शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
2
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
3
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
4
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
5
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
6
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
7
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
8
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
9
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
10
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
11
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
12
सलमान खानच्या वडिलांना धमकी देणाऱ्या तरुणीसह दोघांना अटक
13
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
14
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
15
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)
16
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात
17
Narendra Modi : "ते आपल्या देवी-देवतांना 'देव' मानत नाहीत...", पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर घणाघात
18
आता मनोज जरांगे यांचा भाऊही आंदोलन करणार, मुख्यमंत्र्यांना भेटून दिला इशारा
19
‘लाडकी बहीण’पेक्षा कांद्याला भाव द्या, भाजपा-काँग्रेसला उखडून फेकायचे दिवस आलेत: बच्चू कडू
20
"धर्माच्या नावाखाली गरिबांच्या पोरांचा बळी देऊ नका", निवृत्ती महाराजांचं कळकळीचं आवाहन, कीर्तन चर्चेत

Ganesh Chaturthi 2024: गणेशोत्सवादरम्यान घरी गजमूर्तीची जोडी आणा; कायमस्वरूपी बाप्पाची कृपा मिळवा!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 7:00 AM

Ganesh Chaturthi 2024: गजानाबरोबर गजलक्ष्मीचेही घरात होईल आगमन; गजमूर्तीची जोडी आणा आणि लाभ मिळवा!

आपले वर्तमान आणि भविष्य कसे असणार आहे, हे आपल्या मेहनतीवर आणि नशिबावर अवलंबून असते.  मेहनत तर आपण करतोच, पण त्याला बाप्पाचे शुभाशीर्वादही मिळावेत म्हणून वास्तुशास्त्र आणि फेंगशुईमध्ये याविषयी अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. फेंगशुईनुसार, अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यांना घरात ठेवल्याने आयुष्य सकारात्मक वळण घेऊ लागते आणि अनेक चांगल्या घटना आयुष्यात घडू लागतात. यामुळे कुटुंबाला आर्थिक बळ तर मिळतेच पण आरोग्यही चांगले राहते. आज जाणून घेणार आहोत गजमूर्ती ठेवण्याचे फायदे.  

श्रीगणेशाची कृपा राहते

शास्त्रांमध्ये हत्तीला यश आणि शांतीचे प्रतीक मानले जाते. असे म्हणतात की हत्तीची मूर्ती ठेवल्याने सर्व मनोकामना लवकर पूर्ण होतात. ज्या घरात हत्तीची मूर्ती असते, त्या घरावर गणेशाची कृपा राहते. हत्ती हे वैभवाचे प्रतीक आहे. पूर्वी राजे महराजे हत्तीच्या अंबारीत बसून स्वारी करत असत. आताच्या काळात हत्ती पाळणे जरी शक्य नसले तरी हत्तीची पितळ्याची किंवा काष्ट अर्थात लाकडाची मूर्ती आपल्याला घरात नक्कीच आणता येईल. त्या मूर्तीमुळे निर्माण होणारी सकारात्मकता तुम्हाला वैभव प्राप्तीकडे नेईल. 

आर्थिक संकटातून सुटका 

जर तुम्ही आर्थिक संकटाशी सामना करत असाल आणि तुमच्या उत्पन्नाच्या तुलनेत तुमचा खर्च वाढत असेल, तर नवीन वर्षात हत्तीच्या दोन मूर्ती आणा. दोन्ही मूर्ती घराच्या मुख्य दारात ठेवा. असे केल्याने नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही आणि कुटुंबात पैशाचा प्रवाह वाढू लागतो.

फेंगशुईमध्ये हत्ती ठेवण्याचे नियम आहेत

लक्षात ठेवा की काळ्या रंगाची हत्तीची मूर्ति कधीही खरेदी करू नका. हा रंग शोक आणि दु:खाचे प्रतीक आहे, ज्यामुळे घरातील इतर सदस्य देखील संकटात सापडतात. त्याऐवजी पांढऱ्या रंगाचा हत्ती खरेदी करणे चांगले मानले जाते. यामुळे कुटुंबात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो. पांढरा हत्ती मिळाला नाही तर राखाडी किंवा तपकिरी रंगाचा हत्ती आणा, मात्र काळा हत्ती आणू नका. 

मूर्तींचे मुख या दिशेला ठेवावे

तुम्ही हत्तींची जोडी खरेदी करत असाल, तर ते एकमेकांसमोर उभे राहणार नाहीत याची काळजी घ्या. असे केले नाही तर घरात कलह आणि भांडणाचे वातावरण निर्माण होते. म्हणूनच त्यांना नेहमी बाजूबाजूला उभे केले पाहिजे. हत्तीची मूर्ती खरेदी केल्यावर ती नेहमी घराच्या उत्तर दिशेला ठेवावी.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव 2024Ganpati Festivalगणेश चतुर्थी २०२४Vastu shastraवास्तुशास्त्र