शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

गणेश चतुर्थी: गुरुजी मिळत नाही? ‘अशी’ करा बाप्पाची प्राणप्रतिष्ठा; मंत्रोच्चारासह पूजाविधी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2024 3:06 PM

Ganesh Chaturthi 2024 Pran Pratishtha Puja Vidhi In Marathi: गणपतीत अनेकदा भटजी मिळत नाहीत. अशावेळी पूजा कशी करावी, असा प्रश्न येतो. अतिशय सोप्या पद्धतीने घरच्या घरी मंत्रोच्चारासह पार्थिव गणपती पूजन कसे करावे याबाबत जाणून घ्या...

Ganesh Chaturthi 2024 Pran Pratishtha Puja Vidhi In Marathi: वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥ कोणत्याही मंगल कार्याची सुरुवात प्रथमेश असलेल्या सुखकर्ता, विघ्नहर्ता गणपती बाप्पाच्या पूजनाने केली जाते. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला भारतातील कोट्यवधी घरात गणपती बाप्पाची पार्थिव मूर्ती आणून पूजन केले जाते. प्राचीन काळापासून ही परंपरा अव्याहतपणे अखंडितपणे सुरू आहे. यंदा शनिवार, ०७ सप्टेंबर २०२४ रोजी श्रीगणेश चतुर्थी आहे. या दिवशी पार्थिव गणपती पूजन केले जाते. 

पार्थिव गणपती पूजा करण्यासाठी अनेकदा भटजी मिळत नाहीत. अशावेळी गणपती बाप्पाची पूजा कशी करावी, असा प्रश्न उपस्थित होते. परंतु, काळजी करू नये. अतिशय सोप्या पद्धतीने मंत्रोच्चारासह पार्थिव गणपती पूजन कसे करावे याबाबत माहिती देत आहोत. ०७ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ०६ वाजून २४ मिनिटांनी सूर्योदय होणार आहे. सूर्योदयापासून ते दुपारी सुमारे दीड वाजेपर्यंत या कालावधीत पार्थिव गणपती पूजन करता येऊ शकते. ०७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ०५ वाजून ३६ मिनिटांनी भाद्रपद शुद्ध चतुर्थी तिथी समाप्त होत आहे. घरच्या घरी सोप्या पद्धतीने मंत्रोच्चारासह पार्थिव गणेश पूजा पूजन विधी जाणून घेऊया...

पार्थिव गणपती पूजन पूर्वतयारी कशी करावी?

- गणपतीची स्थापना करण्याकरिता चौरंग किंवा पाट आणि सभोवती मखर. पूजास्थानाच्या वर बांधण्याकरता नारळ , आंब्यांचे डहाळी , सुपाऱ्या. पाण्याने भरलेला तांब्या, पळी , पंचपात्र, ताम्हण, समई, जानवे, पत्री, शेंदूर, विड्याची पाने, सुपाऱ्या, नारळ, फळे, प्रसादाकरिता मोदक, मिठाई, पेढे, गोड पदार्थ असे पूजा साहित्य घेऊन पूजेची पूर्वतयारी करावी.

- गणेश मूर्ती ठेवण्याची जागा स्वच्छ करून त्यावर रंगीत पाट मांडून, अक्षता पसराव्यात. यानंतर त्यावर मूर्ती स्थापन करावी व शूचिर्भूतपणे आसनावर बसवून द्विराचमन, प्राणायाम आदी केल्यावर 'श्रीपरमेश्वप्रीत्यर्थ पाथिर्वगणपतिपूजनमहं करिष्ये' असा संकल्प म्हणून पाणी सोडावं. कलश, शंख, घंटा व दीप यांचे पूजन करून गंध, अक्षता, पुष्प अर्पण करावं. गणपतीच्या नेत्रांना दुर्वांनी तुपाचा स्पर्श करावा व मूर्तीच्या हृदयाला आपल्या उजव्या हाताच्या अंगठ्याने स्पर्श करून प्राणप्रतिष्ठेचे पुढील मंत्र म्हणावेत.

