शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

Guru Purnima 2024: तुम्हाला अजून मनासारखे गुरु भेटले नाहीत? गोंदवलेकर महाराजांचा उपदेश तुमच्यासाठी!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2024 3:41 PM

Guru Purnima 2024: गुरु करावा असे सगळेच सांगतात, पण गुरुंचा शोध नेमका घ्यायचा कधी आणि कुठे, त्याबाबत हे मार्गदर्शन!

काय करावे हे मनुष्याला कळते, पण त्याचे मन त्याला आवरत नाही. विषयाचा उपभोग घेताना आपले मन त्यात रंगून जाते आणि त्याचे सुखदु:ख निस्तरताना मात्र आपली भ्रमिष्टासारखी चित्तवृत्ती होते. आपल्याला झालेला भ्रम नाहीसा करायला तीन गोष्टी आवश्यक आहेत.१. सद्विचार२. नामस्मरण३. सत्संगति

संत ओळखणे फार कठीण आहे. आपण त्यांच्यासारखे होऊ लागलो की मगच त्यांचा परिचय होऊ लागतो. त्यापेक्षा सद्विचार बाळगणे सोपे. भगवंताचा विचार तोच सुविचार होय. भगवंताच्या कथा ऐकाव्यात, त्याच्या लीला वर्णन कराव्यात, त्याच्या वर्णनाचे ग्रंथ वाचावेत, पण याहीपेक्षा आपल्याजवळ नेहमी राहणारे असे त्याचे नाम घ्यावे. 

तुम्ही नेहमी नाम घेत गेलात, तर तुम्हाला संत धुंडीत राहण्याची गरज न पडता, संतच अगदी हिमालयातले संत, तुम्हाला धुंडीत येऊन तुमचे काम करतील. अहो, खडीसाखर ठेवली की मुंगळ्यांना आमंत्रण करायला नको. 

तुम्ही म्हणाल, 'आम्हाहा ते करता येत नाही. पण आपण आपल्या मुलाला शाळेत घालतो आणि तो न शिकला किंवा त्याला अभ्यास येत नसला, तर पुन्हा त्याच वर्गात त्याला बळजबरीने ठेवतोच की नाही? त्याला एक विद्या आली नाही, तरी दुसरी कोणती येईल ती शिकवतोच की नाही? आणि त्याने आपल्या पोटापाण्याची व्यवस्था करायला तयार व्हावे म्हणून आपल्याला तळमळ लागली आहे का? तशी तळमळ लागली म्हणजे तुमचा गुरु प्रत्यक्ष जमिनीतून वर येईल. तो सारखा तुमच्याकरीता वाट पाहत असतो.

आई मुलाची फार तर एक जन्मापर्यंतच, म्हणजे देह आहे तोपर्यंतच काळजी करेल. पण गुरु हा जन्मोजन्मी तुमची काळजी घ्यायला तयार आहे. त्याला देह नसला तरी तो नाही असे समजू नका. देहाचे भोग येतील-जातील, पण तुम्ही सदा आनंदात राहा. तुम्हाला आता काही करणे उरले आहे असे मानू नका. गुरुभेट झाली, म्हणजे तुम्हीपणाने उरतच नाही. मात्र, गुरुला अनन्य शरण जा.

एक शिष्य मला भेटला, तेव्हा तो आनंदाने नाचू लागला. मी त्याला विचारले, `तुला एवढा आनंद कसला झाला आहे?'त्यावर तो म्हणाला, `मला आता आनंदाशिवाय काही उरलेच नाही, कारण आज मला गुरु भेटले.' जो असा झाला, त्यालाच खरी गुरुची भेट झाली. तरी तुम्ही गुरुला अनन्य शरण जा, म्हणजे तुम्ही आणखी काही करण्याची जरुरी नाही.

टॅग्स :Guru Purnimaगुरु पौर्णिमा