भारतीय संस्कृती, परंपरा, संस्कार यांमध्ये गुरु आणि शिष्य यांचे नाते सर्वोपरि मानले गेले आहे. महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार मानले जातात. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली, त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन म्हणजे गुरुपौर्णिमा. गुरु हा कोणत्याही रुपात आपल्याला भेटू शकतो. ज्ञान व माहिती यांचे भंडार गुरु शिष्यासमोर खुले करतो. यातून शिष्याची प्रगती, बौद्धिक व व्यक्तिमत्त्व विकास होत असतो. जीवन सक्षमपणे जगण्याचा आत्मविश्वास गुरु शिष्याला देत असतो. प्राचीन काळापासून अवघ्या काही शतकांपर्यंत गुरुकूल पद्धतीने शिक्षण घेण्याची परंपरा आपल्याकडे होती. कालौघात ही परंपरा अगदी मोजक्या ठिकाणी आजही सुरू असल्याचे दिसते. मात्र, याचा कालावधी, पद्धती यांत अमूलाग्र बदल झालेला पाहायला मिळतो. मात्र, खऱ्या गुरुची नेमकी ओळख कशी पटवावी, याबाबत अनेकांमध्ये आजही संभ्रम असल्याचे पाहायला मिळते. एकदा संत तुकाराम महाराजांना एका युवकाने खरा गुरू कोण याबाबत एका तरुणाने प्रश्न विचारला. या प्रश्नावर तुकाराम महाराज नेमके काय म्हणाले? पाहूया...
गुरुपौर्णिमा: स्वामी समर्थ म्हणतात, सद्गुरुशी नेहमीच एकनिष्ठ असावे; वाचा, बोधकथा
एकदा तुकोबांना भेटण्यासाठी एक युवक आला. तुकोबांशी चर्चा करत असताना त्याने विचारले की, महाराज, मी एका खऱ्या गुरुच्या शोधात आहे. आपण मला याबाबत काही मार्गदर्शन करावे. यावर, तुकोबा म्हणाले की, वत्सा, खरा गुरु तेव्हाच भेटू शकेल, जेव्हा आपण सर्वोत्तम शिष्य व्हाल. युवकाने तुकाराम महाराजांना विचारले की, महाराज खऱ्या शिष्याची ओळख काय? यावर, खरा आणि सच्चा शिष्य तो असतो, जो आपले सर्वस्व गुरुचरणी अर्पण करतो. जो पूर्णपणे गुरुला शरण जातो. जो सदैव गुरुला आपल्यासोबत असल्याचे मानतो, तो खरा शिष्य.
गर्दीमागे धावू नका, स्वत:ला योग्य वाटेल तो मार्ग निवडा;वाचा ही अकबर बिरबलाची गोष्ट!
तुकोबा पुढे म्हणाले की, सच्चा शिष्य तोच असतो, जो कायम आपल्या गुरुमध्ये विठ्ठलाला पाहतो. विठ्ठलाने गुरुच्या रुपात आपले कल्याण करण्यासाठी अवतार घेतला आहे, अशी श्रद्धा कायम ज्याच्या मनी असते, तोच खरा शिष्य. तुकोबांचे बोल ऐकून तरुण स्तब्ध झाला आणि म्हणाला की, आपल्या गुरुमधील विठ्ठलरुप आपण कसे पाहू शकतो? या प्रश्नाला उत्तर देताना तुकोबा म्हणाले की, याचा एकमेव मार्ग म्हणजे भक्ती. भक्तीत ते सामर्थ्य दडलेले आहे. भक्तीमुळेच गुरुला शिष्य आणि भक्ताला भगवंत भेटू शकतो. यावर, तरुण विचारता झाला की, खऱ्या गुरुची ओळख नेमकी कशी पटवावी?
तुकोब महाराज म्हणाले की, कोणीही आपल्या मनात आले आणि गुरु बनले, असे होत नाही. लहरीपणामुळे गुरु बनलेली व्यक्ती स्वतःच्या शिष्याचे, अनुयायांचे कधीच कल्याण करू शकत नाही. गुरुपदावर विराजमान झालेल्या व्यक्तीचे मन, आत्मा पवित्र झालेले असते. ज्यांच्या व्यक्तिमत्त्वात केवळ विठ्ठल सामावलेला आहे, अन्य काही. ज्याने अहंभाव सोडून केवळ विठ्ठलाला मनात, विचारात, आत्म्यात स्थान दिले आहे. अशा व्यक्तीला गुरुपदी पोहोचण्याचा अधिकार केवळ विठ्ठलच देऊ शकतो, असे उत्तम तुकोबांनी दिले. तो तरुण तुकोबांचरणी नतमस्तक झाला आणि मला तुमचा शिष्य करून घ्या, अशी विनंती केली.