शहरं
Join us  
Trending Stories
1
हाती 'धनुष्यबाण', कुडाळमधून विजयाचा निर्धार; शिवसेना प्रवेशानंतर निलेश राणे भावूक
2
मावळमध्ये भाजपाचा सांगली पॅटर्न; राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का देण्याची तयारी
3
मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; नाशिकमध्ये भाजपाला अन् पालघरमध्ये काँग्रेसला धक्का
4
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
5
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
6
'सीमेवरील शांततेला प्राधान्य', पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात 50 मिनिटांची बैठक
7
Mahayuti Seat update: साताऱ्यात महायुतीचा विद्यमान आमदारांवरच भरोसा! 
8
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाच्या नसरल्लाहनंतर आता हाशिम सफीद्दीनचाही केला खात्मा
9
Maharashtra Election 2024: भाजपसमोर बंड थंड करण्याचे आव्हान; नाशिकमध्ये समीकरण काय?
10
मोठी बातमी: CM शिंदेंविरोधात केदार दिघे; ठाकरेंच्या शिवसेनेकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
11
तुर्कीची राजधानी अंकारामध्ये मोठा दहशतवादी हल्ला; अनेकांचा मृत्यू
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सकाळी पक्षप्रवेश अन् संध्याकाळी मिळालं तिकीट; के.पी. पाटलांना दिली उमेदवारी; शाहूवाडीतही शिलेदार मैदानात उतरवला
13
मुंबईतील 'या' १३ जागांवर ठाकरेंचे शिलेदार ठरले; शिवडी मतदारसंघात ट्विस्ट? 
14
जागावाटपाआधीच ठाकरेंकडून AB फॉर्म वाटप; नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेस बंडखोरी करणार
15
जालन्यात शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांविरोधात रावसाहेब दानवेंच्या भावाने ठोकला शड्डू
16
Madha Vidhan Sabha 2024: चार वेळा काँग्रेस, पाच वेळा राष्ट्रवादी, शेकापला एकदा मिळाली संधी!
17
अद्भुत! झिम्बाब्वेने ट्वेंटी-२० मध्ये केल्या तब्बल ३४४ धावा; सिकंदर रझाची झंझावाती खेळी
18
Maharashtra Vidhan Sabha Election : बारामतीचं ठरलं! काका विरोधात पुतण्या निवडणूक लढणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत
19
Virat Kohli Record : पुण्याच्या मैदानात किंग कोहलीच्या निशाण्यावर असतील हे ५ विक्रम 
20
फडणवीसांची शिष्टाई, राज पुरोहित आणि राहुल नार्वेकरांमध्ये दिलजमाई, कुलाब्यातील बंड शमवण्यात भाजपाला यश 

गा-हाणे गणराजाला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2020 3:25 AM

यक्ष कुळातील देवता म्हणून ओळखला जाणारा गणपती प्रथमत: विघ्नहर्ता म्हणून लौकिक पावला.

