शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मीरमध्ये ऐन उन्हाळ्यात ढगफुटी; अचानक आलेल्या पुरात २ जण वाहून गेले, १०० लोकांना वाचविले
2
अमेरिकेला राजा नको...! हजारो अमेरिकन डोनाल्ड ट्रम्प विरोधात रस्त्यावर; हिटलरची उपमा...
3
राज-उद्धव एकत्र येण्याची चर्चा, मात्र मनसेनं घेतला असा पवित्रा, संदीप देशपांडे म्हणाले,"महाराष्ट्रासाठी एकत्र येणं म्हणजे…”,,
4
वधू-वरांनी एकमेकांना हार घातले; लग्नही झालं, पण, एका घटनेमुळे झाला घोळ, त्यानंतर...
5
मोबाइल सिग्नल वृद्धीसाठी मुंबई मेट्रोच्या आयबीएस सेवेचे दर दूरसंचार कंपन्यांना अमान्य
6
परभणीत लहान मुलांच्या वादातून दोन गटांमध्ये तुफान दगडफेक, वाहनांची नासधूस, शहरात तणावपूर्ण शांतता
7
बांगलादेशने तोडला इंदिरा गांधी-मुजीब उर रहमान यांच्या काळातील करार, सीमेवर केलं असं कृत्य 
8
विशेष लेख: तहव्वुर राणाला आणले, मेहुल चोक्सीचे काय? प्रत्यार्पणाचा इतिहास
9
"आता सुरूवात झालीय, येत्या काळात..."; देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीला इशारा
10
विद्यार्थ्यांने धागा काढला नाही, म्हणून परीक्षेला बसवले नाही; कॉलेजच्या प्राचार्य अन् कर्मचाऱ्यांवर कारवाई
11
ट्रम्प यांच्या धोरणांविरुद्ध हजारो लोक रस्त्यावर उतरले, देशभर निदर्शनांची नवी लाट
12
सावध व्हा,  आलाय नवीन स्कॅम! तुम्ही तीर्थयात्रेचे पॅकेज ऑनलाइन बुक केले आहे का?
13
नियमांचे उल्लंघन कराल, तर वाळू डेपो होणार रद्द; महसूल मंत्र्यांचा इशारा
14
"घटस्फोट झाला तर मी मरून जाईन", इमरान खानची Ex पत्नी डिव्होर्सवर पहिल्यांदाच बोलली
15
बांगलादेशात हिंदू नेत्याची अपहरण करून निर्घृण हत्या, भारताने केला तीव्र निषेध
16
लग्न झालं, वधूच्या डोक्यावरचा पदर उचलला, पाहतो तर काय, आत होती नवरीची विधवा आई, तरुणाची फसवणूक 
17
आफ्रिकेतील बोत्स्वानातून आणणार आणखी ८ चित्ते; पुढील महिन्यापर्यंत ४ चित्ते दाखल होण्याची शक्यता
18
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? आम्हाला काहीच फरक पडणार नाही : शिंदेसेना
19
आजचे राशीभविष्य - २० एप्रिल २०२५, सर्व दृष्टींनी लाभदायी दिवस, सामाजिक क्षेत्रात सक्रीय राहाल

Gudi Padwa 2025: गुढीपाडवा ते रामनवमी रोज १३ वेळा रामरक्षा म्हणून साजरी करा चैत्र आणि राम नवरात्र!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 11:59 IST

Gudi Padwa 2025: रामरक्षा हे केवळ स्तोत्र नाही तर संरक्षण कवच आहे, हा मंत्र सिद्ध करण्यासाठी राम नवरात्रीसारखे दुसरे उत्तम औचित्य नाही!

यंदा ३० मार्च २०२५ रोजी गुढी पाडवा(Gudi Padwa 2025) आहे आणि त्या दिवसापासून चैत्र नवरात्र(Chaitra Navratri 2025) सुरू होत आहे, तिलाच राम नवरात्र असेही म्हणतात. कारण या कालावधीत प्रभू श्रीराम चंद्रानी दुष्ट रावणाचा वध करून सीता माई आणि लक्ष्मणासह १४ वर्षांचा वनवास संपवून अयोध्येत आगमन केले होते. तो दिवस उत्सवासारखा साजरा करण्यात आला होता. अयोध्यावासियांनी दारोदारी गुढ्या, तोरणं बांधून, रांगोळ्या काढून, सजावट करून श्रीरामांचे स्वागत केले होते. गुढी हे श्रीरामांच्या विजयाचे प्रतीक म्हणून उंचच उंच बांधले गेले. तेव्हापासून हा कालावधी श्रीराम नवरात्र म्हणून साजरा होऊ लागला. ही नवरात्र राम नवमीला(Ram Navami 2025) म्हणजेच ६ एप्रिल २०२५ रोजी संपेल. 

