शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

Ganesh Chaturthi 2024: कधी संधी मिळाली, तर 'या' गुप्त गणेश मंदिराला अवश्य भेट द्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2024 7:00 AM

Ganesh Chaturthi 2024: आपल्या हाकेला बाप्पा धावून येतोच, कधीतरी त्याने हाक न मारताही आपण त्याच्या भेटीला जायला हवं; वाचा या ऐतिहासिक गणेश मंदिराची माहिती!

छत्तीसगड येथील दांतेवाडा जिल्ह्यात ढोलकल डोंगरावर गुप्त गणेश मंदिर स्थित आहे. रायपूर पासून अवघ्या ३५० किलोमीटर दूर दांतेवाडा जिल्हा आहे आणि तिथल्याच एका डोंगरावर विराजमान झाले आहेत श्रीगणेश. यंदा ७ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी आहे. त्यानिमित्त या स्थानाचे महात्म्य जाणून घेऊ. 

३००० फूट उंचारव असलेली ही गणेशमूर्ती ९ व्या शतकात बनवली गेली आहे असे म्हटले जाते. ग्रैनाइटपासून बनलेली ही मूर्ती तीन फूट लांब व साडे तीन फूट रूंद आहे. 

पौराणिक कथा :

असे म्हटले जाते, की भगवान परशुराम आणि गणपतीचे याच डोंगरावर भीषण युद्ध झाले होते. युद्धाचे कारण असे, की भगवान परशुराम यांनी महादेवांकडून तपश्चर्येने भरपूर शक्ती प्राप्त केली होती व त्या शक्तीचा वापर करून ते युद्ध जिंकून आले होते. महादेवांचे आभार मानण्यासाठी ते कैलासावर जात असताना वाटेत गणपती बाप्पाने त्यांना या डोंगरावर अडवले होते. या युद्धात परशुरामांच्या हातातील परशुच्या आघाताने बाप्पाचा एक दात अर्धा तुटला. तेव्हापासून बाप्पाला एक दात पूर्ण आणि दुसरा अर्धा अशीच मूर्ती पहायला मिळते. या युद्धात परशु या शस्त्रामुळे त्या डोंगरावर भेग पडली आणि तेथील खडकही लोखंडी झाले असे म्हणतात. म्हणून त्या डोंगरावरील खडकांना लोखंडी खडक म्हटले जाते. 

रम्य परिसर आणि खडतर प्रवास :

डोंगराच्या माथ्यावर पोहोचायला तुम्हाला ५ किलोमीटरचा खडतर रस्ता चढून पार करावा लागतो. या प्रवासात तुम्हाला घनदाट जंगल, धबधबे, जुने वृक्ष आणि पुरुषभर उंचीची वारूळे नजरेस पडतात. या प्राचीन मंदिराचा शोध १९३४ मध्ये एका परदेशी भौगौलिक अभ्यासकाने लावला होता. त्यानंतर अलीकडे २०१२ मध्ये दोन पत्रकार ट्रेकिंग करत तिथे पोहोचले आणि त्यांनी तेथील फोटो व माहिती व्हायरल केली, त्यानंतर ट्रेकर्सना चढाई करायला नवा डोंगर सापडला. 

या स्थानाबद्दल आणखी एक गोष्ट सांगितली जाते, ती अशी, की २०१२ मध्ये या स्थानाचा पत्ता लागल्यावर स्थानिकांनी शासनाच्या मदतीने या मूर्तीचे भग्न अवशेष आसपासच्या परिसरात शोधून मूर्तीचा जिर्णोद्धार केला आणि त्या मंदिराला गुप्त गणेश मंदिर असे नाव दिले. 

तिथे पोहोचण्यासाठी स्थानिक मुले गाईड म्हणून काम करतात. त्यांनी हा परिसर पर्यटन स्थळ म्हणून विकसित केला आहे. त्यामुळे स्थानिकांना रोजगारही मिळत आहे, ही बाप्पाचीच कृपा म्हणायला हवी, नाही का?

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवGanesh Mahotsavगणेशोत्सवganpatiगणपतीTempleमंदिर