- प्रा. डॉ. प्रकाश खांडगेकोरोनाच्या महासंकटात भाद्र्रपदात श्रीगणेशाचे आगमन होत आहे. गणपती हा खरे म्हणाल तर संकटमोचक, विघ्नहर्ता. यक्ष कुळातील देवता म्हणून ओळखला जाणारा गणपती प्रथमत: विघ्नहर्ता म्हणून लौकिक पावला. त्याचे वंदन आणि संकीर्तन मानवाने सुरू केले. प्रत्येक कार्याच्या आरंभी आणि नंतर त्याचे रूप विघ्नहर्ता, विघ्नविनाशक असे आहे.विघ्नहर्ता गणपती सर्व विद्या आणि कलांचा अधिपती साक्षात गणनायक, लोकनायक! गणपतीची विविध रूपे जशी ग्रंथात पाहायला मिळतात तशीच ती विविध लोककलांमध्ये पाहायला मिळतात. कोकणात मंगलकार्य सिद्धीसाठी गाºहाणे घालण्याची परंपरा आहे. दशावतारी खेळाचे पूर्वी अथवा चित्रकथी, कळसूत्री बाहुल्यांच्या खेळाच्या वेळी ‘जय देवा महाराज्या’ असे म्हणून गणपतीला गाºहाणे घातले जाते. हीच परंपरा पुढे मालवणी भाषेतल्या नाटकांमध्ये चालू झाली. ‘मालवणी नटसम्राट’ अशी ओळख असणाऱ्या मच्छिंद्र कांबळी यांच्या ‘वस्त्रहरण’मधील गाºहाण्याचा खेळ जवळजवळ पंधरा मिनिटे सुरू असतो. तो पाहताना प्रेक्षकांची हसूनहसून मुरकुंडी वळते. नेमकी हीच परंपरा डॉ. तुलसी बेहेरे यांनी उचलली. १९८०-८१मध्ये आयएनटी लोक प्रायोज्य कला संशोधन केंद्रातर्फे सादर झालेल्या ‘दशावतारी राजा’ नाटकात राजा मयेकर यांनी गाºहाणे घातले तर पुढे संतोष पवार यांच्या ‘यदा कदाचित’ नाटकातही गाºहाणे घातले गेले आहे. कोकणातील नाट्य संमेलने, साहित्य संमेलनांत गाºहाणे हमखास घातले गेले.दे पायाची जोड। मोरया दे पायाची जोड।तुजवीण कवणा। शरण मी जावू।नाम तुझे बहु गोड। मोरया दे पायाची जोड।नाना दु:खे भोगुनि सारी।विषय वासना सोड।दे पायाची जोड। मोरया दे पायाची जोड।अशी आर्त हाक कोरोनाच्या महासंकटात चित्रकथी परंपरेद्वारे पिंगुळीचे बाहुलेकार चित्रकथी देत आहेत. कोरोनाने संपूर्ण मानवजातीला विषाणूरूपी विळखा दिला आहे. गणपती बाप्पाला गाºहाणे घालून कोरोनाची महापिडा दूर करण्याची विनंती आम्ही सर्व लोककलावंत करीत आहोत असे चित्रकथी, बाहुलेकार परशुराम गंगावणे यांनी सांगितले. कोरोनाच्या महामारीवर मूळच्या मालवणी असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीच्या माजी विद्यार्थिनी सविता मेस्त्री यांनी घातलेले गाºहाणे मोठे बोलके आहे.बा देवा गणपती गजानना आज ही कोरोना नावाची महामारी संपूर्ण जगात इली हा त्याचो संपूर्ण नायनाट कर आणि जैसून ही पीडा इली हा त्याच्या मुळावर घाव घालून त्याका जागेवर बसव. त्या कोरोनामुळे कोनाक काय करीन सारख्या नाही रहवल्या. त्याका चांगला करण्याची बुद्धी दी. कोरोनाने आजारी पेशन्टचा लाखोंचा बिल लावतात त्या डॉकटरांका सुबुद्धी दे महाराजा... व्हयं महाराजा...तमाशा कलावंत, जागरण, गोंधळातील कलावंतदेखील गणपतीला विघ्न निवारणासाठी पाचारण करतात ते असे-या गणा या या रणा याविघ्न हाराया तारा यारंगणी माज्या अंगणीनाचत येई तू गौरी हराकोरोना मानवजातीचे हे आर्त गाºहाणे ऐकेल अशी भाबडी आशा आहे. निसर्ग आणि पर्यावरणाचा समतोल ढासळू देणाºया मानवाला कोरोना ही अद्दल घडवतोय काय? लोककलावंतांवर आता उपासमारीची वेळ भर गणेशोत्सवात आली आहे त्यामुळे गणेशाला गाºहाणे अटळ आहे.(लेखक मुंबई विद्यापीठाच्या शाहीर अमरशेख अध्यासनाचे समन्वयक आहेत.)