दर महिन्याच्या एक तारखेला किशोर कुमार यांनी गायलेले आणि सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेले 'खुश है जमाना आज पहली तारीख है', या गाण्याची आठवण येतेच. नवा दिवस, नवा महिना, नवी सुरुवात आणि पगाराचा दिवस. याहून दुग्धशर्करा योग तो कोणता? मात्र, आजची १ तारीख विशेष आहे. कारण, सर्वांच्या संयमाचा कस पाहणाऱ्या २०२० च्या शेवटच्या महिन्याची सुरुवात तिने करून दिले आहे. लवकरच हे वर्ष संपून, आगामी वर्षाचे स्वागत करायला शिल्लक राहिलेत केवळ ३० दिवस.
हेही वाचा : लग्न मुहूर्तावरच का करावे; सांगत आहेत गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे
हिंदूंचे नवेवर्ष जानेवारीपासून सुरू होत नसले, तरी जगराहाटीनुसार नव्या वर्षाचे स्वागत १ जानेवारी रोजी केले जाते. २०२० कडून लोकांच्या अनेक अपेक्षा होत्या, परंतु कोरोनाच्या महामारीने सर्व अपेक्षांवर पाणी फिरवले. २०२० मध्ये लोकांना घरात बसवून कोव्हीडने घातलेला धुमाकूळ, झाकलेले आणि ओळख हिरावून घेतलेले चेहरे तसेच हिरावून नेलेली आपुलकीची माणसे, यातले काहीही विसरण्याजोगे नाही. परंतु, कवी केशवसुत म्हणतात,
जुने जाऊद्या मरणालागुनी, जाळुनी किंवा पुरुनी टाका,सडत न एक्या ठायी ठाका, सावध! ऐका पुढल्या हाका!
गतवर्षाने तुतारी फुंकून आपल्याला खडबडून जागे केले आहे. आता सावधतेने आणि नव्या जोशाने आपल्याला पुढील प्रवास करायचा आहे. स्वत:ला आणि देशाला आत्मनिर्भर बनवायचे आहे. यासाठी संघटित होणे गरजेचे आहे. ते काम आपले सण, उत्सव सातत्याने करत असतात. यातून एकात्मतेचे बीज मनात रुजवूया आणि उद्याचा अजिंक्य भारत घडवूया. त्यासाठी आगामी वर्षातील आनंदोत्सवाची खैरात पुढीलप्रमाणे-
२६ जानेवारी मंगळवार प्रजासत्ताक दिन१६ फेब्रुवारी मंगळवार बसंत पंचमी ११ मार्च गुरुवार महाशिवरात्री२८ मार्च रविवार होळी२९ मार्च सोमवार धूलिवंदन१३ एप्रिल मंगळवार गुढीपाडवा२१ एप्रिल बुधवार रामनवमी१४ मे शुक्रवार अक्षय्यतृतीया २० जुलै मंगळवार आषाढी एकादशी२४ जुलै शनिवार गुरु पौर्णिमा१३ ऑगस्ट शुक्रवार नागपंचमी१५ ऑगस्ट रविवार स्वातंत्र्य दिवस३० ऑगस्ट सोमवार श्रीकृष्ण जयंती३१ ऑगस्ट मंगळवार गोपाळकाला१० सप्टेंबर शुक्रवार श्रीगणेश चतुर्थी०७ ऑक्टोबर गुरुवार नवरात्र प्रारंभ१५ ऑक्टोबर शुक्रवार विजयादशमी०२ नोव्हेंबर मंगळवार धनत्रयोदशी
हेही वाचा : सुख पाहता जवापाडे असे तुकाराम महाराजांनी का म्हटले आहे?