प्रत्येक नवीन वर्षासोबत एक दोरी बांधलेली असते, ती म्हणजे अपेक्षेची दोरी. सरत्या वर्षापेक्षा येणारे वर्ष हे आपल्यासाठी उत्तम ठरावे, अशी सर्वांचीच इच्छा, अपेक्षा असते. मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी सन २०२२ हे नवे वर्ष कसे असेल, ते पाहूया...
सन २०२२ हे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आर्थिक दृष्ट्या सामान्य असू शकेल. सन २०२२ वर्षांची सुरुवात मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी काहीशी अडखळत होऊ शकेल. मात्र, या वर्षाच्या अखेरीपर्यंत गाडी रुळावर येऊन आर्थिक आघाडीवर उत्तम परिणाम प्राप्त होऊ शकतील. वृषभ राशीच्या सप्तम स्थानी होत असलेले मंगळ ग्रहाचा प्रवेश आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकेल. एप्रिल महिन्यात गुरुचा मीन राशीतील प्रवेश आणि शनीचा कुंभ राशीतील प्रवेश हा वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी अतिशय शुभ फलदायक ठरू शकेल.
सन २०२२ च्या एप्रिल महिन्यात करिअरदृष्ट्या सकारात्मक घटना घडतील. तसेच शिक्षण क्षेत्रात कार्यरत व्यक्तींना विशेष शुभ फळे मिळतील. विद्यार्थांचे मन अभ्यासात लागेल. शिक्षणातील रुची वाढील लागेल. आर्थिक, करिअर आणि शिक्षणाच्या बाबतीतील कोणताही निर्णय घाईगडबडीत घेऊ नये, असा सल्ला दिला जात आहे. तसेच तज्ज्ञ आणि ज्येष्ठांचा विचार घेऊनच पुढील मार्गक्रमण करावे, असे सांगितले जात आहे.
प्रेमात असलेल्या मिथुन राशीच्या व्यक्तींना सन २०२२ हे वर्ष अनुकूल असणार आहे. वर्षाच्या सुरुवातीला जोडीदाराची सकारात्मक साथ लाभेल. सप्तम स्थानातील शुक्रचे संक्रमण मन आनंदी आणि प्रसन्न करणारे ठरेल. एप्रिल महिन्यात प्रेम जीवनात नवीन ऊर्जेचा संचार होईल. जोडीदाराशी असलेले संबंध मधुर होतील. प्रेम विवाहाचा विचार करू शकता.
सन २०२२ मध्ये मिथुन राशीच्या व्यक्तींना कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनात संमिश्र घटना घडू शकतील. काही समस्यांचा सामना करावा लागू शकेल. आरोग्याच्या दृष्टिने बोलायचे झाल्यास मिथुन राशीच्या व्यक्तींना अधिक सजग राहण्याची आवश्यकता आहे. आरोग्याच्या छोट्या-मोठ्या कुरबुरीकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. मिथुन राशीच्या व्यक्तींना आगामी सन २०२२ वर्ष सुख-समृद्धी आणि भरभराटीचे जावो, हीच सदिच्छा...