पार्थिव गणपती पूजन प्राणप्रतिष्ठा मंत्र

अस्यै प्राणा: प्रतिष्ठंतु अस्यै प्राणा: क्षरन्तु च।अस्यै देवत्वम् आचार्यै मामहेति च कश्चन।।रक्तांभीधिस्थ पोतोल्ल सदरुण सरोजाधि रुढाकराब्जै:।पाशम् कोदंड भिक्षूद्भवमथ गुणमप्यम् कुशम् पंचबाणान्।।बिभ्राण असृक्कपालम् त्रिनयन लसिता पीनवक्ष ऊरुहाढ्या।देवी बालार्क वर्णा भवतु सुखकरी प्राणशक्ती: परा न:।।

- अशा प्रकारे प्राणप्रतिष्ठा केल्यावर श्रीगणेशांना नमस्कार करावा आणि...

एकदंतम् शूर्पकर्णम् गजवक्त्रम् चतुर्भुजम्।पाशांकुशधरम् देवम् ध्यायेत सिद्धिविनायकम्।।ध्यायेत देवम् महाकायम् तप्तकांचन संनिभम्।चतुर्भुजम् महाकायम् सर्वाभरणभूषितम्।।दंताक्षमाला परशुपूर्ण मोदक हस्तकम्।मोदकासक्त शुंडाग्रम् एकदंतम् विनायकम्।।

- असे श्लोक म्हणत असताना अंत:करणात श्रीगणेश मूर्तीचे ध्यान, स्मरण करावे.

आवाहन मंत्र

आवाहयामि विघ्नेश सुरराज आचिर्तेश्वर।अनाथनाथ सर्वज्ञ पूजार्थ गणनायक।।श्रीसिद्धिविनायकाय नम:। आवाहयामि।।

असे म्हणून मूर्तीला आवाहन सूचक अक्षता अर्पण कराव्यात.

विचित्र रत्नरचितम् दिव्यास्तरण संयुतम्।स्वर्णसिंहासनम् चारु गृहाण सुरपूजित।।

श्रीसिद्धिविनायकाय नम:। आसनार्थे अक्षताम् समर्पयामि।।

- असे म्हणून श्रीगणेश मूर्तीला आसनासाठी अक्षता अर्पण कराव्यात.

सर्वतीर्थ समानीतम् पाद्यम् गंधादि संयुतम्।विघ्नराज गृहाणेदम् भगवन् भक्तवत्सल।।

श्रीसिद्धिविनायकाय नम:। पादयो: पाद्यम् समर्पयामि।।

- असे म्हणून श्रीगणेशांच्या पायांवर फुलाने पाणी अर्पण करावे.

अर्घ्य मंत्र

अर्घ्यम् च फलसंयुक्तम् गंधपुष्प आक्षतैर्युतम्।गणाध्यक्ष नमस्तेस्तु गृहाण करुणानिधे।।

श्रीसिद्धिविनायकाय नम:। अर्घ्यम् समर्पयामि।।

- असे म्हणून पळीभर पाण्यात गंध, अक्षता, पुष्प व सुपारी ठेवून त्यातले पाणी फुलाने, अर्घ्य म्हणून श्रीगणेशांना अर्पण करावे.

आचमन मंत्र

विनायकम् नमस्तुभ्यम् त्रिदशैरभि वंदित।गंगाहृतेन तोयेन शीघ्रम आचमनम् कुरु।।

श्रीसिद्धिविनायकाय नम:। आचमनियम् समर्पयामि।।

- असे म्हणून श्रीगणेशांच्या हातावर फुलाने आचमनासाठी पाणी अर्पण करावे.

गंगादि सर्वतीथेर्भ्य आनीतम् तोयमुत्तम्।भक्त्या समपिर्तम् तुभ्यम् स्नानाय आभिष्टदायक।।

श्रीसिद्धिविनायकाय नम:। स्नानम् समर्पयामि।।

- असे म्हणून श्रीगणेशांवर फुलाने पाणी अर्पण करावे.

