शहरं
Join us  
Trending Stories
1
Haryana Assembly Election Results 2024 हरियाणात भाजपचा विजयी रथ का रोखू शकली नाही काँग्रेस? ही आहेत 5 महत्वाची कारणं
2
अवघ्या २०० दिवसांत 'त्यांनी' सूत्रं हलवली, पुन्हा भाजपाची सत्ता आणून दाखवली! हरयाणातील 'मॅन ऑफ द मॅच' 
3
"भाजपाशी थेट लढाई असते तिथे काँग्रेस कमीच पडते"; ठाकरे गटाच्या प्रियंका चतुर्वेदी यांचा खोचक टोला
4
Haryana Results 2024: भाजपाने हरयाणा जिंकले, पण पाच मंत्री हरले; कोणी केला पराभव?
5
देशातील सर्वात श्रीमंत महिलेला भाजपनं तिकीट नाकारलं, पण अपक्ष म्हणून निवडणूक लढविली अन् जिंकलीही...
6
Haryana Assembly Election Results 2024 : बाजी हातातून निसटताना भाजपाने केली खेळी; हरयाणात या समि‍करणामुळे झाली उलथापालथ
7
Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 Live: जम्मू काश्मीरचा अंतिम निकाल हाती, पाहा कुठल्या पक्षाला किती जागा...
8
जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सची 'बाजी', पण भाजपा 'बाजीगर'; जागा वाढल्या अन्...
9
सूरज चव्हाण बिग बॉस जिंकल्यावर मराठी अभिनेत्री म्हणते, 'छपरीपणा सुरु करायला हवा...'
10
हरियाणातील निकालामुळे राज्यात काँग्रेसवर दबाव?; पृथ्वीराज चव्हाणांनी मांडली भूमिका
11
भाजपची रणनीती कामी आली; हरयाणात 'ऑल इज वेल', शेतकरी-जवान नाराज नाहीत..!
12
"तुम्ही मला मत दिलं, तर मी तुम्हाला चंद्रावर घर देईन", उद्धव ठाकरे असं का म्हणाले?
13
SEBI नं १०० पेक्षा अधिक स्टॉक ब्रोकर्सना पाठवली नोटीस, काय आहे कारण; जाणून घ्या
14
कोण आहेत मेहराज मलिक? ज्यांच्यासाठी अरविंद केजरीवालांचा 'झाडू' चालला; भाजपचा किती मतांनी केला पराभव?
15
जयराम रमेश यांनी डेटा अपडेटमध्ये उशीर केल्याचा आरोप केला; निवडणूक आयोगाने प्रत्येक मिनिटांचे उत्तर दिले
16
Uddhav Thackeray : "गद्दारांना ५० खोके आणि बहिणीला फक्त १५०० रुपये; हा महाराष्ट्रधर्म नाही" - उद्धव ठाकरे
17
ढोल वाजवले, फटाके फोडले; लाडू, जिलेबी वाटली, पण… काँग्रेसच्या उत्साही कार्यकर्त्यांवर नामुष्की 
18
"...हाच आजच्या निवडणूक निकालाचा धडा"; अरविंद केजरीवाल निकालावर काय म्हणाले?
19
ओमर अब्दुल्ला होणार जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री; विजयानंतर फारुख अब्दुल्लांची घोषणा
20
'त्या' लोकांना दहशतवाद्यांसारखी वागणूक द्या; तुषार गांधींची उद्धव ठाकरेंकडे मागणी

Ganesh Chaturthi 2023: गणेश उत्सवाच्या झगमगाटात 'पर्यावरणपुरक गणेशोत्सवाचे' अधिक महत्त्व का? वाचा गणेशाचा भक्तांशी संवाद!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2023 7:00 AM

Ganesh Chaturthi 2023: आपण आपल्या आवडीप्रमाणे गणेशोत्सवाची तयारी करतो, पण बाप्पाला काय आवडते हे जाणून घेता आले तर? असेच एक मनोगत वाचा. 

''बाप्पाच्या आगमनाची सगळी तयारी झाली, तरी राहून राहून काहीतरी मिसिंग आहे, असं मला का वाटतंय? आपला बाप्पा हटके असावा, याच अट्टहासामुळे हे वाटत नसावं ना? केवढा तो मनाचा गोंधळ! सांगायचा कोणाला नि ऐकणार तरी कोण???''

