ठाणे : पुढच्या वर्षी २०२३ मध्ये श्रावणानंतर अधिक महिना येणार असल्याने गणपती बाप्पाचे आगमन १९ दिवस उशिरा मंगळवारी १९ सप्टेंबर रोजी होणार आहे, अशी माहिती ज्येष्ठ पंचांगकर्ते व खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली. यावर्षी श्री गणेश पूजनासाठी मध्यान्ह काळ महत्त्वाचा मानला जातो. बुधवारी ३१ ॲागस्ट रोजी सकाळी ११.२५ पासून दुपारी १.५५ पर्यंत मध्यान्ह काळ आहे. जर यावेळेस गणेशपूजन करणे शक्य झाले नाही तर संपूर्ण दिवसभर कधीही गणेश पूजन केले तरी चालेल, असे त्यांनी सांगितले. ज्येष्ठा गौरी शनिवारी ३ सप्टेंबर रोजी रात्री १०.५६ वाजेपर्यंत अनुराधा नक्षत्र असल्याने दिवसभर कधीही गौरी आणण्यास हरकत नाही. रविवारी ४ सप्टेंबर रोजी ज्येष्ठा गौरी पूजन आहे. ज्येष्ठा गौरींचे विसर्जन चंद्र मूळ नक्षत्रात असल्याने सोमवारी ५ सप्टेंबर रोजी रात्री ८.०५ पर्यंत करावे. शुक्रवारी ९ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे.
Ganesh Mahotsav: पुढच्या वर्षी बाप्पाचे आगमन १९ दिवस उशिरा, श्रीगणेश पूजनासाठी मध्यान्ह काळ उत्तम
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2022 7:43 AM