शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

गुरुपौर्णिमा: शंकर महाराजांचे गुरु कोण? ‘मालक’ अन् शिष्याचे अद्भूत नाते, ‘अशी’ झाली भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2024 6:43 PM

Shankar Maharaj Guru: गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शंकर महाराजांचे गुरु आणि त्यांचे गुरुंसोबत असलेले अद्भूत नाते याविषयी जाणून घ्या...

Shankar Maharaj Guru:चातुर्मासातील पहिला मोठा सण म्हणजे गुरुपौर्णिमा. आषाढ महिन्याची पौर्णिमा व्यास पौर्णिमा किंवा गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. भारतीय पंरपरा, संस्कृतींमध्ये गुरुपौर्णिमेला अनन्य साधारण महत्त्व आहे. भारतीय संस्कृतीत गुरुपरंपरा, गुरुशिष्य नाते आणि गुरु-शिष्यांची महती सांगणारी अनेक उदाहरणे देता येऊ शकतील. दत्तगुरुंचे अवतार आणि त्यांचे शिष्य दैवी आहेत. श्री शंकर महाराज अगदी अलीकडच्या काळात होऊन गेलेले सत्पुरुष. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शंकर महाराजांचे गुरु आणि त्यांचे गुरुंसोबत असलेले अद्भूत नाते याविषयी जाणून घेऊया...

शंकर महाराज अवतारी पुरुष होते. शंकर महाराजांची मंदिरे, मठ अनेक ठिकाणी आहेत. शंकर महाराज यांना मानणारा, त्यांची भक्ती करणारा वर्गही मोठा आहे. श्री सद्गुरू शंकर महाराज यांचे नामस्मरण, उपासना करणारे भाविक देश-विदेशात असल्याचे सांगितले जाते. कठीण काळात शंकर महाराज पाठीशी उभे राहिल्याचे अनुभव अनेक जण सांगतात. शंकर महाराजांचा आवडता नंबर होता १३. कारण विचारले असता ते म्हणत " सबकुछ तेरा, कुछ नाही मेरा" महाराज वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावानी प्रसिद्ध आहेत. श्री शंकर महाराजांचा पारमार्थिक उपदेशही अगदी साधा असे. अनेकांना त्यांनी अनेक प्रकारे मार्गदर्शन केले. श्री शंकर महाराज म्हणजेच साक्षात दत्तगुरुंचा अवतार, अशीही प्रचलित लोकमान्यता असल्याचे सांगितले जाते.

शंकर महाराज कोणाला गुरु मानत असत?

शंकर महाराज हे श्री दत्तगुरुंचा तिसरा अवतार मानले गेलेले श्री स्वामी समर्थ महाराज यांना गुरु मानत असत. स्वामी समर्थ आणि शंकर महाराज यांच्या भेट कशी झाली, याबाबत काही कथा सांगितल्या जातात. शंकर महाराज हे स्वामींना ‘मालक’ असे संबोधत असत, असेही सांगितले जाते. लहानपणी शंकर महाराज फार खोडकर आणि खट्याळ होते. एक दिवस एका हरिणाच्या पिल्लाचा पाठलाग करत ते एका अरण्यात पोहोचले. त्या घोर अरण्यात त्यांना एक शंकराचे जीर्ण देऊळ दिसले. ते हरणाचे पिल्लू त्या देवळात आश्रयाला लपले. त्या पिल्लाला बाण मारणार एवढ्यात शंकर महाराजांसमोर एक दिगंबर साधू आले. त्याने त्या हरणाच्या पिल्लाला उचलून आपल्या कुशीत घेतले आणि महाराजांना म्हणाले की, कशाला मारतोस रे याला, काय बिघडवले याने तुझे. काही वेळाने त्या दिगंबर साधूने महाराजांच्या मस्तकावर हात ठेवला. ही त्यांची प्रथम स्पर्शशिक्षा. शंकर महाराज त्या स्पर्शाने अगदी भारावून गेले. तो दिगंबर साधू म्हणजे अक्कलकोट स्वामी महाराज, असे म्हणतात. 

स्वामी समर्थ यांना नित्य स्मरा ही माझी आज्ञा आहे

योगीराज श्री शंकर महाराज नेहमी भक्तांना समोर बसवून सद्गुरुचा महिमा सांगत असत. ते जेव्हा म्हणून अक्कलकोटला येत. तेव्हा आपल्या आईला मुलाने भेटावे अशा प्रेमाने साश्रुमनाने श्री स्वामींच्या समाधीचे दर्शन घेत. तासनतास वटवृक्षाच्या छायेत रहात. संपूर्ण रात्रभर जागरण करीत व रात्रौ गुरूशिष्यांच्या भेटी होत. श्री स्वामी समर्थ महाराज हे आमचे एकमेव गुरू आहेत. त्यांच्या स्थानावर आम्ही येऊन सुखावतो. अक्कलकोटला जमलेल्या आपल्या भक्तांना शंकर महाराज सांगत माझे गुरू श्री स्वामी समर्थ यांना नित्य स्मरा ही माझी आज्ञा आहे.

शंकर महाराज आणि स्वामींचा एक हृदयस्पर्शी प्रसंग

उठल्यापासून शंकर महाराजांना उदासीन वाटत होते. साधनेत मन लागेना. ज्ञानेश्वरी वाचायला घेतली पण अर्थ लागत नव्हता. स्वामींची सारखी आठवण यायला लागली. अनामिक हुरहूर लागायला लागली. असे का होत आहे ते काळात नव्हते, स्वामींच्या भेटीसाठी जीव कासावीस होत होता. शेवटी स्वामींनाच आवाहन करून विचारले की, स्वामी आज काय होत आहे. मला कळत नाही, माझे काही चुकले का? नाही बेटा. हे शब्द कानावर ऐकायला आल्यवरती शंकर महाराजांनी पाहिले की, एका वटवृक्षाखाली स्वामी पद्मासनात बसले होते. मुखावर कोटी सूर्याचे तेज होते. नजर नेहेमीसारखी करडी नव्हती. त्यात आईचे प्रेम झिरपत होते. शंकर महाराज आनंदाने पुढे गेला आणि स्वामींना नमस्कार करू लागले. स्वामींनी शंकर महाराजांकडे पाहिले आणि एक लखलखणारी ज्योत स्वामींच्या डोळ्यातून बाहेर आली आणि शंकर महाराजांच्या हृदयात स्थिर झाली. शंकर महाराजांना समजले की, देहाचे सगुण सरले, देहाचे अनुबंधन तुटले. शंकर महाराज कळवळून ओरडले की, स्वामी मला पोरके करून असे कसे जाऊ शकता? शंकर महाराजांनी डोळे पुसले. आणि हळूहळू स्वतःला सावरले. आपला वारसा लाडक्या शिष्याकडे देऊन स्वामी निजानंदी निमग्न झाले, अशी एक कथा सांगितली जाते. 

टॅग्स :Guru Purnimaगुरु पौर्णिमाshree swami samarthश्री स्वामी समर्थchaturmasचातुर्मासspiritualअध्यात्मिक