरक्षणासाठी अन्य कोणी येऊन आपली मदत करेल, हा विचार सोडून द्या. युद्धकलेत निपुण व्हा. दरदिवशी अनेक प्रकारचे असूर भेटणार आहेत. तुमच्या नजरेतून त्यांना जरब बसायला हवी. तरीही त्यांनी हल्ला केला, तर त्यांच्याशी प्रतिकार करण्याची तुमची तयारी हवी. हाती असलेले पोळपाट लाटणे, प्रसंगी ढाल-तलवारीसारखे फिरवून स्वत:चा बचाव करता आला पाहिजे. 

जे हात सुग्रास मोदक बनवतात, कळीदार पाकळ्या काढतात, साजूक तूप घालून नैवेद्य दाखवतात, तेच हात जेव्हा स्वसंरक्षणार्थ उठतील, त्यादिवशी महानैवेद्य महागणपतीला पोहोचेल. कारण, तोच या महिला तुकडीचा निर्माता आहे.

हेही वाचा: अवघ्या दीनांच्या नाथा, बाप्पा मोरया रे...