Ganesh Chaturthi 2023: काही दिवसांनी भाद्रपद महिना सुरू होत आहे. मात्र, आतापासूनच सर्वांना लाडक्या गणरायाच्या आगमनाचे वेध लागले आहेत. ठिकठिकाणच्या बाजारपेठा गजबजल्या आहेत. गणपतीसाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी करण्याची लगबग सुरू झाली आहे. डेकोरेशनच्या साहित्यापासून ते गणपती पूजनाच्या साहित्यापर्यंत अनेक गोष्टींच्या खरेदीसाठी बाजार पालथे घातले जात आहेत. मात्र, काही वेळेला असे प्रसंग येतात, ज्यानंतर काय करावे हे समजत नाही. तसेच गणपतीच्या प्राणप्रतिष्ठेपासून ते विसर्जनापर्यंत अनेक गोष्टींमध्ये साशंकता असते. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आता ‘लोकमत भक्ती’च्या माध्यमातून मिळणार आहेत.
गणपती, गणेशोत्सवासंदर्भात तुमच्या मनात अनेक प्रश्न, संभ्रम, शंका येत असतील आणि त्याची शास्त्रशुद्ध पद्धतीने, समाधानकारक उत्तरे मिळत नसतील किंवा असे प्रश्न कोणाला विचारावे, असे वाटत असेल, तर ‘लोकमत भक्ती’चा विशेष कार्यक्रम तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त ठरू शकतो. ‘लोकमत भक्ती’च्या ‘शंका समाधान’ या कार्यक्रमात तज्ज्ञ संदीप पटवर्धन मार्गदर्शन करणार आहेत.
कुठे आणि कसा पाहता येईल कार्यक्रम? संपर्क कुठे करावा?
गणपती जसजसे जवळ येतात, असे अनेक प्रश्न मनात उपस्थित होतात. पहिल्यांदाच गणपती बसवायचे तर काय करावे? गुरुजी नाही मिळाले तर गणपती कसे बसवायचे? गणपतीत घरात अचानक काही प्रसंग उद्भवले तर काय करावे? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या कार्यक्रमातून मिळू शकतात. ‘लोकमत भक्ती’चा ‘शंका समाधान’ कार्यक्रम युट्यूब चॅनल, फेसबुक, इन्स्टाग्राम या माध्यमातून पाहता येईल. तसेच तुमचे प्रश्नही विचारता येतील. यासाठी 82912 32354 या क्रमांकावर तुम्हाला संपर्क करावा लागेल. स्टे कनेक्ट...!!!