पंचामृत स्नान मंत्र

पयो दधि घृतम् चैव मधुशर्करया युतम्।पंचामृतेन स्नपनम् प्रियताम् परमेश्वर।।

श्रीसिद्धिविनायकाय नम:। पंचामृत स्नानम् समर्पयामि।।

- असे म्हणून श्रीगणेशांना फुलाने पंचामृत (पंचामृत म्हणजे दूध, दही, तुप, साखर आणि मध) अर्पण करावे. नंतर शुद्ध पाणी अर्पण करावे. या वेळी सुगंधी अत्तर, गरम पाणी अर्पण करावे.

पंचामृत अर्पण केल्यानंतर त्याचा नैवेद्य दाखवावा. यानंतर सुरुवातीला वाहिलेली फुले, अक्षता म्हणजेच निर्माल्य उत्तर दिशेला विसर्जित करावे. यानंतर अथर्वशीर्ष म्हणून अभिषेक करावा. गणपती अथर्वशीर्ष पठण शक्य नसेल तर गणपती स्तोत्र म्हणावे. अभिषेक करून झाल्यानंतर...

वस्त्र मंत्र

रक्तवस्त्रयुगम् देव दिव्यम् कांचनसंभवम्।सर्वप्रदम् गृहाणेदम् लंबोदर हरात्मज।।

श्रीसिद्धिविनायकाय नम:। वस्त्रम् समर्पयामि।।

- असे म्हणून श्रीगणेशांना वस्त्र अर्पण करावे.

यज्ञोपवीत मंत्र

राजतम् ब्रह्मासूत्रम् च कांचनम् चोत्तरीयकम्।गृहाण चारु सर्वज्ञ भक्तानाम् वरदो भव।।

श्रीसिद्धिविनायकाय नम:। यज्ञोपवितम् समर्पयामि।।

- जानवे श्रीगणेशांना डाव्या खांद्यावरून उजव्या हाताखाली अर्पण करावे.

चंदन मंत्र

कस्तुरीरोचना चंदकुंकुमैश्च समन्वितम्।विलेपनम् सुरश्रेष्ठ चंदनम् प्रतिगृह्यताम्।।

श्रीसिद्धिविनायकाय नम:। चंदनम् समर्पयामि।।

- असे म्हणून श्रीगणेशांच्या मस्तकाला चंदन लावावे.

अक्षता मंत्र

रक्ताक्षतांश्च देवेश गृहाण द्विरदानन।ललाटपटले चंदस्तस्योपरि विधार्यताम्।।

श्रीसिद्धिविनायकाय नम:। अक्षताम् समर्पयामि।।

- असे म्हणून श्रीगणेशांना अक्षता अर्पण कराव्यात.

पुष्प मंत्र

माल्यादिनी सुगंधिनी मालत्यादिनी वै प्रभो।मयाहृतानि पूजार्थम् पुष्पाणि प्रतिगृह्यताम्।।

श्रीसिद्धिविनायकाय नम:। पुष्पाणि समर्पयामि।।

- असे म्हणून अनेक प्रकारची फुले , दुर्वा , शमी व अन्य पत्री श्रीगणेशांना अर्पण कराव्यात.

धूप मंत्र

दशांगम् गुग्गुलम् धूपम् सुगंधम् च मनोहरम्।गृहाण सर्वदेवेश उमापुत्रम् नमोस्तुते।।

श्रीसिद्धिविनायकाय नम:। धूपम् समर्पयामि।।

- असे म्हणून डाव्या हाताने घंटा वाजवून व उजव्या हाताने अगरबत्तीने श्रीगणेशांना ओवाळावे.

दीप मंत्र

सर्वज्ञ सर्वलोकेश त्रैलोक्य तिमिरापह।गृहाण मंगलम् दीपम् रुद्रप्रिय नमोस्तुते।।

श्रीसिद्धिविनायकाय नम:। दीपम् समर्पयामि।।

- असे म्हणून निरांजनाने श्रीगणेशांना ओवाळावे.

