शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: राष्ट्रवादीची पहिली उमेदवार यादी जाहीर; अजित पवार बारामतीतूनच लढणार, ३८ नावांची घोषणा!
2
उमेदवारी यादी आली, CM शिंदेंची मोठी खेळी! खास माणूस जरांगेंना भेटला? पाठिंब्यासाठी हालचाली?
3
"आपलं काम केलं नाही तर आपणही त्यांचं काम करायचं नाही’’, शिंदेंच्या उमेदवाराचा भाजपाला इशारा
4
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील आरोपींनी जंगलात केला गोळीबाराचा सराव, कारण...
5
लॉरेन्स बिश्नोईच्या टार्गेटवर राहुल गांधी आणि ओवैसी, जीवे मारण्याची धमकी; गुन्हा दाखल
6
Adani News : अदानींच्या 'या' कंपनीच्या शेअरमध्ये घसरण; SEBI नं दिली कारणे दाखवा नोटीस, तुमच्याकडे आहे का?
7
Kalashtami: दर महिन्यात कालाष्टमीला काळभैरवाची पूजा करा, वास्तू दोष दूर सारा!
8
Diwali Astro 2024: दिवाळीत 'या' राशींना आहे राजयोगाची संधी; सोनेखरेदी करताना वाचा नियम!
9
मोठी बातमी! शंकरराव गडाखांच्या साखर कारखान्याला आयकरची नोटीस; विरोधकांत खळबळ
10
महायुतीकडून परतफेडीचा प्रश्न ते विकासाचा मुद्दा; उमेदवारी जाहीर होताच अमित ठाकरेंची रोखठोक उत्तरं
11
किती तो लाड! सोशल मीडियावरील 'त्या' मंडळींना टोला हाणत गंभीर झाला KL राहुलची 'ढाल'
12
Video: प्राजक्ता माळीने 'फुलवंती'च्या कलाकारांना दिलं 'पखवाज-घुंगरु' चॅलेंज, बघा कोण जिंकलं?
13
पीएम मोदी, पुतिन आणि शी जिनपिंग यांचा हसतानाचा फटो होतोय व्हायरल, अमेरिकेचं टेन्शन वाढणार?
14
लोकसभेला नाराज झालेल्या किरण सामंतांना शिंदेसेनेची उमेदवारी; निलेश राणे कोणती भूमिका घेणार?
15
"सेंच्युरी मारण्यासाठी तेवढ्या जागा तरी लढवा’’, शिंदे गटाचा संजय राऊतांना खोचक टोला   
16
छोटा राजनची जन्मठेप रद्द; जया शेट्टी हत्या प्रकरणात हायकोर्टाकडून जामीन मंजूर
17
“उद्धव ठाकरे केवळ २ वेळा आले, भेटीसाठी १० मिनिटे वेळ दिला नाही”; महंतांचा ठाकरे गटाला रामराम
18
आधी 'लाडकी बहीण'विरोधात मुंबई हायकोर्टात दाखल केली होती याचिका,आता मागितली सुरक्षा; नेमकं प्रकरण काय?
19
माढ्यात तुतारीचा उमेदवार ठरला?; पवार-मोहितेंमध्ये एकमत; महायुतीकडून नवीन नावाची चर्चा!
20
जागावाटप झालं, पण मविआचं नेतृत्व कोण करणार? संजय राऊत म्हणाले, "…या दिवशी नाव जाहीर करणार’’ 

गुरुपुष्यामृत योग: दत्तगुरुंची सेवा, उपासना शक्य नाही? ‘हे’ एकच स्तोत्र म्हणा; कृपालाभ मिळवा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 11:38 AM

Guru Pushya Yoga October 2024: श्रीगुरुचरित्र, श्रीदत्त पुराण, श्रीदत्त महात्म्य, श्रीपाद चरित्रामृत या सगळ्या ग्रंथांचे सार असलेले हे स्तोत्र अत्यंत प्रभावी मानले जाते. १० ते १५ मिनिटांत होणारे स्तोत्र मराठीत आहे. जाणून घ्या...

