शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : 'अमित शहांना पवार, ठाकरेंना राजकीयदृष्ट्या संपवण्याचे डोहाळे लागलेत'; ठाकरे गटाचा सामनातून हल्लाबोल
2
सदोष वेल्डिंग, कमकुवत ढाचामुळे कोसळला पुतळा; चौकशी समितीच्या अहवालात निष्कर्ष
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी करणार्‍यांना लाभाच्या संधी मिळतील; नशिबाची साथ लाभेल
4
पोर्न स्टार रिया बर्डे निघाली बांगलादेशी, बनावट कागदपत्रांसह भारतात राहिल्या प्रकरणी केली अटक
5
विधानसभा निवडणुकीचे वेध; आयोगाची आज पक्षांशी चर्चा, मुख्य सचिव, वरिष्ठ अधिकारी यांची बैठकही घेणार
6
शेतमजूर, कामगारांच्या किमान वेतनात वाढ; केंद्र सरकारचा निर्णय
7
अग्रलेख : विकास किती पाण्यात?; ‘स्मार्ट सिटी’ बनणाऱ्या शहरांना किंचितही अधिकसा पाऊस सोसवेनासा
8
बिल्किस बानो प्रकरणी फेरआढाव्याची गरज नाही; सुप्रीम काेर्टाने फेटाळली गुजरात सरकारची याचिका
9
मेडिकलच्या तीन मुलींनी घेतली सहा जणांची रॅगिंग; मुली एमडी अभ्यासक्रमाच्या
10
लोकमतच्या व्यासपीठावर सर्वपक्षीय नेत्यांची जुगलबंदी; विधानसभेनंतर आणखी पक्ष आमच्याकडे येतील : मुनगंटीवार
11
ड्युटीवरून गायब झालेले १२ पोलिस निलंबित; आरबीआयच्या संरक्षणाची होती जबाबदारी
12
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
13
कॅन्सरवरील उपचार सुसह्य होण्यासाठी आता ‘डॉग थेरपी’; टाटा रुग्णालयात मुलांसाठी अनोखा उपक्रम
14
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
15
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
16
शासकीय रुग्णालयांत हृदयविकारांवर अत्याधुनिक उपचार; जे.जे. मध्येही आता ईपी लॅब, ३९ कोटी मंजूर
17
नऊ प्रकल्पांच्या निधीची चिंता मिटली; एमएमआरडीएला ‘पीएफसी’कडून ३१,६७३ कोटींचे कर्ज मंजूर
18
नवी मुंबई विमानतळ सुखोईच्या लँडिंगसाठी सज्ज; सिडकोचे विजय सिंघल यांची माहिती
19
‘काैटुंबिक हिंसाचार कायदा सर्व धर्मांतील महिलांना लागू’
20
मधुमेह, जीवनसत्त्वे, रक्तदाबावरील गोळ्यांसह ५३ औषधे ठरली निकृष्ट दर्जाची

Ganga Saptami 2024: गंगासप्तमीनिमित्त जाणून घ्या गंगेच्या उगमाचे ठिकाण!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 7:00 AM

Ganga Saptami 2024: आज गंगा सप्तमी; त्यानिमित्त गंगा मातेचा उगम कुठे झाला व तिथे स्थित असलेले मंदिर कसे आहे त्याबद्दल जाणून घेऊया. 

असे म्हणतात, की ऋषींचे कुळ आणि नदीचे मूळ शोधू नये. तसे असले तरीदेखील आपल्या पौराणिक कथांच्या आधारे आपल्याला गंगा मातेचे मूळ नक्कीच सापडले आहे. १४ मे रोजी गंगासप्तमी (Ganga Saptami 2024) अर्थात गंगा नदीची जयंती आहे. त्यानिमित्त जाणून घेऊया या स्थानाविषयी!

