आज कार्तिक महिन्यातला पहिला गुरुवार. आजच्या दिवशी गुरु आणि चंद्राचा नवपंचम योग तयार होत आहे. याशिवाय आज छठ पूजाही केली जाणार आहे. हा शुभ योगायोग आहे. अशा स्थितीत गुरुबळ प्राप्त करण्यासाठी आज तुम्ही जे काही उपाय कराल, त्याचा तुम्हाला अधिक फायदा होईल. धन, संपत्ती आणि यश मिळविण्यासाठी गुरुवारच्या सोप्या टिप्स जाणून घ्या.
गुरु सध्या प्रतिगामी अवस्थेत फिरत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार गुरूची प्रतिगामी अवस्था अनुकूल मानली जात नाही. गुरुच्या स्थित्यंतरामुळे व्यक्तीचे मन धार्मिक कार्यात कमी रमते. संसारी विचारांमध्ये अडकून राहिल्याने आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते. स्थितीचा, राशीनुसार, प्रत्येकावर वेगवेगळा प्रभाव पडतो. परंतु कार्तिक महिन्यातील गुरुवारी गुरु ग्रहाशी संबंधित काही सोपे उपाय केले तर दुष्परिणाम कमी होऊ शकतात. हे उपाय तुम्ही कार्तिक महिन्यातील कोणत्याही गुरुवारपासून करू शकता.
गुरुवारचे उपाय :
१) कार्तिक महिन्यातील गुरुवारी २५० ग्रॅम हरभरा डाळ आणि तितकाच गूळ घेऊन गायीला खाऊ घाला. जरगायीला देणे शक्य नसेल तर गोरगरिबांना दान करा. हा उपाय सलग सात गुरुवार केल्याने यशप्राप्तीच्या मार्गातील अडथळे दूर होतात.
२) धार्मिक ग्रंथाचे दान करणे हे देखील अतिशय पुण्यदायी ठरते. अनेकांना उपासना करण्याची इच्छा असूनही पुस्तकाअभावी ते जमत नाही. अशा वेळी दैनंदिन उपासनेच्या पुस्तिका किंवा धार्मिक ग्रंथाचे दान करू शकता.
३) कार्तिक महिन्यात छठ पूजेला सूर्य उपासना केली जाते. मकर संक्रांति पर्यंतच्या गुरुवारी ही उपासना रोज केली, अर्थात सूर्याला रोज अर्घ्य दिले तर नित्याची सूर्य उपासना घडू शकते. त्यामुळे उत्तम आरोग्य आणि सौख्य प्राप्ती होते.
4) कार्तिक महिन्यात केळीच्या झाडाची पूजा करावी. हे विष्णूंचे आवडते स्थान असते. यासाठी प्रथम केळीच्या झाडाला अभिषेक करावा. अभिषेकासाठी पाण्यात हळद मिसळून त्यात गूळ टाकावे. या पाण्याने केळीच्या झाडाला अभिषेक करावा. त्यानंतर केळीच्या झाडावर हळद लावून टिळा लावावा आणि त्यानंतर केळीच्या झाडाला किमान ७ प्रदक्षिणा घालाव्यात. हा उपाय तुम्हाला कमीत कमी ७ गुरुवारपर्यंत करायचा आहे, परंतु तुम्हाला कार्तिक महिन्यातील गुरुवारपासूनच सुरुवात करावी लागेल. तरच गुरुबळ वाढून तुमची झपाट्याने प्रगती होऊ शकेल!