Guru Pushya Yoga October 2024: चातुर्मास सुरू असून, दीपोत्सवाची लगबग सुरू आहे. दिवाळीच्या अगदी काही दिवस आधी गुरुपुष्यामृत योग जुळून आला आहे. गुरुवारी पुष्य नक्षत्र आले, तर त्या दिवशी 'गुरुपुष्यामृत' योग होतो. हा योग सर्व कार्यासाठी शुभ समजला जातो. या योगावर सोने खरेदी केले असता त्याची वृद्धी होते, अशी मान्यता आहे. २४ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ०६ वाजून ३८ मिनिटांपासून गुरुपुष्यामृत योग सुरू होत असून, दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवार सकाळी ०६ वाजून ३७ मिनिटांपर्यंत गुरुपुष्यामृतयोग असणार आहे. संपूर्ण दिवस हा योग असणे विशेष मानले जात आहे.

पुष्यचा अर्थ आहे पोषण करणारा, शक्ती देणारा, ऊर्जा देणारा. पुष्याचे आधीचे नाव तिष्य असे. त्याचा अर्थ आहे शुभ, सुंदर, सुख संपदा देणारा. जाणकारांच्या मते, पुष्य नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे. ऋग्वेदात पुष्याला तिष्य म्हणजे मंगलदायी किंवा मांगलिक तारा, असेही म्हणतात.  या गुरुपुष्यामृत योगाचे फार महत्त्व आहे. गुरुपुष्यामृत योग वारंवार येत नाही. गुरुवारी धार्मिक कार्ये करणे उत्तम मानले गेले आहे. पुष्य नक्षत्र सर्व प्रकारांच्या कार्यांसाठी अत्यंत शुभ मानले गेले आहे. तसेच दत्तगुरूंच्या मंत्राचा जप करावा, असे केल्याने दत्तगुरूंचे शुभाशिर्वाद प्राप्त होऊन अमृत पुण्य कमवण्याची संधी प्राप्त होऊ शकते, असे सांगितले जाते. दत्तगुरुंशी संबंधित अनेक स्तोत्र, मंत्र, श्लोक आहेत. पैकी एक म्हणजे दत्तबावनी किंवा दत्तबावन्नी. 

दत्तबावनी म्हणजे दत्त आणि त्यांचे अवतार समजले जाणारे श्रीपाद श्रीवल्लभ व नृसिंह सरस्वती स्वामींच्या लीलांचे वर्णन करणारे बावन्न ओळींचे संकटविमोचन स्तोत्र. या स्तोत्राची रचना नारेश्वरनिवासी संत श्री रंग अवधूत महाराज यांनी केली. मूळ दत्तबावनी गुजराती आहे. हे स्तोत्र मराठीत उपलब्ध असून, पठण करण्यास सहज, सुलभ असेच आहे. श्रीगुरुचरित्र, श्रीदत्त पुराण, श्रीदत्त महात्म्य, श्रीपाद चरित्रामृत ह्या सगळ्या ग्रंथांचे सार स्वरूप म्हणजे श्री दत्त बावन्नी हे स्तोत्र आहे. गुरुपुष्यामृत योगावर याचे पठण करणे अतिशय शुभ पुण्यकारक मानले जाते. पठण शक्य नसेल, तर मनोभावे श्रवण करावे, असे म्हटले जाते.

