यश मिळविण्यासाठी लोक हर तऱ्हेने प्रयत्न करतात. पण अनेक वेळा मेहनत करूनही फळ मिळतेच असे नाही. यामागे अनेकदा कुंडलीतील ग्रहस्थिती देखील कारणीभूत ठरते. आपल्या कुंडलीत सूर्य ग्रह कमकुवत स्थितीत असणे किंवा सूर्याशी संबंधित कोणताही दोष असणे हे अपयशाचे कारण ठरू शकते. सूर्य यश आणि आत्मविश्वासाचा कारक ग्रह असल्याने त्या ग्रहाशी संबंधित दोष दूर करण्यासाठी उपाय करणे अत्यंत आवश्यक आहे. हा उपाय खर्चिक नाही, उलट दैनंदिन जीवनात अनुसरता येण्यासारखा आहे.
गुळाचे उपाय
ज्योतिष शास्त्रानुसार, गूळ सूर्याशी संबंधित आहे आणि गुळाचे काही उपाय कुंडलीतील रवी ग्रहाला बळ देण्यासाठी खूप प्रभावी परिणाम देतात. हे सोपे उपाय जीवनातील अनेक समस्या दूर करू शकतात.
>>कोणतेही महत्त्वाचे काम सुरू करताना गूळ खाऊन सुरुवात करावी.
>>काम चालू असताना अचानक काही अडचणी उद्भवत असल्याचे जाणवल्यास रोज थोडासा देशी गुळ खावा. काही दिवसांत रखडलेली कामे मार्गी लागतील.
>>कुंडलीत सूर्य दोष असल्यास तो दूर करण्यासाठी वाहत्या पाण्यात गुळाचा गाळा टाकावा. याशिवाय ८०० ग्रॅम गहू आणि ८०० ग्रॅम गूळ ८ दिवस मंदिरात अर्पण करा. हा उपाय रविवारपासून सुरू करा. सूर्यदोष दूर करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे.
>>नोकरीसाठी मुलाखतीला जाताना गूळ खाऊन बाहेर जा. तसेच वाटेत गायीला पीठ आणि गूळ खाऊ घाला. मुलाखतीत यश मिळण्याची शक्यता बळावते.
>>जीवनातील संकटे तुमचा पाठलाग सोडत नसतील तर संकटनिवारक हनुमानाला दर शनिवारी गूळ-हरभरा प्रसाद अर्पण करा, फायदा होईल.
पूर्वीच्या काळी घरी आलेल्याला गूळ पाणी देण्याची पद्धत होतीच, आज त्याचा वापर थोडा आपल्या उन्नतीसाठीदेखील करून पाहूया. जेणेकरून गुळाचा गोडवा आपल्या आयुष्यात उतरायला थोडाफार हातभार लागेल.