शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
2
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
3
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
4
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
5
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
6
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
7
चंद्रशेखर यांच्या पक्षाला हरयाणात मोठा झटका; अनेक उमेदवारांना 500 पेक्षाही कमी मते...
8
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
9
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
10
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
11
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
12
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
13
परदेशात जाऊन आपल्या देशाचा अपमान करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला- अमित शाह
14
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
15
'तेरे करके' पेक्षा No Look Shot ची चर्चा; नताशाच्या पोस्टवर 'हार्दिक' कमेंटचं ट्विस्ट
16
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
17
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
18
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
19
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?
20
"हा विजय केवळ मोदीजींमुळेच शक्य झाला"; हरयाणाच्या निकालानंतर मुख्यमंत्री सैनी यांचे विधान

Ganesh Chaturthi 2023: बाप्पा सगळ्यांचा लाडका का? यामागील असंख्य कारणांपैकी 'हे' आहे मुख्य कारण!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2023 11:45 AM

Ganesh Festival 2023: ज्यांना लोकप्रिय व्हायचे असेल त्यांनी बाप्पाचा आदर्श ठेवायला हवा; त्यासाठी वाचा बाप्पाच्या लोकप्रियतेचे कारण!

'आमच्या पप्पांनी गंपती आणला' हे गाणं सध्या प्रत्येकाच्या तोंडी आहे. छोट्याशा मुलाला बाप्पाबद्दल वाटणारं प्रेम घरातल्या बड्या बुजुर्गांनाही वाटते. एकच व्यक्ती, एकच देवता सगळ्यांचीच लाडकी असण्यामागे काय आहे कारण? या प्रचलित कथेतून जाणून घेऊ. गोष्ट माहितीची असली तरी शेवटी त्याचा आशय आणि बाप्पाच्या लोकप्रियतेचे कारण जाणून घेणे महत्त्वाचे!

एके दिवशी सकाळी दोघे जण खेळत बसले होते. आता कोणता नवीन खेळ खेळायचा, याचा ते विचार करू लागले. दोघांना काही सुचेना. मग त्यांनी आईकडे 'खेळ सुचव' म्हणत तगादा लावला. आईला आपली कामे उरकायची होती. बाबा त्यांच्या कामात होते. अशा वेळी दोन्ही मुलांना जास्त वेळ खेळात अडकवून ठेवण्यासाठी आईने दोघांमध्ये स्पर्धा लावली. 'दोघांपैकी जो पहिले पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण करेल, तो विजयी.' 

दोघांनी उत्साहाने माना डोलावल्या. पार्वती मातेने स्पर्धेचा झेंडा उंचावला आणि शर्यतीला सुरुवात करून दिली. कार्तिकेय स्वामींचा मोर तयारीतच होता. त्याच्यावर स्वार होऊन कार्तिकेय स्वामी पृथ्वीप्रदक्षिणेला निघाले. उंदिरराव गणाधिपतींच्या सूचनेची वाट बघत हात जोडून सेवेत बसले होते. मात्र, गणोबाच्या चेहऱ्यावर शर्यत जिंकण्यासाठी कुठलीच घाईगर्दी दिसत नव्हती. उलट, कार्तिकेय दादा बाहेर गेल्यावर ते मोदकपात्र घेऊन एकटे सेवन करायला बसले. पार्वती मातेला हसू आले. तिने विचारलेही, 'गणू, स्पर्धेत हरायचे आहे का?'

'नाही गं आई, स्पर्धा तर मीच जिंकणार, तू नको काळजी करूस. तुझी कामं आवरून घे, मी निवांत मोदक खात बसतो.' 

पार्वती माता, तिच्या कामाला निघून गेली. कार्तिकेय स्वामींची अर्धी पृथ्वी पालथी घालून झाली. गणोबाने सॅटेलाईटच्या मदतीने कार्तिकेय स्वामींचे लोकेशन ट्रॅक केले. 

