शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

BLOG: भपकेबाजपणा नाही, फक्त परंपरा! गोव्याचं वेगळेपण दर्शवणारी ‘चतुर्थी’ अन् निसर्गाच्या कृपाछत्राची ‘माटोळी’

By देवेश फडके | Published: September 04, 2024 4:15 PM

Ganesh Chaturthi Festival In Goa: घरोघरी असणारी माटोळी गोव्यातील गणपती सणाचे वैशिष्ट्य तसेच वेगळेपण अधोरेखित करणारी आहे.

Ganesh Chaturthi Festival In Goa: गणपती बाप्पा हे आबालवृद्धांचे आराध्य दैवत! तो समरांगणात अग्रस्थानी लढणारा, आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा, गोड-धोड आवडीने खाणारा, शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा असा सर्वांना आदर्श वाटणारा हा देव आहे. मराठी वर्षात लाडक्या गणपती बाप्पाचे तीन जन्म मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. मराठी वर्षांत गणेशविषयक विशेष दिवस वैशाख पौर्णिमेपासून सुरू होतात, अशी मान्यता आहे. गणपतीच्या वेगवेगळ्या अवतारांपैकी तीन जन्मदिवस अत्यंत महत्त्वाचे मानले आहेत. यापैकी एक वैशाख पौर्णिमेला पुष्टिपती विनायक जन्म, भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजचे गणेश चतुर्थी आणि माघ महिन्यातील चतुर्थी म्हणजेच गणेश जयंती. चातुर्मासातील भाद्रपद महिन्यात येणारी गणेश चतुर्थी विशेष महत्त्वाची मानली जाते. 

गणपती किंवा गणेशोत्सव हा देशभरात किंबहुना जगभरात साजरा केला जातो. परदेशात अनेक ठिकाणी गणपती मूर्ती किंवा गणपतीचे दाखले दाखवणारी स्थळे पाहायला मिळतात. यावरून भारतीय संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार सर्वदूर झाला होता, असा निष्कर्षही काढला जातो. महाराष्ट्रासह गोवा तसेच लगतच्या राज्यात गणपती, गणेशोत्सव किंवा गणेश चतुर्थी विशेषत्वाने साजरी केली जाते. आपल्याकडील गणेशोत्सवाला प्राचीनता, पारंपरिकता यांसह राष्ट्र प्रेम आणि संघटनात्मक शक्तीची जोड लाभलेली आहे. प्रत्येक ठिकाणाचा गणेशोत्सव वैविध्यपूर्ण, तरी विविधतेत एकता दर्शवणारा आहे. १४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती असलेल्या गणरायाबाबत वर्णावे तेवढे कमीच आहे. 

प्राचीन परंपरा, संस्कृती जपत दिमाखात उभी असलेली मंदिरे

गोवा. गोवा म्हटले की, आकर्षक समुद्रकिनारे, तेथील धमाल, मस्ती, झिंगाट मानसिकतेत मुक्ताचार करणारे पर्यटक अशा अनेक प्रतिमा पहिल्या डोळ्यासमोर येतात. परंतु, हीच केवळ गोव्याची ओळख नाही. निसर्ग संपन्नता, पारंपरिकता, शेकडो वर्षांच्या गुलामगिरीच्या संघर्षातून ताठपणे आजही दिमाखात उभी असलेली प्राचीन संस्कृती, खाद्य परंपरा, जीवनातील समृद्धता अशा अनेक गोष्टींची मांदियाळी पाहायला मिळते. ती डोळसपणे पाहिली, तर त्या प्रदेशाचे वैभव अधिक विशेषत्वाने अधोरेखित झाल्याशिवाय राहणार नाही. गोव्यातील सर्वांत मोठा आणि महत्त्वाचा मानला गेलेला सण म्हणजे ‘चवथ’. गोव्यात गणेशचतुर्थीचा सण कधी सुरू झाला हे सांगणे कठीण असले तरी पोर्तुगीजपूर्व काळापासून हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जात असावा. गोव्यात प्राचीन संस्कृती आणि परंपरा सांगणारी अनेक गणपती मंदिरे असल्याचे सांगितले जाते. 