''कोण कशाला? मी ऐकेन ना!'' 

''कोण बोललं? कोणाचा आवाज आहे हा? कोण आहे इथे?''

''अगं वेडे घाबरतेस काय? मी... तुझा बाप्पा! पुढच्या वर्षी लवकर या म्हणत मला भरल्या डोळ्यांनी निरोप दिला होतास ना? आता आलोय तुझ्या भेटीला तर ओळखलं नाहीस?''

''बाप्पा तू ??? तू खरंच आलायस? माझा विश्वासच बसत नाहीये!!! थांब, आपला सेल्फी काढू, मला सगळ्यांना दाखवता येईल. लाईक्स, शेअर, कमेंट्स काही विचारू नकोस! यंदा मला हटके काहीतरी करायचं होतंच, तू येऊन माझी इच्छा पूर्ण केलीस बघ!''

''बंद कर तो मोबाईल आधी, नाहीतर हा मी चाललो!''

'' अरे अरे, थांब रागवू नकोस. हा बघ, केला फोन स्विच ऑफ!!!''

''तुला काहीतरी हटके करायचं होतं  ना? मीच सुचवतो. करशील?'''

'' का नाही? अरे तुझ्याचसाठी एवढा थाट माट केलाय बघ. आणखी काय हवं तू बोल फक्त! लायटिंग्स, डेकोरेशन, फुलांची सजावट, मिठाई, मोदक....''

''हेच सगळं मला नकोय!''

''काय????? तुला हे नकोय? अरे तुला आवडावं म्हणून तर केलं एवढं सगळं!''

''तुमचा भोळा भाव समजू शकतो. तुमचा पाहुणचारही मला आवडतो. पण मला काय आवडतं ते तुम्ही मला दिलं तर मला आणखी आनंद होईल!''

''बाप्पा सांग मी काय करू?''

''बागेतली थोडीशी माती घे आणि त्याची छोटीशी मूर्ती बनव. अगदी तळहाताएवढी. स्वच्छ पाटावर बसायला आसन दे. सोन्याची फुलं, सोन्याच्या दुर्वा मला नको. खऱ्या दुर्वांची जुडी आणि बागेत उन्मळून पडलेली दोन चार फुलंही मला पुरे! तू जेवशील त्याचाच मलाही दे नैवेद्य. कानावर पडू दे तुझ्या आरतीचा मंजुळ सूर आणि शंखाच्या मंगल ध्वनीने कर माझी सकाळ प्रसन्न!तुझ्या मित्र मैत्रिणींना बोलव माझ्या भेटीला. बाप्पा म्हणजे मी काही वेगळा नाही, तुमच्या घरचा पाहुणा. या साध्याशा पाहुणचारानेसुद्धा प्रसन्न होणारा आणि भरपूर आशीर्वाद देणारा. अशा सहवासाने आपल्यातलं सात्विक नातं खऱ्या अर्थाने जपलं जाईल आणि बहरतही जाईल. जड अंत:करणाने मला निरोप देशील तेव्हा माझाही उर भरून येईल. देईन तुला वचन पुनर्भेटीचं, कारण तुझ्या बोलावण्यात असेल प्रेमळ अगत्य!  विसर्जन करतानाही एक गोष्ट लक्षात ठेव, घरच्याच पाण्याच्या बादलीत मूर्तीला निरोप दे. त्या पाण्याचा पुनर्वापर घरच्या बगिच्यात कर, हवं तेव्हा कधीही माझा आठव कर. येईन तुझ्या भेटीला आढे वेढे न घेता, कारण असाच हटके गणेशोत्सव प्रिय आहे मला!

''निसर्ग आणि मनुष्य यांची सांगड घालणाऱ्या या उत्सवाचं मूळ स्वरूप आम्ही विसरलो होतो बाप्पा! तू आठवण करून दिलीस आता तू सांगितलीस तशीच तयारी करणार आणि माझा बाप्पा सगळ्यांपेक्षा हटके असणार!!!'' 

मंगल मूर्ती मोरया! गणपती बाप्पा मोरया!

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवGanesh Festival Ritualsगणेशोत्सव विधीEco Friendly Ganpati Bappaइको फ्रेंडली गणपती 2023