एव्हाना पार्वती माता आणि देवाधिदेव महादेव आपली कामे उरकून कैलासावर गप्पा मारत बसले होते. दुपारचे भोजन घेण्यासाठी कार्तिकेयाच्या येण्याची वाट बघत होते. गणोबाने पुन्हा एकदा कार्तिकेय दादा कुठवर आलेत, हे तपासून पाहिले. स्पर्धेच्या अटीनुसार पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण करून ते आनंदाच्या भरात कैलासावर येताना दिसले.  

बाप्पाने लगेच उठून बाप्पाने आई-बाबा बसलेल्या आसनाभोवती प्रदक्षिणा मारली आणि त्यांना नमस्कार केला. आपल्याआधी गणोबाला कैलासावर आलेले पाहून कार्तिकेय स्वामी गोंधळले. आपण हरलो, या विचाराने नाराज झाले. तरीदेखील स्पर्धेचा निकाल जाणून घेण्यासाठी त्यांनी मातेकडे विचारणा केली. पार्वती मातेने, महादेवांना निकाल जाहीर करण्यास सांगितले. कैलासावर उपस्थित नंदी महाराज आणि शिवगणदेखील निकाल ऐकण्यास उत्सुक होते. दोन्ही स्पर्धकांकडे आलटून पालटून पाहत, महादेवांनी निकाल जाहीर केला आणि विजेता आहे....बालगणेश!!!

निकाल ऐकून कार्तिकेय स्वामी हिरमुसले, परंतु पुढल्याच क्षणी त्यांनी तावातावाने 'असं कसं, असं कसं' म्हणत विचारणा केली. गणोबाच्या निकालावर शंका उपस्थित केली. आपण किती परिश्रमाने स्पर्धा पूर्ण केली, याचाही हिशोब मांडला. त्यावर शांतपणे उत्तर देत गणोबा म्हणाले, 

'दादा, स्पर्धेच्या नियमाप्रमाणे तू पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केलीस. पण त्यासाठी फार श्रम घेतलेस. प्रत्येक वेळी शक्तीचा उपयोग करून चालत नाही, तर युक्तीनेही काही कामे पार पाडावी लागतात. तू पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण करून येत असल्याचे पाहून मी आपल्या आई-बाबांना प्रदक्षिणा मारली. कारण, आपल्या पालकांमध्ये आपले विश्व सामावले आहे. शिवाय पृथ्वी म्हणजे शक्ती आणि आई ही शक्तीस्वरूप असते. मग तिला प्रदक्षिणा मारली काय किंवा खऱ्याखुऱ्या पृथ्वीला प्रदक्षिणा मारली काय, एकच!'

गणोबाची हुशारी बघून कार्तिकेय स्वामींना हसू आले आणि त्यांनीही आई-वडिलांबरोबर गणोबाला प्रथम येण्याचा मान अर्पण केला. जग जिंकण्याआधी आपल्या आई वडिलांच आणि घरच्यांचं मन जिंकता येणं महत्त्वाचं आहे. त्यांना आदर दिला तर ते आपल्याला शुभाशीर्वाद देतील. त्यांच्या शुभेच्छांच्या बळावर जग जिंकता येते आणि यदाकदाचित जग विरोधात गेले तरी घरच्यांचा भक्कम पाठिंबा असणं हे यशाचं खरं गमक आहे हे बाप्पाने आपल्या कृतीतून दाखवून दिल!

म्हणून समर्थ रामदास स्वामींनीदेखील, मनाचे श्लोक लिहित असताना सर्वप्रथम 'मनाला' बाप्पाच्या हुशारीचा बोध दिला. तोच बोध घेऊन आपणही शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे ध्यानात ठेवून आपल्या आयुष्यातील स्पर्धा जिंकूया. बाप्पा मोरया...! 

गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा।मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा।नमूं शारदा मूळ चत्वार वाचा।गमूं पंथ आनंत या राघवाचा।।

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवGanesh Festival Ritualsगणेशोत्सव विधी