शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांना धक्क्यामागून धक्के; शरद पवारांकडे झुकताहेत नेते, लोकसभेनंतर आता विधानसभेलाही शह!
2
Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 Live: ...तर जबाबदारी माझी; हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी यांनी निकालापूर्वी केले स्पष्ट
3
आजचे राशीभविष्य ८ ऑक्टोबर २०२४; प्रत्येक कार्यात यश मिळण्याची शक्यता
4
कंगना रणौत वादग्रस्त वक्तव्यावरून पुन्हा अडचणीत; कोर्टाने बजावली नोटीस, द्यावं लागणार उत्तर
5
बारामतीनंतर इंदापूरमध्येही मलिदा गँग: शरद पवार; हर्षवर्धन पाटील यांचा शरद पवार गटात प्रवेश
6
जम्मू-काश्मीर, हरयाणाचा आज फैसला, विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी जय्यत तयारी
7
जम्मू-काश्मीर, हरयाणाचा कौल कुणाला? हरयाणा, काश्मीरमध्ये भाजपाचा विजयाचा दावा
8
पंतप्रधान मोदींनी लिहिले ‘गरबा’ गाणे; दुर्गादेवीच्या शक्तीचे वर्णन, सोशल मीडियावर केले शेअर
9
सहकारी संस्था निवडणुका विधानसभेमुळे पुन्हा स्थगित; ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत पुढे ढकलल्या
10
धारावी घोटाळ्यामुळे मुंबई महापालिका निवडणूक नाही; आदित्य ठाकरे यांचा सरकारवर आरोप
11
“जो बोलता है, वो करता है और जो नहीं बोलता, वो...”; देवेंद्र फडणवीसांचे विरोधकांवर शरसंधान
12
निवडणूक आयुक्तपदी कोणाची वर्णी लागणार? महायुतीतील ३ पक्षांमध्ये होईना नावावर एकमत
13
निवडणुकीचे फड रंगले, वातावरण तापले; तासगावात आजी-माजी खासदार भिडले 
14
शिंदे समितीचा अहवाल सादर, धनगड दाखले रद्द; धनगर आंदोलनाला बळकटी देणाऱ्या घटना
15
मुंबईत परवडणाऱ्या घरांची निर्मिती अशक्य, ५० टक्के रक्कम जाते सरकारी तिजोरीत!
16
भुयारी मेट्रोतून १५ हजार मुंबईकरांचा प्रवास; पहिल्याच दिवशी झाली झोकात सुरुवात
17
चेंबूरच्या जळीतग्रस्तांचे दागिने, पैसेही गायब; गुप्ता कुटुंबाच्या नातलगाची तक्रार
18
अवयवांच्या विकासाचे संशोधन ठरले ‘नोबेल’पात्र; व्हिक्टर ॲम्ब्रोस, गॅरी रुवकून यांची निवड
19
आता सर्व पवार कुटुंब तुम्हाला भेटायला लागले, ओळख दाखवायला लागले; बारामतीकरांसमोर अजितदादांची तुफान फटकेबाजी
20
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका

श्रीगणेश चतुर्थी: कलियुगात बाप्पा कोणता अवतार घेणार? गणेश पुराणात केलेय भाकित; वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2023 7:07 AM

Ganesh Chaturthi 2023: बाप्पाच्या कलियुगातील अवताराबाबत गणेश पुराणात काही उल्लेख आढळून येतो, असे म्हटले जाते. जाणून घ्या...

Ganesh Chaturthi 2023: भाद्रपद मासारंभ झाला आहे. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला श्रीगणेश चतुर्थी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यंदा १९ सप्टेंबर रोजी श्रीगणेश चतुर्थी असून, या दिवशी कोट्यवधी घरांत पार्थिव गणपती पूजन केले जाते. विशेष म्हणजे गणेशोत्सवाची सुरुवात मंगळवारी होत असल्यामुळे अतिशय विशेष मानला गेलेला अंगारक योग जुळून येत आहे. या शुद्ध चतुर्थी महासिद्धिविनायकी चतुर्थी मानली जाते. ही चतुर्थी रविवारी किंवा मंगळवारी आल्यास तिचे महात्म्य अधिक असते. याच तिथीला वरद चतुर्थी किंवा शिवा असेही म्हटले जाते. भाद्रपद चतुर्थी साजरी करण्यामागे अनेक पौराणिक कथा मिळतात. महादेव शिवशंकरांनी प्रथम जन्मोत्सव साजरा केला, असे सांगितले जाते. महादेव, श्रीविष्णू यांप्रमाणे गणेशाचेही अनेक अवतार झाले आहेत. कलियुगात कोणता अवतार बाप्पा घेणार आहे? गणपती कधी हा अवतार घेणार? नाव काय असणार? याबाबत गणेश पुराणात काही उल्लेख असल्याचे म्हटले जाते. 