प्राचीनत्व दर्शवणारी गोव्यातील विविध गणपती मंदिरे 

एकेकाळी दीपवती नावाने ओळखले जाणारे मांडवीच्या काठी वसलेल्या दिवाडी बेटातील नावेली गावात गोव्यातील सर्वांत मोठे गणेश मंदिर वसले होते. सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात पोर्तुगीजांच्या धार्मिक छळवणुकीमुळे भाविकांनी या दैवताचे प्रारंभी स्थलांतर अंत्रूज महालातील खांडेपार गावात आणि त्यानंतर सध्याच्या ठिकाणी खांडोळा येथे केले होते, अशी माहिती मिळते. खांडोळा येथे असलेले हे महागणपतीचे संस्थान गणेश पूजनाच्या शतकोत्तर वर्षांच्या इतिहासाच्या परंपरेची साक्ष देते, असे म्हटले जाते. डिचोलीत कौंडिण्यपूर, कूंदनपूर नावाने ओळखल्या जाणाऱ्या कुडण्यात द्विहस्त गणेशमूर्ती शेकडो वर्षांच्या इतिहासाचा वारसा सांगणारी प्राचीन मूर्ती आहे. सांगे कुर्डीतील, त्याचप्रमाणे पिलार सेमिनारीच्या वस्तू संग्रहालयातील गणेश मूर्ती शेकडो वर्षांपासून प्रचलित असलेल्या गणेश मूर्ती पूजनाच्या प्राचीन परंपरेची प्रचिती आणून देते. सांग्यातील विचुंद्रे, पेडण्यातील कोरगाव, केप्यातील चंद्रेश्वर आणि फोंड्यातील शिरोडा येथे चतुर्हस्त गणपतीच्या मूर्ती आढळलेल्या आहेत. होयसाळ मूर्ती शिल्पाशी नाते सांगणाऱ्या या गणेश मूर्ती गोवा कदंब राजवटीत पूजनीय ठरल्या होत्या. काणकोणात लोलयेत आढळलेली द्विहस्त गणेशमूर्ती या लोकदैवताच्या प्राचीनत्व दाखवणाऱ्या असल्याचे सांगितले जाते. 

गोव्यातील सर्वमान्य परंपरा म्हणजे ‘माटोळी’

गोव्यात ठिकठिकाणी गणपतीची मंदिरे भाविकांनी मुक्तीनंतर मोठ्या प्रमाणात उभारलेली आहेत. गणपतीच्या फुलाफळांनी सजलेल्या माटोळीत नव्या भाताच्या दाणेदार लोंब्या हमखास हव्या. प्राचीन कालखंडापासून आधुनिक काळातही गोव्यात गणेश पूजनाची परंपरा अव्याहतपणे चालू होती. प्रत्येक ठिकाणी गणेश पूजनाची परंपरा वैविध्यपूर्ण आहे. परंतु, गोवा आणि तळकोकणासह लगतच्या भागाचे वैशिष्ट्य म्हणजे ‘माटोळी’. गोव्यात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवात अनेक वैशिष्ट्ये आपणाला पाहायला मिळतात. खरे तर, प्रत्येक गावाची आपली अशी एक वेगळी रूढी किंवा परंपरा असते. पण त्यातल्या त्यात एक परंपरा जी सगळीकडे सर्वसामान्य आहे ती म्हणजे ‘माटोळी’.

एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणारा समृद्ध वारसा

भारतीय संस्कृती, परंपरा या निसर्गसमावेशक होत्या आणि आहेत, याचे एक उदाहरण म्हणजे माटोळी. मुळात याची संकल्पना अशी की, घरातील मंडळी माटोळीसाठी लागणारे साहित्य गोळा करण्यासाठी रानावनात, आपल्या गावात फिरतात. जेव्हा लहान-थोर यासाठी जातात, तेव्हा ज्येष्ठ, वयस्क मंडळी रानात एखादे झाड, फळ, फुल, औषधी वनस्पती कुठे मिळते, त्याचा उपयोग काय, यासारखी विविध आणि उपयुक्त माहिती छोट्यांना म्हणजेच नवीन पिढीला देत असतात. काही फळे, फुले त्याच मोसमात फुलतात, तेव्हा त्यांची माहिती या उत्सवातील विविध परंपरेद्वारे नवीन पिढीपर्यंत सर्जनशीलपणे पोचवली जाते. या निमित्ताने का होईना, निसर्गाची निगा राखणे, झाडे ओळखणे, कुठले झाड न कापणे, झाडांचे औषधी गुणधर्म अशा प्रकारच्या अनेक छोट्या छोट्या गोष्टी सहजपणे एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचवल्या जातात. आपल्या परिसरातील कंदमुळे आणि फळे फुले, औषधी वनस्पती जमवून माटोळी बांधली जाते.

भपकेबाजपणा टाळणारा ग्रामीण गोव्यातील चवथ सण

गोव्यातील गणपती आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पर्यावरणपूरक मूर्ती. ग्रामीण गोव्यात गणेश चतुर्थी पर्यावरणास अनुकूल अशीच असते. गणेश चतुर्थीच्या सजावटीत महागडे साहित्य, भपकेपणा, मोठी लाइटिंग, थर्माकोल या सगळ्या गोष्टींचा वापर तुलनेने बराच कमी असतो. गोव्यामध्ये पारंपरिक आरास करण्याकडे लोकांचा जास्त कल आहे. पारंपरिक आरास म्हणजेच माटोळी. विविध प्रकारची फळे, भाज्या आणि औषधी वनस्पतींनी सजवलेली इत्यादी वस्तूंनी लाकडी छत करून सजवले जाते. निसर्ग त्याच्या खऱ्या स्वरूपात कसा असतो, हे यामधून दर्शविले जाते. खऱ्या अर्थाने पर्यावरणपूरक गणेश चतुर्थी गोव्यामध्ये साजरी केली जाते, असे म्हटले जाते. अशा प्रकारचे दृश्य गणपतीच्या काळात गोव्यातील अनेक घरांमध्ये, गावांमध्ये बघायला मिळेल. गणेश मूर्तीच्या वर असलेल्या लाकडी छताला विविध फळे, भाज्या, पाने, कोंब, औषधी वनस्पती आणि कंदांनी झाकलेले असते. माटोळी हा पश्चिम राज्यातील गणेश चतुर्थी उत्सवाचा अविभाज्य भाग आहे.

माटोळीचे वैशिष्ट्य, वैविध्य आणि गुणधर्मांची उपयुक्तता

आपल्याकडील उत्सवातील प्रत्येक घटक निसर्गाशी थेट संबंधित आहे. मातीपासून गणेश मूर्ती तयारी केली जाते. जंगली पाने आणि फुलांचे गठ्ठे हे गौरींचे प्रतिनिधित्व करतात, तर महादेवाचे प्रतीक म्हणून नारळाचा वापर केला जातो. या सर्व गोष्टींपुढे सर्वांत महत्वाचा घटक म्हणजे माटोळी. ही माटोळी ठेवल्यानंतरच मूर्तीची पूजेसाठी स्थापना केली जाते. औषधी वनस्पतींचा गठ्ठा पानांमध्ये गुंडाळलेला म्हणजेच माटोळी. माटोळी हे जैवविविधतेचे एक उत्कृष्ट प्रदर्शन आहे. स्थानिक वनस्पतींचे पारंपारिक ज्ञान एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचवते आणि जैवविविधतेबद्दल प्रेम आणि आदर विकसित करते, असे म्हटले जाते. माटोळी सजवण्यासाठी वापरण्यात येणारी फळे आणि भाज्या खाण्यायोग्य, औषधी आणि विषारी अशा तीन प्रकारात विभागले जातात. आधुनिक औषधाच्या आगमनापूर्वी, गावकरी आजारांपासून बरे होण्यासाठी पूर्णपणे नैसर्गिक पदार्थांवर अवलंबून असायचे. म्हणूनच त्यांच्यासाठी वन्य वनस्पतींचे ज्ञान असणे आवश्यक होते. माटोळीमध्ये सर्व औषधांचा समावेश होत असतो. गणेश चतुर्थीच्या काही दिवस आधी, स्थानिक पातळीवरील गावकरी, तरुण आणि वृद्ध लोक जंगलात जाऊन विविध जंगली फुले, फळे आणि पाने गोळा करतात जसे की, कांगला, मट्टी, फागला, केवण आणि त्रिफळा. यापैकी अनेक वनस्पतींचे सामाजिक-सांस्कृतिक महत्त्व मजबूत आहे. 

३५० ते ४०० वस्तूंचा समावेश असलेली माटोळी

गोव्यामध्ये माटोळी सजावटीसाठी किमान ३५० ते ४०० वस्तू आहेत. काणकोण, केपे आणि सत्तरी या भागातील काही कुटुंबे ४०० पेक्षा जास्त वस्तूंचा समावेश असलेली माटोळी सजवतात, असे सांगितले जाते. या सर्व गोष्टी निसर्गात, रानात किंवा आधुनिक काळात बाजारात उपलब्ध होतात. चवथ सण येण्यापूर्वी सुमारे १५ दिवसांपासून माटोळी बाजार सजू लागतात. माटोळीतील वस्तूंची खरेदीची लगबग सुरू होते. संस्कृती आणि संस्कार रुजतात तिथे समाजात सकारात्मक बदल बघायला मिळतात. फोंड्यातील कुर्टी गावातील एका कुटुंबाने २७५ विविध नग वापरून गोवर्धनधारी श्रीकृष्णांची प्रतिकृती साकारून तयार केलेली माटोळी सर्वांचे लक्ष वेधून घेणारी आणि आकर्षणाचा विषय ठरली होती. केवळ श्रीकृष्ण नाही, २०० फळे, फुले वस्तूंचा समावेश करत मारुतीची प्रतिकृती माटोळीत साकारली गेली होती. तसेच ३०० वस्तूंचा वापर करत विठ्ठल प्रतिकृतीची माटोळी तयार करण्यात आली होती. 

माटोळीची परंपरा आणि सरकारचे प्रोत्साहन

माटोळी हा विषय ध्यानात घेऊन अनेक वर्षांपासून गोवा राज्य कला व सांस्कृतिक खाते माटोळी सजविण्याची स्पर्धा घेते. यामधून प्रेरणा घेऊन अनेक स्थानिक संस्था या परंपरेला प्रोत्साहन द्यायला अशा प्रकारच्या स्पर्धा आयोजित करतात. याचे एक वेगळे चित्र समाजात पाहायला मिळाले. गणेश चतुर्थीमध्ये गोव्यात मोठ्या प्रमाणात देखावे साजरे केले जातात. या देखाव्यातून काही वेळा सामाजिक संदेश दिला जातो तर काही देखावे हे केवळ मनोरंजनासाठी असतात. देखाव्याच्या बाबतीत माशेल हे गाव अव्वल स्थानी आहे. गोव्यामध्ये मडगावला गणेशोत्सवात महत्वाचे स्थान आहे कारण या गावाला २१ दिवसांच्या बाप्पांची परंपरा लाभली आहे.  

गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया...!!!

- देवेश फडके 

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवgoaगोवाganpatiगणपती 2024Ganpati Festivalगणेश चतुर्थी २०२४Ganesh Festival Ritualsगणेशोत्सव विधीspiritualअध्यात्मिक