शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

Ganga Dussehra 2024: गंगा दशहरा उत्सवात गंगास्नानाचे पुण्य मिळवण्यासाठी अंघोळीच्या पाण्यात टाका 'हा' पदार्थ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2024 13:12 IST

Ganga Dussehra 2024: गंगा दशहरा उत्सव हा गंगा मातेप्रती ऋणनिर्देश व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो, त्यातच गंगास्नानाचे पुण्य मिळवण्यासाठी हा उपाय करा!

गंगा माता आपल्या सर्वांचे पाप धुवून टाकते, अशी श्रद्धा असल्यामुळे प्रत्येक हिंदू धर्मीय आयुष्यात केव्हा न केव्हा गंगास्नान करतोच! एवढ्या जणांचे पाप धुवूनही गंगा मातेचे पावित्र्य किंचितही कमी झालेले नाही. म्हणून तर हजारो वर्षे झाली, तरी ज्येष्ठ मासातील पहिले दहा दिवस गंगा मातेला समर्पित करून तिचा उत्सव साजरा केला जातो. या उत्सवाची सांगता १६ जून रोजी होणार आहे. आपण यापूर्वी कधी गंगास्नान केले नसेल, तर शास्त्राने सांगितलेले उपाय करा आणि पावन व्हा. 

अन्य दिवसात शक्य नसले, तरी किमान या दहा दिवसात गंगेत स्नान करणे, हे शास्त्राला अभिप्रेत आहे. परंतु तेही शक्य नसेल, तर शास्त्राने उपाय सांगितला आहे, तो म्हणजे आंघोळीच्या वेळी गंगेसहित महानद्यांच्या स्मरणाचा! गंगेच यमुने चैव गोदावरी सरस्वती |. नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन सन्निधि कुरु।

हा श्लोक म्हणून स्नान केल्याने आणि महानद्यांचे स्मरण केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि गंगा स्नानाचे पुण्य मिळते. याशिवाय गंगा दशहराच्या दिवशी 'ॐ नमो गंगायै विश्वरूपिण्यै नारायण्यै नमो नमः' या मंत्राची जोड देत स्नान करावे. त्यामुळे दश प्रकारे स्नान घडते.

याच बरोबर आपल्या आंघोळीच्या पाण्यात पुढील दहा पवित्र गोष्टींपैकी कोणतीही एक गोष्ट मिसळून स्नान केल्यास गंगास्नानाचे पुण्य लाभते. त्या दहा गोष्टी कोणत्या ते पाहू. 

हिंदू संस्कृतीत गायीला गंगेइतकेच पवित्र मानले जाते. तसेच तिच्याकडून उपलब्ध होणारे गोमूत्र, गोमय, गोदूध, गोघृत म्हणजे गायीचे तूप अशा गोष्टींचा किंचित वापर आंघोळीच्या पाण्यात तसेच दैनंदिन वापरात केला असता त्याचे अनेक शारीरिक, मानसिक फायदे होतात, हे विज्ञानाने देखील मान्य केले आहे. म्हणून पुढीलपैकी तुम्हाला कोणता पर्याय जमू शकतो, त्याचा अवश्य वापर करा. 

१. गोमूत्र २. गोमय३. गोदूध ४. गायीच्या दुधापासून बनलेले दही५. गायीच्या दुधापासून बनलेले तूप ६. कढीलिंबाची पाने ७. भस्मलेपन८. लाल मातीचे लेपन९. मध १०. गरम पाण्याचे स्नान 

हे साधे सोपे उपाय आणि गंगा मातेचे स्मरण करून स्नान करणे आपल्याला सहज जमू शकते. त्यामुळे गंगास्नानाची संधी दवडू नका आणि गंगा मातेचे आशीर्वाद पदरात पाडून घ्या.