शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
2
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
3
हृदयद्रावक! दुसऱ्यांच्या मुलांना वाचवण्यासाठी जीव धोक्यात घातला, पण स्वतःच्या जुळ्या मुली गमावल्या
4
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल
5
PM मोदींच्या नावे आणखी एक उपलब्धी; नायजेरियाच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मान
6
श्रीदेवीसोबत कसं होतं नातं? माधुरी दीक्षितचा खुलासा; म्हणाली, "आम्ही कधीच एकत्र..."
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
8
"माझा मुलगा ॲनिमलमधील रणबीरसारखा", अल्लू अर्जुनचं लेकाबाबत वक्तव्य, म्हणाला- "जर मी त्याच्या आईबरोबर..."
9
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
10
भारताकडून हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, मोजक्या देशांच्या यादीत मिळवलं स्थान
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
12
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
13
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
14
मुंबईमध्ये अपक्षांना थारा नाहीच! ३६ मतदारसंघांतील आकेडवारी काय सांगते?
15
मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?
16
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
17
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड
18
Chalisgaon Vidhan Sabha: जुन्या पक्क्या मित्रांमध्ये रंगली आहे कट्टर लढत!
19
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
20
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले हे निर्णय विधानसभा निवडणुकीत ठरू शकतात गेमचेंजर

कमावल्याशिवाय गमावल्याचे दुःख कळत नाही; वाचा ही बोधकथा!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2021 6:05 PM

आपल्यालाही कोणत्याही गोष्टीचे मोल ती वस्तू स्वकष्टाने कमावल्याशिवाय कळत नाही. व्यावहारिक जगाची कमाई एवढी कठीण तर विचार करा, परमेश्वाराला कमावणे किती कठीण असेल...!

श्रीमंत वडिलांचा एकुलता एक मुलगा अत्यंत आळशी होता. सगळी सुखं त्याच्या पायाशी लोळण घेत होती. त्यामुळे आपण उठून काही कमवावे, असे त्याला कधीच वाटले नाही. तरुण पणी आळसावलेले शरीर रोगांचे माहेरघर होईल की काय अशी वडिलांना काळजी वाटू लागली. आपण केलेल्या अति लाडाचा त्यांना पश्चात्ताप होऊ लागला. मुलाला काहीतरी करून कामासाठी उद्युक्त केले पाहिजे, असे त्यांनी ठरवले. 

मुलाने वडिलांकडे नवीन गाडीची मागणी केली. वडिलांनी मागणी स्वीकारली पण एक अट घातली. ती म्हणजे, तू काहीतरी कमावल्याशिवाय गाडी मिळणार नाही. मुलाला वाटले वडील मस्करी करत आहेत. पण त्यांच्या बोलण्यात यावेळेस कठोरपणा होता. त्यांनी घातलेल्या अटीनुसार मुलाने कमाईचे साधन कसे मिळेल याचा विचार केला. त्याला काळजीत पाहून आईने त्याला पैसे दिले आणि मुलगा खुश झाला. संध्याकाळी वडील आल्यावर त्याने ते पैसे वडिलांना दिले. वडिलांना त्याच्या पैशांचा स्रोत लक्षात आला. त्यांनी त्याच्या देखत ते पैसे विहिरीत टाकले आणि स्वकमाईचे पॆसे आण असे सांगितले. 

कधीही कष्ट न घेतलेल्या मुलाला पैसे कमवणे हे मोठे आव्हान वाटले. पण डोळ्यासमोर चकाकती गाडी दिसत होती. एक दिवसात असे काय काम केले तर आपल्याला पैसे मिळतील, याचा विचार करण्यात अर्धा दिवस संपला. सायंकाळी वडिलांच्या हाती पैसे ठेवावे लागणार या भीतीने त्याने मिळेल ते काम पत्करायचे ठरवले. काही अंतरावर बांधकाम सुरु होते. त्याने तिथे रोजंदारीचे काम मिळेल का अशी विचारणा केली आणि त्याच्या सुदैवाने त्याला काम मिळालेही. 

चार तास न थांबता वीस ते तीस पोती उचलून टाकल्यामुळे सायंकाळी त्याला पन्नास रुपये मिळाले. ते पाहून त्याच्या डोळ्यात पाणी आले. एवढी मेहनत करून एवढेच पैसे? तो निमूटपणे घरी आला. आईने त्याला जेवू खाऊ घातले. वडील येताच त्याने थरथरत्या पायांवर उभं राहत पन्नास रुपये पुढे केले. वडिलांना कळले, हे पैसे त्याच्या स्वतःच्या कमाईचे होते. पण त्यांनी मुद्दाम ते पैसे घेऊन विहिरीकडे फेकायला हात उचलला, तेवढ्यात मुलगा ओरडला आणि म्हणाला, 'बाबा हे पैसे फेकू नका, माझ्या कष्टाचे आहेत.' 

तेव्हा वडिलांनी त्याला घट्ट मिठी मारत म्हटले, 'बेटा आज तुला कमवण्याचे आणि गमावण्याचे खरे मोल कळले. इतके दिवस तू केवळ उधळपट्टी करत होतास, आता खऱ्या अर्थाने तू सुज्ञ झाला आहेस, त्यामुळे माझ्या संपत्तीचे योग्य नियोजन तू निश्चित करू शकशील याची मला खात्री आहे.'

अशाच रीतीने आपल्यालाही कोणत्याही गोष्टीचे मोल ती वस्तू स्वकष्टाने कमावल्याशिवाय कळत नाही. व्यावहारिक जगाची कमाई एवढी कठीण तर विचार करा, परमेश्वाराला कमावणे किती कठीण असेल...!