शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

Ganesh Chaturthi 2022 : एखाद्या अडचणीमुळे यंदा घरी गणपती बसवता येणार नाही? हा घ्या तोडगा!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2022 1:48 PM

Ganesh Chaturthi 2022: बाप्पाची उपासना हे व्रत आहे. त्यात अडचणी येत असतील तर शास्त्राधार घेऊन मार्ग काढला पाहिजे!

गणपती हे आपल्या सर्वांचे आवडते दैवत. बाप्पा आपल्या घरी यावा, त्याने आपल्याकडचा पाहुणचार घ्यावा असे प्रत्येक भक्ताला वाटते. अनेकदा लहान मुलांच्या आग्रहास्तव घरात गणपती आणण्याची प्रथा नसतानाही गणपती बसवला जातो, परंतु पुढच्या वर्षी उत्साह मावळला, की गणपती बसवणे सक्तीचे वाटू लागते. मग त्यात भक्तीभाव न राहता केवळ सोपस्कार उरतो. असे केल्याने पाप-पुण्याचा प्रश्न उद्भवत नाही, परंतु जी गोष्ट आपल्याला सातत्याने टिकवता येणार नाही, त्याचा दूरदृष्टीने विचार करून सुरुवात करायला हवी. असा पाहुणचार आपल्याला तरी आवडेल का? मग देवाचा तरी अवमान आपण का करावा? हा साधा विचार आपण केला पाहिजे. तसे असले, तरी काही प्रासंगिक अडचणी लक्षात घेता, शास्त्राने कोणती तडजोड सांगितली आहे, ते पाहू.

गणपती बसवणे हा कुळाचार नाही. भाद्रपदातील गणेशाच्या मूर्तीला आपण पार्थिव म्हणतो. तो मातीपासून हातावर बसेल एवढ्याच उंचीचा बनवायचा, त्याची प्राणप्रतिष्ठा करायची, पूजन करायचे व लगेच विसर्जन करायचे. ही मूळ प्रथा होती. भक्तांनी आपल्या सोयीने, उत्साहाने त्यात भर घातली. 

गणपतीचा उत्सव (Ganesh Chaturthi 2022) केला. दोन दिवस, पाच दिवस, दहा दिवस घरी बसवला आणि निरोप दिला. गणपतीनेही भक्तांचा यथाशक्ती केलेला पाहुणचार वेळोवेळी स्वीकारला. एखाद वर्षी कोणाला गणपती बसवणे शक्य झाले नाही, तर त्याच्यावर कधी अवकृपा केली नाही. की कधी भक्तांचा राग धरला नाही, पुढच्या वर्षी तेवढ्याच उत्साहात तो वाजत गाजत आला.

त्यामुळे एक वर्षी गणपती बसवला आणि दुसऱ्या वर्षी खंड पडला आणि पुढेही पडत राहीला तर त्यात कोणतेही पाप लागणार नाही. देवाची क्षमा मागून आपली अडचण सांगून देवाला निरोप दिला, तरी देव आपले अपराध पोटात घेतो. पण म्हणून, देवाला गृहीत धरणेही योग्य नाही. हे व्रत आहे, घेतले तर पाळले पाहिजे, आणि जमणार नसेल तर भक्तीभावाने दोन हस्तक व तिसरे मस्तक जोडून देवाला नमस्कार केला पाहिजे. 

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवGanesh Festival Ritualsगणेशोत्सव विधी