शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
2
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
3
हृदयद्रावक! दुसऱ्यांच्या मुलांना वाचवण्यासाठी जीव धोक्यात घातला, पण स्वतःच्या जुळ्या मुली गमावल्या
4
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
6
"माझा मुलगा ॲनिमलमधील रणबीरसारखा", अल्लू अर्जुनचं लेकाबाबत वक्तव्य, म्हणाला- "जर मी त्याच्या आईबरोबर..."
7
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
8
भारताकडून हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, मोजक्या देशांच्या यादीत मिळवलं स्थान
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
10
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
11
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
12
मुंबईमध्ये अपक्षांना थारा नाहीच! ३६ मतदारसंघांतील आकेडवारी काय सांगते?
13
मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?
14
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
15
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड
16
Chalisgaon Vidhan Sabha: जुन्या पक्क्या मित्रांमध्ये रंगली आहे कट्टर लढत!
17
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
18
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले हे निर्णय विधानसभा निवडणुकीत ठरू शकतात गेमचेंजर
19
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
20
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन

Gudi Padwa 2022 : भगवा ध्वज हिंदू धर्माची ओळख का बनला? गुढीइतकेच त्यालाही मानाचे स्थान का? ते जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 3:19 PM

Gudi Padwa 2022 : केशरी ध्वज ही केवळ सांस्कृतिक खूण नाही तर त्यात दडली आहे हिंदुत्त्वाची व्याख्या!

हिंदू धर्मात केशरी, लाल, पांढरा, पिवळा या रंगाचा अधिकतर वापर केला जातो. नवीन वर्षाच्या निमित्तानेदेखील अनेक ठिकाणी गुढीच्या बरोबरीने भगवा ध्वज उंचावला जातो. ही परंपरा रामायणाच्या आधीपासून सुरू आहे. विजयोत्सवाचे प्रतीक असलेला भगवा ध्वज काय दर्शवतो, ते जाणून घेऊया.

>>केशरी अर्थात भगवा रंग त्याग, बलिदान, ज्ञान, पावित्र्य, सेवा यांचे प्रतीक आहे. सनातन धर्मात साधू संत मुुमुक्षू होऊन मोक्ष मार्गावर चालण्याचा संकल्प करतात, तेव्हाही केशरी वस्त्रे परिधान करतात. वारकरी पंथातही केशरी ध्वज उंचावतात. 

>>केशरी वस्त्र संयम, संकल्प आणि आत्मनियंत्रणाचे प्रतीक मानला जातो. ज्याप्रमाणे पवित्र अग्नी प्रज्वलित झाल्यावर त्यातून केशरी ज्वाला निघतात, त्याप्रमाणे साधू संत आपल्या तपश्चर्येच्या तेजाने तप्त होतात, तेव्हा त्यांची काया केशरी रंगासमान भासते.

>>केशरी रंग दुर्गा माता, हनुमंत, गणपतीदेखील धारण करतात. त्यामुळे या रंगाबरोबरच त्यांची ऊर्जा आणि आशीर्वाद प्राप्त होतात.

>>रामायण, महाभारत असो नाहीतर शिवरायांचा काळ, त्या सर्वांनी विजयाचा निदर्शक म्हणून भगवा ध्वज फडकवला. सनातन धर्मानेदेखील भगवा ध्वज स्वीकारला. तर स्वातंत्र्योत्तर काळात भारताच्या ध्वजातही केशरी रंग वापरण्यात आला. 

>>अंधारातही चमकून दिसेल, ही केशरी रंगाची खासियत असते. म्हणून द्रुतगती मार्गावर केशरी रंगाचे पट्टे रेखाटले असतात. याचाच दुसरा अर्थ केशरी रंग अंधारावर, अधर्मावर, अंधश्रद्धेवर मात करणारा आहे, म्हणून केशरी ध्वजाचा वापर होतो.

>>केशरी हा सूर्योदयाचादेखील रंग आहे. सूर्य आणि पृथ्वी यांचे घनिष्ट नाते आहे. सूर्योदय झाल्याशिवाय पृथ्वीचे कामकाज सुरू होत नाही, त्याप्रमाणे धर्माचा उदय झाल्याशिवाय समाज जीवनाचे चलनवलन होणार नाही. म्हणून हिंदू धर्माचा ध्वज केशरी रंगाचा आहे.

>>केशरी रंग शौर्य, बलिदान आणि वीरतेचे प्रतीक आहे. तसेच तो मांगल्याचेही प्रतीक आहे. म्हणून नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर शोभा यात्रांमध्ये केशरी ध्वज उंचावून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. आपणही आपल्या घरावर, खिडकीवर केशरी ध्वज फडकवून मांगल्याचा उत्सव साजरा करूया. 

टॅग्स :gudhi padwaगुढीपाडवा