मराठी वर्षात लाडक्या गणपती बाप्पाचे तीन जन्म मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. विविध स्वरुपात गणपतीचे पूजन केले जाते. महादेव शिवशंकर, भगवान विष्णू यांच्याप्रमाणे गणपतीनेही विविध अवतार धारण केल्याच्या कथा पुराणांमध्ये आढळतात. गणपतीच्या वेगवेगळ्या अवतारांपैकी तीन जन्मदिवस अत्यंत महत्त्वाचे मानले आहेत. एक वैशाख पौर्णिमेला पुष्टिपती विनायक जन्म, भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजचे गणेश चतुर्थी आणि माघ महिन्यातील चतुर्थी म्हणजेच गणेश जयंती. पैकी भाद्रपद चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थीपासून पुढे १० दिवस गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. श्रीगणेशाने सिंदूर दैत्यावर विजय मिळवला, तो दिवस भाद्रपद शुद्ध चतुर्थी हाच होता. त्याप्रीत्यर्थ हा उत्सव साजरा करण्यात आला, असेही सांगितले जाते.  (Lord Ganpati Bappa Kaliyug Avatar)

कलियुगात गणपती बाप्पा अवतार घेणार

भगवान विष्णूच्या कल्की अवताराबद्दल विष्णु पुराणात भाकित करण्यात आले आहे, त्याचप्रमाणे गणेश पुराणात सांगितले आहे की, जेव्हा पृथ्वीवर पाप आणि अत्याचार सर्वोच्च शिखरावर असतील, तेव्हा गणेश मनुष्य धर्माचा मार्ग दाखवण्यासाठी अवतार घेतील. जेव्हा तपश्चर्या, यज्ञ आणि शुभ कर्मे करणे बंद होतील. वेळेवर पाऊस न पडल्याने लोक नदीकाठी शेती करू लागतील. जेव्हा लोक लोभामुळे एकमेकांना फसवायला मागेपुढे पाहणार नाहीत. लोभापोटी पैसा कमावण्याच्या नादात विद्वान आणि धार्मिक लोकांना लुबाडले जाईल. दुष्कृत्य करण्यांची हानी होणार नाही. बलवान लोक दुर्बलांना त्रास देत असतील तर या पृथ्वीवरून अन्याय नष्ट करण्यासाठी भगवान गणेशाचा नवा अवतार जन्म घेईल, असे गणेश पुराणात सांगितले असल्याचे म्हटले जाते. (Ganesh Puran Lord Ganesha Kaliyuga Avatar)

कलियुगात देवी-देवतांऐवजी आसुरी शक्तींची पूजा 

गणेश पुराणात असे सांगितले आहे की, कलियुगात अनेक लोक धर्माचा मार्ग सोडून अधर्माच्या मार्गावर जातील किंवा लोक आपली आसक्ती पूर्ण करण्यासाठी देवी-देवतांऐवजी आसुरी शक्तींची पूजा करू लागतील. सर्व दुष्कृत्ये दूर करण्यासाठी गणेशाचा कलियुग अवतार होईल. लोक आपल्या पालकांचा आणि शिक्षकांचा अपमान करू लागले तर अशा दुष्कृत्यांना दूर करण्यासाठी गणेशाला पृथ्वीवर येऊन अवतार घ्यावा लागेल, असे सांगितले जाते. 

गणेश अवताराचे नाव काय असेल?

कलियुगातील गणेशाच्या अवताराचे नाव ‘धूम्रकेतू’ असेल. कलियुगात समाजात पसरलेल्या वाईट गोष्टी दूर करण्यासाठी लोकांना बुद्धी देण्यासाठी गणपती या अवतारात अवतरणार आहेत. असे भाकित गणेश पुराणात केल्याचे सांगितले जाते. - सदर दाव्यांची पुष्टी केली जात नाही. सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जाते.

 

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवGanpati Festivalगणेशोत्सवganpatiगणपतीGanesh Festival Ritualsगणेशोत्सव विधी