नैवेद्य मंत्र

नैवेद्यम् गृह्यताम् देव भक्तिम् मेह्यचलाम् कुरु।ईप्सितम् मे वरम् देहि परत्र च पराम् गतिम्।।

श्रीसिद्धिविनायकाय नम:। नैवेद्यम् समर्पयामि।।

- असे म्हणून श्रीगणेशांना नैवेद्य दाखवावा. यामध्ये दुपारचा भोजन नैवेद्य नंतर दाखवला तरी चालेल. परंतु, यावेळेस बाप्पाचे आवडचे लाडू, मोदक, पेढे यांचा नैवेद्य दाखवावा.

विडा मंत्र

पूगीफलं महद्दिव्यं नागवल्लीदलैर्युतम्‌ ।कर्पूरैलासमायुक्तं ताम्बूलं प्रतिगृह्यताम्‌ ।।

श्रीसिद्धिविनायकाय नम:। पूगीफल तांबुलम् समर्पयामि।।

- असे म्हणून श्रीगणेशांना विडा अर्पण करावा. म्हणजे गणपती बाप्पासमोर ठेवलेल्या विड्यावर उजव्या हाताने पळीभर पाणी सोडावे.

दुर्वा मंत्र

गणाधिप नमस्तेस्तु उमापुत्राघनाशन।एकदंते भवक्त्रेति तथा मूषकवाहन।।विनायकेश पुत्रेति सर्वसिद्धिप्रदायक।कुमारगुरवे नित्यम् पूजनीया: प्रयत्नत:।।

- हे मंत्र म्हणून २१ दुर्वा श्रीगणेशांना अर्पण कराव्यात. 

यानंतर गणपतीची आरती करावी.

नमस्कार मंत्र

नम: सर्वहितार्थाय जगदाधार हेतवे।साष्टांगोयम् प्रणामस्ते प्रयत्नेन मया कृत:।।

- असा मंत्र म्हणून श्रीगणेशांसमोर साष्टांग नमस्कार घालावा.

प्रदक्षिणा मंत्र

यानि कानि च पापानि जन्मांतरकृतानि च।तानि तानि विनश्यंति प्रदक्षिण पदे पदे।।

- असा मंत्र म्हणून स्वत:भोवती ३ प्रदक्षिणा घालाव्या.

मंत्रपुष्प

विनायकेशपुत्र त्वम् गणराज सुरोत्तम।देहि मे सकलान् कामान् वंदे सिद्धिविनायक।।

श्रीसिद्धिविनायकाय नम:। मंत्रपुष्पम् समर्पयामि।।

- असे म्हणून श्रीगणेशांना फुले अर्पण करावी व हात जोडून पुढील प्रार्थना करावी.

पार्थना मंत्र

यन्मया चरितम् देव व्रतमेतत् सुदुर्लभम्।गणेश त्वम् प्रसन्न: सन् सफलम् कुरु सर्वदा।।

विनायक गणेशान् सर्वदेव नमस्कृत।पार्वतीप्रि य विघ्नेश मम विघ्नान् निवारय।।

आवाहनम् न जानामि न जानामि तवार्चनम्।पूजाम् चैव न जानामि क्षम्यताम् परमेश्वर।।

मंत्रहीनम् क्रियाहीनम् भक्तितहीनम् सुरेश्वर।यत्पूजितम् मया देव परिपूर्णम् तदस्तु मे।।

अन्यथा शरणम् नास्ति त्वमेव शरणम् मम।तस्मात् कारुण्य भावेन रक्ष रक्ष परमेश्वर।। 

अशी श्रीगणेशांची प्रार्थना करावी.

।। इति पूजाविधी ।।

।। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ।। 

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवganpatiगणपती 2024Puja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३Ganpati Festivalगणेश चतुर्थी २०२४Ganesh Festival Ritualsगणेशोत्सव विधीspiritualअध्यात्मिकchaturmasचातुर्मास