शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
3
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
4
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
5
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
6
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
7
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
8
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
9
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
10
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
11
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
12
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
13
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
14
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
15
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
16
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
17
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
18
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
19
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

Ganga Dusherra 2022: गंगा दशहराला दहाच्या पटीत करा 'या' तीन गोष्टी; दुःख-कष्टातून मिळेल मुक्ती!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2022 2:55 PM

Ganga Dusherra 2022: गंगा दशहरा या दिवशी दहा या संख्येला महत्त्व आहे. यादिवशी दहाच्या पटीत केलेले सत्कर्म शतपटीचा लाभ देते. यासाठी मुख्य तीन गोष्टी कराव्यात.    

मनुष्याकडून कळत नकळत दहा प्रकारची पापं घडत असतात. दिल्याशिवाय आपण होऊन उचलून घेणे म्हणजे चोरी करणे, विधीशिवाय हिंसा करणे व परस्त्रीगमन ही कायेकडून होणारी तीन पापे म्हटलेली आहेत. कठोर बोलणे, असत्य बोलणे, चहाडी करणे व संबंधाशिवाय बडबड करणे ही चार वाणीची पापे आहेत आणि मनाने दुसऱ्याच्या  द्रव्याची आशा राखणे, अनिष्ट विचार करणे व खोटा आग्रह धरणे ही तीन मनाची पापे म्हटली आहेत. अशा एकूण दहा प्रकारच्या पापांचा नाश गंगा माता करते म्हणून तिला दशहरा असे म्हणतात आणि तिच्याच नावे हा उत्सव दरवर्षी ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा ते दशमी असा दहा दिवस केला जातो. यंदाही हा उत्सव ३१ मे रोजी सुरू झालेला असून ९ जून रोजी या उत्सवाची समाप्ती आहे. या उत्सवात मुख्य तीन गोष्टी दहाच्या पटीत केल्या असता त्याचा पुष्कळ लाभ होतो. त्या तीन गोष्टी कोणत्या हे जाणून घेऊ. 

गंगा दशहरा या दिवशी दहा या संख्येला महत्त्व आहे. यादिवशी दहाच्या पटीत केलेले सत्कर्म शतपटीचा लाभ देते. यासाठी मुख्य तीन गोष्टी कराव्यात.    

गंगा मातेची दहा प्रकारे पूजा : गंगेत स्नान करणे अथवा गंगेचे दर्शन घेणे सर्वांनाच शक्य होईल असे नाही. त्यावर पर्याय म्हणून आपल्या सर्वांच्याच देवघरात गंगोदक असते. त्याची आपण नित्य पूजा करतो. गंगा दशहराच्या उत्सवाच्या निमित्ताने गंगा मातेची दहा प्रकारे आपण पूजा करू शकतो. म्हणजे नेमकी कशी? असा प्रश्न उद्बभवला असेल, तर गोंधळून जाऊ नका. पत्र, पुष्प, फळ, पाणी किंवा नैवैद्य यांच्यात दहा प्रकारे वैविध्य आणून पूजा करता येईल. दहा प्रकारचे नैवेद्य, गूळ खोबऱ्यापासून शिऱ्यापर्यंत जे यथाशक्ती शक्य असेल ते, दहा प्रकारची फळे, दहा प्रकारची फुले किंवा दहा वेळा गंगा मातेला अभिषेक घालून ही पूजा संप्पन्न करता येईल. 

दहा प्रकारचे स्नान: अन्य दिवसात शक्य नसले, तरी किमान या दहा दिवसात गंगेत स्नान करणे, हे शास्त्राला अभिप्रेत आहे. परंतु तेही शक्य नसेल, तर शास्त्राने उपाय सांगितला आहे, तो म्हणजे आंघोळीच्या वेळी गंगेसहित महानद्यांच्या स्मरणाचा! गंगेच यमुने चैव गोदावरी सरस्वती |. नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन सन्निधि कुरु।हा श्लोक म्हणून स्नान केल्याने आणि महानद्यांचे स्मरण केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि गंगा स्नानाचे पुण्य मिळते. याशिवाय गंगा दशहराच्या दिवशी 'ॐ नमो गंगायै विश्वरूपिण्यै नारायण्यै नमो नमः' या मंत्राची जोड देत स्नान करावे. त्यामुळे दश प्रकारे स्नान घडते.

दहा प्रकारचे दान : आपल्या संस्कृतीने आपल्याला कायम घेण्याआधी द्यायला शिकवले आहे. एक तीळही सात जणांनी वाटून खावा, असे म्हटले जाते. याचाच अर्थ आपण सुखात आहोत, तसेच अन्य कोणाला सुख देण्याचे माध्यम म्हणजे दान. यासाठी उत्सव, व्रत वैकल्याच्या वेळेस आवर्जून दान करा असे सांगितले जाते. गंगा दशहराचे औचित्य साधून आपल्यालाही गरजू व्यक्तीला अन्न, धान्य, शिधा दान करता येते. तसेच गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करता येते. दानाचे विविध प्रकार आहेत. अन्नदान, जलदान, वस्त्रदान, श्रमदान, आताच्या काळात रक्तदान, देहदान, अवयव दान अशा अनेक विकलपांचा समावेश दानात केला जातो. म्हणून यथाशक्ती दानाचा प्रकार निवडून दहा प्रकारे दान केल्यास ते पुण्यप्रद ठरते!