श्री दत्त बावन्नी मराठीत

जय योगीश्वर दत्त दयाळ । तूंच एक जगती प्रतिपाळ ॥ १॥

अत्र्यनुसये करूनि निमित्त । प्रगटसि जगतास्तव निश्चित ॥ २॥

ब्रह्माऽच्युतशंकर अवतार । शरणांगतासि तूं आधार ॥ ३॥

अंतर्यामी ब्रह्यस्वरूप । बाह्य गुरु नररूप सुरूप ॥ ४॥

काखिं अन्नपूर्णा झोळी । शांति कमंडलु करकमळी ॥ ५॥

कुठें षड्भुजा कोठें चार । अनंत बाहू तूं निर्धार ॥ ६॥

आलो चरणी बाळ अजाण । दिगंबरा, उठ जाई प्राण ॥ ७॥

ऐकुनि अर्जुन-भक्ती-साद । प्रसन्न झाला तूं साक्षात् ॥ ८॥

दिधली ऋद्धी सिद्धी अपार । अंती मोक्ष महापद सार ॥ ९॥

केला कां तूं आज विलंब? तुजविण मजला ना आलंब ।  । १०॥

विष्णुशर्म द्विज तारुनिया । श्राद्धिं जेंविला प्रेममया ॥ ११॥

जंभे देवा त्रासविले । कृपामृते त्वां हांसविलें ॥ १२॥

पसरी माया दितिसुत मूर्त । इंद्रा करवी वधिला तूर्त? ॥ १३॥

ऐसी लीला जी जी शर्व । केली, वर्णिल कैसी सर्व? ॥ १४॥

घेई आयु सुतार्थी नाम । केला त्यातें तूं निष्काम ॥ १५॥

बोधियले यदु परशुराम । साध्य देव प्रह्लाद अकाम ॥ १६॥

ऐसी ही तव कृपा अगाध । कां न ऐकसी माझी साद  ॥ १७॥

धांव अनंता, पाहि न अंत । न करी मध्येच शिशुचा अंत ॥ १८॥

पाहुनि द्विजपत्नीकृत स्नेह । झाला सुत तूं निःसंदेह ॥ १९॥

स्मर्तृगामी कलितार कृपाळ । जडमुढ रजका तारी दयाळ ॥ २०॥

पोटशुळी द्विज तारियला । ब्राह्यणश्रेष्ठी उद्धरिला ॥ २१॥

सहाय कां ना दे अजरा? । प्रसन्न नयने देख जरा ॥ २२॥

वृक्ष शुष्क तूं पल्लविला । उदास मजविषयी झाला ॥ २३॥

वंध्या स्त्रीची सुत-स्वप्नें । फळली झाली गृहरत्नें ॥ २४॥

निरसुनि विप्रतनूचे कोड । पुरवी त्याच्या मनिचें कोड ॥ २५॥

दोहविली वंध्या महिषी । ब्राह्मण दारिद्र्या हरिसी ॥ २६॥

घेवडा भक्षुनि प्रसन्न-क्षेम । दिधला सुवर्ण घट सप्रेम ॥ २७॥

ब्राह्मण स्त्रीचा मृत भ्रतार । केला सजीव, तूं आधार ॥ २८॥

पिशाच्च पीडा केली दूर । विप्रपुत्र उठवीला शूर ॥ २९॥

अंत्यज हस्तें विप्रमदास । हरुनी रक्षिले त्रिविक्रमास ॥ ३०॥

तंतुक भक्ता क्षणांत एक । दर्शन दिधले शैलीं नेक ॥ ३१॥

एकत्र वेळी अष्टस्वरूप । झाला अससी, पुन्हां अरूप ॥ ३२॥

तोषविले निज भक्त सुजात । दाखवुनि प्रचिती साक्षात ॥ ३३॥

हरला यवननृपाचा कोड । समता ममता तुजला गोड ॥ ३४॥

राम-कन्हैया रूपधरा । केल्या लीला दिगंबरा! ॥ ३५॥

शिला तारिल्या, गणिका, व्याध । पशुपक्षी तुज देती साद ॥ ३६॥

अधमा तारक तव शुभ नाम । गाता किती न होती काम ॥ ३७॥

आधि-व्याधि-उपाधि-गर्व । टळती भावें भजतां सर्व ॥ ३८॥

मूठ मंत्र नच लागे जाण । पावे नर स्मरणे निर्वाण ॥ ३९॥

डाकिण, शाकिण, महिषासूर । भूतें, पिशाच्चें, झिंद, असूर ॥ ४०॥

पळती मुष्टी आवळुनी । धून-प्रार्थना-परिसोनी ॥ ४१॥

करुनि धूप गाइल नेमें । दत्तवावनी जो प्रेमें ॥ ४२॥

साधे त्याला इह परलोक । मनी तयाच्या उरे न शोक ॥ ४३॥

राहिल सिद्धी दासीपरी । दैन्य आपदा पळत दुरी ॥ ४४॥

नेमे बावन गुरुवारी । प्रेमे बावन पाठ करी ॥ ४५॥

यथावकाशे स्मरी सुधी । यम ना दंडे त्यास कधी ॥ ४६॥

अनेक रूपी हाच अभंग । भजतां नडे न मायारंग ॥ ४७॥

सहस्र नामें वेष अनेक । दत्त दिगंबर अंती एक ॥ ४८॥

वंदन तुजला वारंवार । वेद श्वास हें तव निर्धार ॥ ४९॥

थकला वर्णन करतां शेष । कोण रंक मी बहुकृत वेष ॥ ५०॥

अनुभवतृप्तीचे उद्गार । ऐकुनी हंसता खाइल मार ॥ ५१॥

तपसी तत्त्वमसी हा देव । बोला जयजय श्री गुरुदेव ॥ ५२॥

॥ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.

टॅग्स :chaturmasचातुर्मासPuja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२४spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक