शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
2
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
3
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
4
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
5
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
7
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
8
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल
9
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
10
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
11
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
12
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
13
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
14
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
15
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
16
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
17
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
18
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
19
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
20
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले

Ganesh Festival 2022: गणेश मुर्तीस्थापनेपासून विसर्जनापर्यंतचे महत्त्वाचे नियम जाणून घ्या व त्याचे यथायोग्य पालन करा!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 5:51 PM

Ganesh Festuval 2022: गणेश मूर्ती स्थापनेच्या दिवशी वेळेत पूजा होऊन बाप्पा आपल्या स्थानी विराजमान व्हावेत यासाठी ही नियमावली नजरेखालून घाला.  

आपल्या सर्वांचे लाडके बाप्पा यंदा ३१ ऑगस्ट रोजी आपल्या घरी पाहुणचार घ्यायला येणार आहेत. इतर पाहुण्यांच्या पाहुणचारात आपण कोणतीही कसूर ठेवत नाही, मग बाप्पाच्या बाबतीत उणीव राहून कसे चालेल? यासाठीच बाप्पाचे आगमन, मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, पूजा, नैवेद्य, आरती आणि विसर्जन या सर्व बाबतीत कोणकोणत्या नियमांचे पालन होणे आवश्यक आहे ते जाणून घेऊ. यासाठी श्रीनिवास जोशी गुरुजींनी दिलेली सविस्तर नियमावली एकदा नीट वाचून घ्या!

श्री गणेश प्राणप्रतिष्ठा पूजा मांडणी कशी कराल?

१) श्री गणेशांचे आगमन घरात होताना,यजमानांच्या पायावर दरवाज्यामधेच दूध-पाणी घालून,औक्षण करावे.

२) श्री गणेश मूर्ती ज्या ठिकाणी ठेवणार आहात त्या स्थानी थोडे तांदूळ घालून त्यावर पाट ठेवून,त्यावर मूर्ती स्थापित करावी.मूर्तीचे मुख वस्राने आच्छादन करुन ठेवावे. (मूर्ती पूजेच्या दिवशीच त्या जागी ठेवावी,असे नाही.आधी ठेवली तरी काहीच हरकत नाही.)

३) पूजेच्या दिवशी प्रातःकाळी स्नान करुन शुचिर्भूत व्हावे.कपाळी तिलक(गंध)धारण करावे.मुंज झालेली असल्यास यज्ञोपवित धारण करुन रहावे.

४) घरच्या देवतांची पूजा करुन घ्यावी.(शक्यतो त्याशिवाय इतर पूजाविधी करु नयेत. पूजा घरच्या पुरुष मंडळींनीच करावी. महिला वर्गावर हा भार टाकू नये.

५) आता मूर्तीवर आच्छादन केलेले वस्र काढून ठेवावे.

६) शक्यतो मूर्तीच्या ऊजव्या बाजूला समई,निरांजन,ऊदबत्ती,कापूर आदीची योजना करावी.(पूजा करताना आपले मुख पूर्वेकडे राहील अशी योजना असावी.म्हणजे देव आपल्या समोर पूर्वेला,पश्चिमेकडे म्हणजेच आपल्याकडे तोंड करुन ठेवावेत.हे जमत नसल्यास याऊलट चालेल.पण शक्यतो दक्षिणोत्तर नकोत)

७) दिवे आदल्या दिवशी स्वच्छ घासून,पुसून,समईमधे,निरांजनामधे वाती,तेल,तूप वगैरे भरुन तयार करुन ठेवावेत.ऊदबत्ती स्टँड मधे रोवून ठेवावी.काडेपेटी जवळ ठेवावी. समईच्या खाली एखादी ताटली ठेवावी. हल्ली काचेमधले दिवे मिळतात,दिवा न विझण्याच्या दॄष्टीने ते ऊपयुक्त ठरतात.जमल्यास ते दिवे वापरावेत.त्यामधे तेल,तूप ही भरपूर वेळ राहते. दिव्यांना गंध,हळद,कुंकू लावून ठेवावे.

८) विड्याची दोन पाने(देठ देवाकडे करुन)त्यावर सुट्टे पैसे,त्यावर सुपारी,याप्रमाणे पाच विडे तयार करावेत.देवाच्या कुठल्याही बाजूला किंवा दोन्ही बाजूंना मिळून असे विडे ठेवावेत.विड्यांजवळच दोन नारळ,फळे यांची योजना करावी.(शक्यतो देवासमोर ठेवू नयेत.पूजा करताना अडचण होते.).या विड्यांवरच(असल्यास) अक्रोड,खारीक आदि पंचखाद्य मांडून ठेवावे.

९)नैवेद्यासाठी दूध+साखर,गूळ+खोबरे,मोदक,पेढे ई.देवासमोर मांडून ठेवावेत.मांडतानाच त्याखाली पाण्याने चौकोनी मंडल करुन ठेवावे.

१०)पंचामॄत(दूध,दही,तूप,मध,साखर) एकत्र अथवा वेगवेगळे तयार करुन ठेवावे.

११)मोदक,पेढे ई.बाॅक्ससकट न ठेवता एखाद्या स्वच्छ वाटीत काढून घ्यावेत.

१२)यज्ञोपवित(जानवे) सोडवून,मोकळे आणि ओले करुन एखाद्या ठिकाणी अडकवून ठेवावे. जेणेकरुन आयत्यावेळी धावपळ होणार नाही.(घाई मध्ये जानवे हमखास गुंतते आणि सुटता सुटत नाही.आणि चिडचिड होते.)

१३)कापसाचे वस्र असल्यास २१मण्यांचे गणपतीसाठी तयार ठेवावे.

१४)यजमानांनी शक्यतो कद(सोहळं),ऊपरणं असा पोशाख करावा.नसल्यास धोतर,किंवा स्वच्छ धूत वस्र परिधान करावे. हात पुसण्यासाठी एक स्वच्छ रुमाल जवळ ठेवावा. बसायला किंवा ऊभे राहायला एक आसन असावे.

१५)गणपतीसमोर पूजेसाठी तांब्या,ताम्हन,पळी भांडे ठेवावे.

१६)आपल्या समोर आपल्या डाव्या हाताला पिण्याच्या पाण्याने भरलेला तांब्या,त्याच्या ऊजव्या बाजूला त्याच पाण्याने भरलेले फुलपात्र,त्यामध्ये पळी किंवा चमचा,त्याच्या उजव्या बाजूला ताम्हन असावे.

१७)देवाला घालावयाचे काही दागिने असतील तर ते मोकळे करुन ठेवावेत.गुरुजींनी पूजा सांगून झाल्यावर ते दागिने देवाला घालावेत किंवा आधी घालून ठेवले तरी हरकत नाहीत.

१८) एका मोठ्या ताटामधे आणलेली सर्व प्रकारची फुले थोडी थोडीच काढून घ्यावीत.जमल्यास प्रत्येक प्रकारची फुले वेगळी मांडून ठेवावीत.ताटात फुलांची फार गर्दी करु नये.लागली तर परत घेता येतात. त्रिदल दूर्वांच्या २१दूर्वांच्या ५-६जुड्या तयार करुन ठेवाव्यात.तीन पानांचा आणि छिद्र नसलेल्या पानांची ७-८बिल्वपत्रे असावीत.तुळस अगदी मोजकीच असावी.शमी असल्यास जुडी सोडून,मोकळी करुन ठेवावी म्हणजे घाईघाईत काटे टोचणार नाहीत.२१प्रकारच्या पत्री ऊपलब्ध झाल्या तर त्या एका ताटात नीट नावासकट मांडून ठेवाव्यात.

१९)हळद,कुंकू,गुलाल,शेंदूर,बुक्का,केशर अष्टगंध पावडर हे छोट्या वाट्या अथवा द्रोण यामधे मोजकेच काढून ठेवावे.ही सगळी तयारी आपल्या ऊजव्या बाजूला असावी.फुलांचे ताटही ऊजव्या बाजूलाच असावे.

२०) पूजा सुरु झाली की कुणा नातेवाईकांना फुलपात्रात गरम पाणी आणून देण्यास सूचना करुन ठेवावी.

२१)सगळ्यात महत्त्वाची सूचना पूजा करताना अतिशय श्रद्धेने,सावधचित्त होऊन पूजा करावी.पूजेव्यतिरिक्त ईतर ठिकाणी लक्ष देऊ नये.पूजा करताना भ्रमणध्वनी(मोबाईल)चा अडथळा असू नये. यानंतर पूजा झाल्यावर लगेच किंवा दुपारी भोजनापूर्वी देवाला महानैवेद्य दाखवून यथाशक्ती महाआरती करावी.संध्याकाळी आरती करायच्या आधी पुन्हा देवाला हळद,कुंकू,गंध,फुलं,दूर्वा वहाव्यात.काही नैवेद्य दाखवावा व नंतर आरती करावी.विसर्जनापर्यंतच्या काळामध्ये सकाळ संध्याकाळ अशाच प्रकारे पूजा करावी.आदल्या दिवशीची फुले(निर्माल्य)काढून मूर्ती कपड्याने  हळूवार स्वच्छ करावी.व नंतर नवीन हार वगैरे घालावा.

उत्तरपूजेच्या दिवशी बाप्पाबरोबर दूध पोहे अथवा दही पोहेअशी शिधोरी द्यावी.घरी आरती केल्यावर,सगळ्यांचा देवाला नमस्कार करुन झाल्यावरच देवाच्या मस्तकी ऊत्तरपूजेच्या अक्षता वहाव्यात.आणि देवाचे आसन थोडेसे हलवावे. विसर्जन स्थळी पुन्हा आरती करण्याची गरज नाही.

श्री गणेश सर्व भक्तांचे मंगल करो.॥शुभम् भवतु॥

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवGanesh Festival Ritualsगणेशोत्सव विधीGanpati Festivalगणेशोत्सव