शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

Ganesh Chaturthi 2024: बाप्पाचे वसतिस्थान आपल्या शरीरात कोणत्या ठिकाणी आहे, याचे उत्तर समर्थांच्या श्लोकात!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2024 1:13 PM

Ganesh Chaturthi 2024: भाद्रपद गणेश चतुर्थीनिमित्त बाप्पाची पार्थिव मूर्ती आपण घरी आणतो, पण त्याच बाप्पाचा अंश आपल्या शरीरात नेमक्या कोणत्या जागी आहे ते पहा!

भाद्रपद गणेश चतुर्थीची (Ganesh Chaturthi 2024) अर्थात बाप्पाच्या आगमनाची वेळ जवळ आली. यंदा शनिवारी ७ सप्टेंबर रोजी बाप्पा आपल्या घरी पाहुणचार घ्यायला येणार आहेत. बाप्पाच्या येण्याची आणि घाईघाईने जाण्याची लगबग पाहिली की आपलेही चित्त विचलित होते. ते येण्याचा आनंद आहेच, पण दीड दिवसात, पाच दिवसात तर कोणाकडे दहा दिवसात पाहुणचार संपवून ते जातात. मात्र ते कायम स्वरूपी मुक्कामी असतात तेही आपल्या देहात. पण नक्की कुठे ते जाणून घेऊ समर्थ रामदास स्वामी यांच्या श्लोकातून. 

गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा। मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा ॥

प्रत्येक कार्याच्या प्रारंभी गणेशस्मरण आणि नंतर शारदावंदन केले जाते. श्रीसमर्थांनी दासबोधात अनेक ठिकाणी गणेश आणि शारदा यांना अग्रक्रमाने आणि अनुक्रमानेही वंदन केलेले आहे. ज्ञानेश्वरीच्या प्रारंभीसुद्धा ज्ञानोबारायांनी वाड्मयरूप ओंकारस्वरूप गणेशाला वंदन केल्यानंतर शारदेचे स्तवन केलेले आहे. तरीही ह्या श्लोकातील पहिल्या ओळीचा अर्थ लावतांना गणाधीश म्हणजे शिवगणाचा अधिपती किंवा सर्व इंद्रिये म्हणजे इंद्रिय गण ताब्यात ठेवणारा असा लावून या पहिल्या दोन ओळींतून काही गूढ अर्थ शोधण्याचा प्रयत्न अनेकांनी केलेला आहे. ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांच्या लेखणीतून या श्लोकाचे गूढ जाणून घेऊ. 

गणाधीश म्हणजे गणपती. हा गुणाधीशसुद्धा आहे आणि सर्व गुण अंगी असूनही तो साक्षात् निर्गुणाचा आरंभ आहे. आरंभही साधासुधा नाही तर मुळारंभ. योगशास्त्रात कुंडलिनीच्या प्रारंभी असलेले मूलाधार चक्र हे श्रीगजाननाचे वसतिस्थान आहे. 'त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं' असे अथर्वशीर्षात म्हटले आहेच. म्हणून समर्थांनी गणपतीला 'मुळारंभ' असे म्हटले आणि हा मुळारंभही कसा? तर तेथेच निर्गुणालाही प्रारंभ होत आहे. निर्गुण म्हणजे गुणरहित म्हणजेच परमात्मा !

'नमू शारदा मूळ चत्वार वाचा।' ह्यात 'परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी' ह्या चारही वाणी शारदेचे मूलस्वरूप मानल्या पाहिजेत. निर्गुण अशा गणेशाचे पहिल्या दोन ओळीत स्मरण केल्यानंतर पुढल्या ओळीत सर्व प्रकारच्या विविध प्रकट आणि अप्रकट उच्चारशक्तीचे अधिष्ठान असलेल्या शारदेला नमन करून श्रीसमर्थ गमूं पंथ आनंत या राघवाचा ।। असे म्हणतात. राघवाचा म्हणजे रामाचा म्हणजे रामभक्तीचा पंथ हा अनंत आहे, असे समर्थ सांगतात. रामायणात 'जोवरती ही पृथ्वी आहे, जोवरती सूर्य-चंद्र आहेत, तोवर म्हणजे अनंत काळपर्यंत श्रीरामकथा या भूतलावर दुमदुमत राहाणार आहे,' असे म्हटले आहे. 'गमूं पंथ आनंत या राघवाचा ॥' इथे संदर्भ ह्या कथेचा आहे. शब्दांचा खेळ करण्याची फारशी आवड समर्थांना नाही. पण तरीही काही ठिकाणी ते मोठे समर्षक आणि मार्मिक शब्द वापरतात, त्याचेच एक उदाहरण म्हणून या पहिल्या श्लोकाकडे पाहिले पाहिजे. 

त्यामुळे बाप्पाचे अस्तित्व कायम आपल्या बरोबर असते हे लक्षात ठेवा आणि आपल्या प्रत्येक कृतीकडे बाप्पा लक्ष ठेवून आहे हेही लक्षात ठेवा!

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवGanpati Festivalगणेश चतुर्थी २०२४ganpatiगणपती 2024