यंदाही आपण श्रीराम नवरात्र साजरी करणार आहोत, पण थोड्या वेगळ्या पद्धतीने. राम नवमी निमित्त आपण उपासना करणार आहोत, पण त्यासाठी आधार घेऊया समाज माध्यमावर व्हायरल झालेल्या संदेशाचा! त्यात रामरक्षा स्तोत्र पठणाचे महत्त्व आणि ती सिद्ध कशी करता येईल याचा विधी दिला आहे तो समजून घ्या!

रामरक्षा कधी व किती वेळा म्हणावी?

रोज एकदा ठराविक ठिकाणी ठरावीक वेळी म्हटल्याने रामरक्षा सिद्ध होते. किंवा गुढीपाडवा ते रामनवमी ह्या काळात दररोज १३ वेळा रामरक्षा म्हटल्याने ती सिद्ध होते. 

रामरक्षाचे इतर फायदे:

१) अशुभ शक्तीपासुन बचाव करते .२) राहु - केतु महादशेचा त्रासातून मुक्ती मिळते.३) कर्जमुक्ती व कर्जवसुली साठी फायदेशीर ठरते. त्यासाठी 'आपदामपहर्तारम....' हा श्लोक १ लक्ष वेळा म्हणल्याचे ऋणमुक्ती हे फळ मिळते.४) रामरक्षेमध्ये प्रत्येक अवयवाचे स्वतंत्र पाठ आहेत त्या त्या पाठाचे सतत पठण केल्याने त्याचे स्वतंत्र फलित मिळते.उदा: कौसल्याये दृशो पातु:....हा श्लोक सतत म्हटल्याने डोळ्यांचे विकार बरे होतात...ई.

रामरक्षेचे नियम :

>>रामरक्षा आपणांस जमेल तेव्हा वर्षभरातील कोणत्याही पोर्णिमेपासुन पठण करण्यास सुरुवात करणे लाभदायक ठरते.>> रामरक्षा रोज एकदा ठरावीक ठिकाणी ठरावीक वेळीच म्हणावी. वेळ व जागा बदलु नये>>तसेच त्या त्या आजारपणात अनुकूल श्लोकपठण केल्यास आजारपणातुनही मुक्ती मिळते.>>ह्या श्लोकपठणाचे १५००० पाठ जप करणे.>> जपाच्या बरोबरीने आजारी व्यक्तीच्या नावाने अभिमंत्रित केलेले " श्री रामरक्षा सिद्ध यंत्र " सतत जवळ ठेवावे. म्हणजे त्वरीत आजारपणातुन मुक्तता होते.>>हातपाय धुवून, शुचिर्भूत होऊन रामरक्षा म्हणण्यास हरकत नाही. >>कुमार वयातील मुलांनी तर रामरक्षा नित्याने अवश्य म्हणावी. त्यामुळे वाणीवर पण योग्य संस्कार होतात व नित्य रामरक्षा पठणाने शक्ति उत्पन्न होते व ती आपले सदा सर्वकाळ रक्षण करते. आबालवृद्धांनी पण नित्य रामरक्षा म्हणावी. त्याच्यापासून निश्चित फायदा आहेच.

रामरक्षेचे अनुपालन करण्याची पण पद्धत आहे.

कोणत्याही महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेपासून सुरुवात करून शुद्ध नवमीपर्यंत हे अनुष्ठान करतात. प्रतिपदेला एकदा, द्वितीयेला दोनदा याप्रमाणे चढत्या क्रमाने वाचून नवमीच्या दिवशी नऊवेळा रामरक्षेचा पाठ म्हणावा. अनुष्ठान म्हटले की त्याच्या यमनियमांचे पालन करणे झालेच. याचा अनुभव आल्याशिवाय राहात नाही.

श्रीरामरक्षा’ ह्या स्तोत्राचे महत्व काय?

श्रीरामरक्षा या शब्दाचा अर्थ रक्षणकर्ता राम असा आहे. प्रभु रामचंद्रांना ‘मर्यादा पुरुषोत्तम‘ असे म्हणतात. प्रभु रामचंद्रांचे चरित्र अवलोकन केल्यास आपल्या असे लक्षात येईल की, प्रभु रामचंद्रांनी राजा, पिता, बंधू, पति या सर्व नात्यांनी मर्यादा सांभाळून एक फार मोठा आदर्श घालून दिला आहे. बुधकौशिक ऋषिंच्या स्वप्नात जाऊन प्रत्यक्ष प्रभु रामचंद्रांनीच रामरक्षा हे स्तोत्र सांगितले आहे. त्यामुळे रामरक्षा स्तोत्रातील प्रत्येक अक्षर हे मंत्रमय व तारक असे आहे.

टॅग्स :gudhi padwaगुढीपाडवाRam Navamiराम नवमीPuja Vidhiपूजा विधीNavratriनवरात्री