शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
2
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
9
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
10
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
11
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
12
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
13
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
14
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
15
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
16
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
17
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
18
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
19
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
20
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये

Guru Charitramrut: स्त्रियांनाही वाचायला सहज सुलभ असे गुरुचरितामृत व त्याचे नियम जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2023 12:14 PM

Guru Charitamrut: आज श्रावण वद्य पंचमी व  श्री टेमबेस्वामी महाराज यांची जयंती; जागृत करूया त्यांच्या काही स्मृती!

>> योगेश नं काटे, नांदेड 

संतकवी श्री  दासगणू महाराज आणि श्री  टेमबेस्वामी :  प.पू.दासगणु महाराज  यांनी  गुरुचरित्रसारामृत नावाची १६ अध्यायी  पोथी लिहली. या पोथीत मोठ्या गुरुचरित्रातील सर्व घटनांचा उल्लेख विस्ताराने केलेला आहे व  विशेष म्हणजे हा.ग्रंथ जे  भक्त  सोवळे कर्मठपणाने  इच्छा असुन आचारणात आणण्यास असमर्थ आहे आशांसाठी  व खास स्त्रियांसाठी सुद्धा हे गुरुचरित्रसारामृताचे लिखाण पू प दासगणु महाराज  यांनी केले आहे. याला परवानगी प पू.स्वामीनींच दिली आहे असे कुठेतरी वाचले आहे. पण  या ग्रंथाचे ज्या भाविकास पारायण करायचे त्याला साधे नियम पाळावचे लागतील ते  नियम काय व कोणतेआहेत त्याचे विवरण प.पू.अप्पांनी ग्रंथाच्या  सुरुवातीस सांगितले आहे. जिज्ञासु भाविकांनी तो ग्रंथ आवश्य घेवुन पारायण करावे. 

प.पू.स्वामी व प.पू.दादांची भेट दोनदा झाली आहे. पहिली भेट दादा जगन्ननाथाचे दर्शन घेवुन वापस येत असताना राजमेहेंद्रीस उभयतांची भेट झाली या भेटीत प.पू.स्वामीजींनी.प पू दादांना एक श्रीफळ दिले व ते शिर्डी निवासी व  दासगणुमहाराज यांचे सद्गगुरू श्रीसाईबाबा यांना देण्यास सांगितले. साईबाबा श्री  टेंबेस्वमीना त्यांचे वडील बंधु मानीत असत.प.पू. स्वामीजीं विषयी अत्यंत.आदरभावा दादांना होता . स्वामीजींचे  ही दासगणुमहाराजांवर तेवढेच प़्रेम होते. स्वामीजींचे कर्मठ आचारण व सोवळे फार कडक होते.कोणीही त्यांच्याजवळ जाण्यास धजत नसत. मात्र दासगणु महाराजांना त्यांनी कधीच आडवले नाही. हे काही त्यांच्या  शिष्यांना पटले नव्हते व त्यांनी दादांसमोरच त्यांची शंका  स्वामीजींना विचारली त्यावर स्वामीजी  गंमतीने व आराध्याबाबत निष्ठेची परीक्षा पाहावी म्हणून स्वामीजी  म्हणाले "अरे हा पंढरपुरच्या भ्रष्टदेवाचा भक्त कोणीही शिवले तर त्या देवाला चालते.मग हा कशाला फारसे सोवळे - ओवळे पाळतो त्यावर दादा हसले व नम्रपणाने उत्तर दिले  व म्हणाले " महाराज आपल्या दत्तापेक्षा माझा देव पुष्कळ बरा हं! सोवळे कमी आहे पण त्याने धर्म कधी सोडला नाही. दत्तप्रभूंनी मुस्लमानांचे रुप कितीदा तरी घेतले".हे एकताच स्वामीजी खुप मनापासुन हसले समोर बसलेल्या आपल्या शिष्यांना उद्देशुन म्हणाले " आपापल्या आराध्य देवतेवर अशी निष्ठा असावी" आपापल्या अराध्य दैवतेबदद्ल.बोलताना दोघांनाही ही या. एका वैदिक सुत्राचे महत्व  जाणले होते ते म्हणजे " एकं सत् विप्राःबहुधा वदन्ति. 

प.पू.दादा व स्वामीजींची नांदेड येथील भेट :   एकदा योगीराज टेम्बेस्वामीची स्वारी दासगणूच्या कीर्तनासाठी नांदेड येथे  पुंडलिकवाडी  येथे आली.  टेम्बेस्वामी हे. एकनिष्ठ  दत्त भक्त होते म्हणून  दासगणू  महाराजांनी त्यांनी म्हणजे (दासगणु महाराज  यांनी ) रचलेले.श्री एकनाथ चरित्र आख्यान लावले होते. टेमबेस्वामींनी पूर्ण  कीर्तन ऐकले. कीर्तन झाल्यानंतर दासगणु महाराज यांनी  टेम्बेस्वामींचे पाद्यपूजन केले या नंतर  दोघात हितगुजाच्या गोष्टी झाल्या व दासगणु महाराज यांनी  स्वामी महाराजांना विनंती केली  'शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्त शमवि आता' हे पद ऐकविण्याची विनंतीपूर्वक इच्छा प्रदर्शित केली. तेंव्हा स्वामींनी ते पद म्हटले. दासगणुं महाराज यांनी सुद्धा स्वामीजींच्या इच्छेनुसार  'दत्ता येई हो अवधूता जगन्नाथाच्या नाथा' हे प्रासादिक रसाळ काव्य गायले. नर्मदेकाठी श्रीगरुडेश्वर येथे श्री वासुदेवानंद सरस्वती यांच्या समाधीच्या दर्शनासाठी दासगणू महाराज गेले  तेंव्हा त्यांनी स्वामींवर एक पद रचलेले आहे.अस म्हणताता की  संतांचे स्वरुप वेगळे व कार्यभाग वेळा असला तरी त्यांच्यात किती एकरुपता असते  या दोन प्रसंगावरुन माझ्या लक्षात आले व वाचकांच्याही लक्षात येईल. 

।। श्रीकृर्ष्णापणमस्तू  ।। 

संदर्भः१) संतकवी दासगणु.महाराज यांचे चरित्र : लेखक: .प्रा.अ.दा.आठवले. २) सत्ससंगती - सुगंध:  लेखक: छगन महाराज बारटक्के ३) गोदातिरीचे संत श्रीदासगणू महाराज विशेषांक

टॅग्स :Shravan Specialश्रावण स्पेशल