शहरं
Join us  
Trending Stories
1
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
2
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
3
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
4
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
5
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
6
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
7
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
8
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
9
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
10
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
11
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
12
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
13
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
14
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
15
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
16
सलमान खानच्या वडिलांना धमकी देणाऱ्या तरुणीसह दोघांना अटक
17
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
18
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
19
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)
20
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात

Gemology: ज्योतिषांच्या सल्ल्याशिवाय पुष्कराज घालताय? सर्वांनाच तो लाभतो असे नाही; वाचा हा किस्सा!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 11:42 AM

Gemology: भाग्योदयासाठी विविध रत्नांचा वापर केला जातो, मात्र तो ज्योतिष सल्ल्याशिवाय केला असेल तर कसे नुकसान होते बघा!

>> ज्योतिषी सोनाली लिखितकर

 पुष्कराज रत्न सर्वांनी घातले तर चालेल का ?अशी  विचारणा मला काही जणांनी केली होती आणि त्यावरचे माझे काही अनुभव आपल्यासमोर मांडत  आहे.  मे २००८ ची गोष्ट .एक तरुण , वय वर्षे ३२ .माझ्या कडे आला होता. त्यांचा प्रश्न होता ,मी गेले ७ वर्ष लग्न होण्याकरता प्रयत्न करतोय पण जमत नाहीय. आमच्या समाजात लवकर लग्ने केली जातात . पण माझे दर वेळी काही ना काही होऊन लग्न मोडते .कधी मुलगी पसंत पडत नाही .तर कधी मी  मुलीला पसंत पडत नाही. दोघे पसंत झालो तर घरच्यांना स्थळ पसंत पडत नाही .एकदा तर बस्ता बांधायला गेलो आणि तेथे भांडणे होऊन लग्न  मोडले .वास्तविक आम्ही दोघे लग्न करायला तयार होतो, पण घरच्या लोकांसमोर  काय करणार? शेवटी अजूनही मी अविवाहित आहे .आता माझी पत्रिका पाहून सांगा काय प्रोब्लेम आहे? मी पत्रिका पाहीली.

आता थोडे विवाह योगाविषयी सांगावे लागेल. कुंडलीतील १२ स्थानांपैकी १ आणि ६ ही स्थाने विवाहास प्रखर विरोध करतात .आता त्याची कुंडली नीट अभ्यासली. पण मला थोडासा त्रास वगळता कोणताही मोठे कारण दिसेना की ज्यामुळे लग्नच होणार नाही. मग सहज लक्ष गेले  की पत्रिकेत १ आणि ६ या स्थानाचा एकमेव कार्येश ग्रह गुरु आहे .तेवढ्यात तो म्हणाला अहो ताई, हा बघा पुष्कराज चांगला ७ कॅरटचा आहे. आमच्या गावातल्या गुरुजींनी सांगितला होता घालायला. चांगला असतो ना तो लग्नाकरता म्हणून! मी तर हादरलेच .अरे बापरे, हे कारण आहे की काय याच्या लग्न ना होण्याचे? 

मग त्याला विचारले कीती वर्षापासून घातला आहे ? तो म्हणला ५ वर्षे झाली. आता तुम्ही अजून काही खडा किंवा पूजा असेल तर सांगा मी करतो. कितीही खर्च होऊ द्या. मी आणि माझे आई वडील फार वैतागलो आहे .मी पुन्हा कुंडलीवर नजर टाकली. त्याच्या कुंडलीत बुध ग्रह विवाहाच्या दृष्टीने उत्तम वाटत होता आणि त्याची दशा म्हणजेच त्यांचा काल सुरु होणार होता नोव्हेम्बरमध्ये आणि आता तर मे महिना  होता. पण तरीही खूप काही लांब नव्हता. म्हणुन त्याला म्हणाले, "हे बघ बुध ग्रह म्हणजेच पाचू हे बुधाचे रत्न तुला फायदेशीर आहे ,पण त्याचा काल अगदी ५,६ महिन्यातच सुरु होणार असल्याने तू पाचू घातला नाहीस तरी चालेल. आपोआपच तेव्हा लग्न होईल. पण महत्वाचे म्हणजे हा पुष्कराज अगदी लगेच काढ ". तर तो म्हणाला ,"पण ताई तो तर मला लग्नाकरिताच सांगितला होता". मग मी त्याला गुरूच्या रत्नाचे त्याच्या कुंडलीत काय परिणाम आहेत ते सांगितले . आणि म्हणले ,जसे  सर्दीताप  बरा  होण्याकरिता आपण औषध घेतो पण त्याबरोबरच थंड पदार्थ ,दही इत्यादी न खाणे हे पथ्य पाळावे लागते, तसेच तुझे झाले आहे तुझा विवाह योग असून सुद्धा तू त्याला अपथ्यकर असा पुष्कराज त्यातून ७ कॅरटचा  घातलास. म्हणूनच विवाह योग असून लग्न ठरत नव्हते आणि अजून एक सोपा उपाय सांगते तो कर. असे सांगून त्याला एक उपाय सांगितला. हा उपाय तुला दर बुधवारी ७ आठवडे करावा लागेल हे पण सांगितले.

"ठीक  आहे. काढतो ताई खडा .असे म्हणुन त्याने पुष्कराज  काढला.  ताई आता तुम्ही सांगितलेले बाकी  उपाय पण करून पाहतो" असे म्हणुन तो गेला. बरोबर ३ आठवड्या नंतरच्या बुधवारी रात्री ९ वाजता त्यांचा फोन आला. अतिशय आनंदाने त्याने सांगितले.२ दिवसापूर्वी त्याने एक मुलगी पाहीली आणि दोन्ही कड्च्याना पसंत पडून लग्न ठरले आहे. मग ३,४ दिवसात पुन्हा मुहूर्त काढून द्या जुलै महिन्यातला असे म्हणुन आला. पण मी म्हणाले तुझा योग तर नोव्हेंबर मध्ये आहे .पण ताई आता घरच्यांनी या सिझनच्या शेवटचा मुहूर्त जुलै १४ आहे. त्याच्या अगोदरच लग्न करायचे ठरवले आहे .मग मी नाईलाजास्तव मुहूर्त काढून दिला .मग पुन्हा महिन्याभराने त्यांचा फोन आला .मग मी चेष्टेने  म्हणले काय रे लग्नाला बोलावले नाही का? तर म्हणाला आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरलो लग्नाच्या हॉल करिता पण कुठेच मिळेना .सर्व चांगले हॉल बुक झाले होते .शेवटी हॉलवालाच म्हणला ,"अहो तुम्हाला नोव्हेम्बर मध्ये हवा असेल तर भरपूर तारखा आहेत शिल्लक आणि मध्ये तर चातुर्मास आहे त्यात करत नाहीत ना .म्हणुन आम्ही शेवटी आता नोव्हेम्बर मध्येच ठरवलंय .आता तुम्ही नोव्हेम्बरचा मुहूर्त काढून द्या.'' मी मनातच हसले. माझ्या गुरुवर्यांना आणि कृष्णमुर्ती  पद्धत ज्यांनी तयार केली त्या कृष्ण मूर्तींना  मनोमन वंदन केले. आता त्याचे लग्न होऊन त्याला एक छान मुलगी पण झालीय ......

संपर्क व्हाट्स अप 98090447025

टॅग्स :Astrologyफलज्योतिष