आज ११ डिसेंबर गीता जयंती (Geeta Jayanti 2024) अर्थात कृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली तो दिवस आणि आजच आहे मोक्षदा एकादशी (Mokshda Ekadashi 2024)! मनुष्याला मोक्ष मरणोत्तर मिळतो, पण जिवंतपणी ज्या नरक यातना भोगाव्या लागतात, त्यातून मोक्ष अर्थात मुक्ती मिळण्यासाठी काही श्रीकृष्ण मंत्र दिले आहेत.
मनापासून हाक मारली, तर देवही धावून येतो, अशी आपली देवाप्रती श्रद्धा आणि अतूट विश्वास आहे. अशात भगवान कृष्णाने तर गीतेत वचन दिले आहे,'संभवामि युगे युगे!' म्हणजेच भक्त अडचणीत असेल, तर भगवंत त्याच्या मदतीला धावून जातात. श्रीकृष्णाचा मनापासून आठव केला, तर आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतात. सद्यस्थितीत सर्वत्र साथीचा रोग आणि नकारात्मकता पसरलेली आहे. अशा परिस्थितीशी सामना करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाचे या मंत्रांचे जप केल्यास तुमचे मन शांत होईलच, शिवाय त्रास व संकटेही दूर होतील.
हे कृष्ण द्वारकावासिन् क्वासि यादवनन्दन।आपद्भिः परिभूतां मां त्रायस्वाशु जनार्दन।।
जीवनात एखादी मोठी आपत्ती किंवा संकट येत असेल तर किमान १०८ वेळा या मंत्रजप करावा. परंतु लक्षात ठेवा की मंत्र जप करणे प्रामाणिक मनाने आणि पूर्ण निष्ठा आणि श्रद्धेने केले पाहिजे. असा विश्वास आहे की या मंत्राचा जप केल्याने श्रीकृष्णाची कृपा नक्कीच प्राप्त होते.
ॐ नमो भगवते तस्मै कृष्णाया कुण्ठमेधसे। सर्वव्याधि विनाशाय प्रभो माममृतं कृधि।।
श्री कृष्णाचा हा गूढमंत्र आहे, ज्यामुळे सर्व प्रकारचे भय, संकट आणि रोग दूर होण्यास मदत होते. जीवनातले अडथळे दूर करण्यासाठीही हा मंत्र प्रभावी आहे. सकाळी झोपेतून उठल्याबरोबर कुणाशीही न बोलता या मंत्राचा रोज तीन वेळा जप केल्याने आजार बरे होतात आणि वाईट गोष्टींचा अंत होतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
'ॐ नमो भगवते श्री गोविन्दाय'
असे मानले जाते, की जो कोणी श्रीकृष्णाच्या या मंत्राचा जप करतो त्याला सुख, समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होते.
कृं कृष्णाय नमः
हा भगवान श्रीकृष्णाचा मूळ मंत्र आहे आणि असा विश्वास आहे की या मंत्राचा जप करून व्यक्तीची संपत्ती अडकली असेल तर ती मिळू शकते. तसेच या मंत्राचा जप केल्याने कुटुंबात सुख-शांती राहते.