शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

Ganesh Chaturthi 2024: गणेशोत्सवात आरती म्हणून झाल्यावर प्रदक्षिणा का घालतात? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 3:24 PM

Ganesh Chaturthi 2024: गणेशोत्सवात आरती म्हणण्यापासून प्रदक्षिणा घालण्यापर्यन्त प्रत्येक गोष्टीचा अर्थ माहीत असायला हवा.

यंदा ७ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi 2024)आहे. या उत्सवात सगळ्या देवादिकांच्या आरती मोठ्या भक्तिभावाने म्हटल्या जातात. ज्यांची आरती पाठ नसते, ते लोक 'जयदेव जयदेव' म्हणत ठेका धरतात. तास दोन तास आरती झाल्यावर वेळ येते शेवट करण्याची! त्यावेळी आपण जे पद म्हणतो तो संत नामदेवांनी लिहिलेला एक अभंग आहे. त्यातील समर्पित भाव पाहता तो अभंग आरती नंतर म्हणण्याचा प्रघात सुरू झाला.

आरती म्हणजे आर्ततेने मारलेली हाक आणि त्याचा शेवट ज्या अभंगाने केला आहे त्यात देवाशी संवाद साधत नामदेवांनी म्हटले आहे, 'भगवंता, यदाकदाचित जेव्हा तू आम्हाला भेटशील तेव्हा मी तुझ्यासमोर लोटांगण घालेन आणि चरणांना वंदन करेन. '

हा भावार्थ लक्षात घेता 'घालीन लोटांगण' हे चरण सुरू झाल्यावर आणि आरती संपण्यापूर्वी स्वतः भोवती प्रदक्षिणा घालण्याची गरज नाही. तसे करण्याबद्दल शास्त्रात कुठेही उल्लेख नाही. त्यामुळे आरती संपेपर्यंत देवाभोवती आणि स्वतः भोवती प्रदक्षिणा न घालता आरती पूर्ण करावी. नंतर मंत्रपुष्पांजली म्हणून झाल्यावर मंदिराला प्रदक्षिणा घालावी आणि नंतर देवासमोर साष्टांग नमस्कार घालावा. जिथे देवाभोवती प्रदक्षिणेसाठी जागा नसेल तिथे आरती संपल्यावर स्वतःभोवती प्रदक्षिणा घालून साष्टांग नमस्कार घालावा असे शास्त्र आहे.

स्वतः भोवती प्रदक्षिणा घालण्याचा मंत्र :  

यानि कानि च पापानि जन्मांतरकृतानि च |तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणपदे पदे ||

हा मंत्र म्हणत तीन वेळा प्रदक्षिणा घालत प्रार्थना केली जाते, की 'हे देवा माझ्याकडून कळत-नकळत झालेल्या पापांचे क्षालन कर, केवळ या जन्मातलेच नाही तर मागच्या जन्मातील पापेही नष्ट कर.'

लोटांगण : स्वतःभोवती प्रदक्षिणा घालून झाल्यावर देवासमोर लोटांगण घालावे. लोटा अर्थात सपाट बुड असलेला तांब्या जसा जमिनीवर अलगद टाकला असता जसा घरंगळत जातो आणि वर्तुळाकार फिरतो, तसा देवासमोर देह टाकून डोक्याच्या वर सरळ रेषेत हात जोडून स्वतःभोवती लोळत लोळत देवाभोवती प्रदक्षिणा करणे म्हणजे लोटांगण. तसे करताना देवासमोर डाव्या बाजूला तीन वेळेस आणि उजव्या बाजूला तीन वेळेस लोळण घेणे आणि मूळ जागी येऊन साष्टांग नमस्कार घालणे याला लोटांगण घालणे असे म्हणतात.

मात्र सगळ्या ठिकाणी किंवा घरगुती ठिकाणी लोटांगण घालण्यासाठी पुरेशी जागा नसते, अशा वेळी वरील श्लोक म्हणत आरती झाल्यावर स्वतः भोवती प्रदक्षिणा घालावी असे सांगितले जाते.

साष्टांग नमस्कार स्त्रियांनी घालू नये :

साष्टांग नमस्कार म्हणजे ज्यात अष्ट अंग जमिनीला टेकतात त्याला सह अष्ट अंग अर्थात साष्टांग नमस्कार असे म्हणतात. यात डोकं, दोन्ही हात, दोन्ही पाय, हृदय, दोन्ही डोळे जमिनीला टेकतात. मात्र शास्त्रानुसार स्त्रियांनी पंचांग नमस्कार घातला पाहिजे. त्यात दोन गुडघे, दोन हात आणि डोकं जमिनीला टेकले पाहिजे. स्त्रियांनी आपले पूर्ण शरीर जमिनीवर पालथे पडू देऊ नये, म्हणून त्यांनी पंचांग नमस्कार करावा असे सांगितले आहे.

त्यामुळे पुढच्या वेळी आरती झाली की सगळे प्रदक्षिणा घालतात म्हणून तुम्ही सुद्धा घालीन लोटांगण सुरु होताच प्रदक्षिणा घालू नका. आरती पूर्ण करा आणि आरती झाल्यावर इतरांनाही ही माहिती देऊन त्यांच्या ज्ञानात भर घाला!

टॅग्स :Ganesh Festival Ritualsगणेशोत्सव विधीGanpati Festivalगणेशोत्सवganpatiगणपतीPuja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३