गंगोत्री मंदिर" हे भारताच्या उत्तराखंड राज्याच्या उत्तरकाशी जिल्ह्यापासून १०० किमी अंतरावर आहे. पौराणिक मान्यतेनुसार, माता गंगा पृथ्वीवर अवतरली ती जागा "गंगोत्री तीर्थ" म्हणून ओळखली जाते. गंगोत्री हे उत्तराखंड राज्यात वसलेल्या गंगा नदीचे उगमस्थान मानली जाते. 

गंगोत्री मंदिर हे हिंदूंचे पवित्र आणि तीर्थक्षेत्र आहे. हे मंदिर भारतातील सर्वात प्रमुख मंदिर आहे. गंगोत्री मंदिर भागीरथी नदीच्या काठी वसलेले आहे. यमुनोत्री धाम नंतर येणारा चार धाम यात्रेचा दुसरा मुक्काम याठिकाणी केला जातो. हे मंदिर हिमालयाच्या रांगेत ३१०० मीटर (१०,२०० फूट) उंचीवर आहे. येथे गंगेचे मंदिर आणि सूर्य, विष्णू आणि ब्रह्मकुंड सारखी पवित्र स्थाने आहेत.

पौराणिक कथेनुसार :-भगवान श्री रामचंद्रांचे पूर्वज असलेल्या रघुकुलचा चक्रवर्ती राजा भगीरथ याने येथे एका दगडावर बसून भगवान शंकराची प्रचंड तपश्चर्या केली होती. त्याच्या विनंतीवरून स्वर्गातील गंगा पृथ्वीवर येणार होती. मात्र तिचा जलप्रपात अडवण्यासाठी भगवान शंकरांनी आपल्या जटा मोकळ्या करून तिला धारण केले आणि नंतर या स्थानावर जटा आपटून तिला मोकळे केले. त्या खुणा आजही गंगोत्रीजवळ बघायला मिळतात. त्यावेळेस गंगा मातेचा पृथ्वीला पहिला स्पर्श झाला, तेच हे ठिकाण!

दुसरी कथा अशी आहे की महाभारताच्या युद्धात मरण पावलेल्या सैनिकांच्या आत्मशांतीसाठी पांडवांनीही या ठिकाणी मोठा देव यज्ञ केला होता. त्या यज्ञाचे फलित म्हणून गंगा माता पृथ्वीवर अवतीर्ण झाली. 

"गौमुख" गंगोत्रीपासून १९ किमी अंतरावर, समुद्रसपाटीपासून सुमारे ३,८९२ मीटर उंचीवर आहे. हे गंगोत्री हिमनदीचे मुख आणि भागीरथी नदीचे उगमस्थान आहे. इथल्या पाण्यात आंघोळ केल्याने सर्व पापे धुऊन जातात अशी भाविकांची श्रद्धा आहे. 

गंगोत्री मंदिर १८ व्या शतकात बांधले गेले. शंकराचार्यांनी या ठिकाणी गंगादेवीची मूर्ती स्थापन केली होती. पुढे गोरखा सेनापती अमरसिंह थापा यांनी मंदिर आणखी सुबक बांधले. तर २० व्या शतकात जयपूरचे राजा माधो सिंग याने मंदिराचा जीर्णोद्धार केला. 

गंगोत्री मंदिर पांढऱ्या शुभ्र ग्रॅनाईटपासून बनवलेले आहे. शिवलिंगाच्या रूपात एक नैसर्गिक खडक भागीरथी नदीत बुडलेला आहे. हे दृश्य अतिशय सुंदर आणि आकर्षक आहे. गंगा नदीची पातळी कमी झाल्यावर संध्याकाळी गंगोत्री मंदिराजवळ त्या नदीत बुडलेल्या पवित्र शिवलिंगाचे दर्शन होते.

दरवर्षी मे ते ऑक्‍टोबर या काळात लाखो भाविक गंगोत्रीला गंगामातेचे दर्शन घ्यायला येतात. दिवाळीच्या सुमारास तेथील तपमान कमी होत असल्याने गंगोत्रीचे दर्शन पुढच्या सहा महिन्यासाठी स्थगित केले जाते.

टॅग्स :Templeमंदिर