शहरं
Join us  
Trending Stories
1
हाती 'धनुष्यबाण', कुडाळमधून विजयाचा निर्धार; शिवसेना प्रवेशानंतर निलेश राणे भावूक
2
मावळमध्ये भाजपाचा सांगली पॅटर्न; राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का देण्याची तयारी
3
मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; नाशिकमध्ये भाजपाला अन् पालघरमध्ये काँग्रेसला धक्का
4
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
5
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
6
'सीमेवरील शांततेला प्राधान्य', पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात 50 मिनिटांची बैठक
7
Mahayuti Seat update: साताऱ्यात महायुतीचा विद्यमान आमदारांवरच भरोसा! 
8
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाच्या नसरल्लाहनंतर आता हाशिम सफीद्दीनचाही केला खात्मा
9
Maharashtra Election 2024: भाजपसमोर बंड थंड करण्याचे आव्हान; नाशिकमध्ये समीकरण काय?
10
मोठी बातमी: CM शिंदेंविरोधात केदार दिघे; ठाकरेंच्या शिवसेनेकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
11
तुर्कीची राजधानी अंकारामध्ये मोठा दहशतवादी हल्ला; अनेकांचा मृत्यू
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सकाळी पक्षप्रवेश अन् संध्याकाळी मिळालं तिकीट; के.पी. पाटलांना दिली उमेदवारी; शाहूवाडीतही शिलेदार मैदानात उतरवला
13
मुंबईतील 'या' १३ जागांवर ठाकरेंचे शिलेदार ठरले; शिवडी मतदारसंघात ट्विस्ट? 
14
जागावाटपाआधीच ठाकरेंकडून AB फॉर्म वाटप; नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेस बंडखोरी करणार
15
जालन्यात शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांविरोधात रावसाहेब दानवेंच्या भावाने ठोकला शड्डू
16
Madha Vidhan Sabha 2024: चार वेळा काँग्रेस, पाच वेळा राष्ट्रवादी, शेकापला एकदा मिळाली संधी!
17
अद्भुत! झिम्बाब्वेने ट्वेंटी-२० मध्ये केल्या तब्बल ३४४ धावा; सिकंदर रझाची झंझावाती खेळी
18
Maharashtra Vidhan Sabha Election : बारामतीचं ठरलं! काका विरोधात पुतण्या निवडणूक लढणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत
19
Virat Kohli Record : पुण्याच्या मैदानात किंग कोहलीच्या निशाण्यावर असतील हे ५ विक्रम 
20
फडणवीसांची शिष्टाई, राज पुरोहित आणि राहुल नार्वेकरांमध्ये दिलजमाई, कुलाब्यातील बंड शमवण्यात भाजपाला यश 

हातोड्याचे आघात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 4:39 AM

चार प्रेरणादायी शब्द कानावर पडले की दु:खाचा भार हलका होऊन मन, बुद्धी ताजी होत जाते.

-विजयराज बोधनकर‘कोण दिवस येई कसा कोण जाणतो?’, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं हे भजन खूप काही शिकवून जातं. सुखाच्या दिवसात माणूस बेधुंद नशेत जगतो; पण जेव्हा दु:ख दाराशी येतं, तेव्हा तेच दु:ख सुंदर कल्पनेतली बाधा बनतं. दु:ख माणसाला प्यादा बनवतं. भीतीपोटी क्षुल्लक माणसांना शरण जायला भाग पाडतं. बऱ्याचदा दु:ख हे मानवनिर्मित असतं. दु:खाला फक्त सुदृढ विचारांचे औषधच विरघळू शकतं. दु:ख केवळ एक भ्रम आहे. दु:खाने अनेक संसार उद्ध्वस्त केलेत. सकाळ झाली की निसर्ग मानवाचं स्वागत करीत असतो; पण अनेक मनं सकाळच्या वेळी प्रश्नांची माळ जपत बसलेली असतात. अशा दु:खाच्या प्रवासात हे दु:खच मनाला आत्महत्याही करायला भाग पाडतं, म्हणून तर असे दु:खी मन कशात तरी रमावं म्हणून देवळात कीर्तनाला, भजनाला जाऊन बसतं. चार प्रेरणादायी शब्द कानावर पडले की दु:खाचा भार हलका होऊन मन, बुद्धी ताजी होत जाते. दु:खाला झटकून जी माणसे चिवटपणे कामाला लागतात, दु:ख त्यांच्यापासून घाबरून पळून जातं. क्षुल्लक कारणावरून दु:खी बनण्याची सवय मनाला लागलेली असते; परंतु ज्यांना जगाकडे सकारात्मक वृत्तीने बघण्याची सवय लागलेली असते, अशा माणसांकडे दु:ख चुकूनही फिरकत नसतं; कारण त्यांची विचारधारा इतकी शक्तिशाली असते की, ते कुठल्याही परिस्थितीत संकटाचा सामना करण्याची तयारी ठेवत असतात. फक्त धर्माचा अभ्यास करण्यापेक्षा उत्तम जगण्याचा धर्म म्हणजे काय असू शकतो, याचा सततचा ध्यास मनाला जास्त क्रियाशील बनवू शकतो. काळाच्या हातोड्याचे आघात सहन करण्याची क्षमता मनात येते. चालता चालता मातीत रुतून बसलेले मानवी वृत्तीचे काटे टोचतात; पण त्या वेदना क्षुल्लक समजून जो पुढे चालत राहतो, अशीच जगण्यावर खरे प्रेम करणारी माणसं असतात. येणाºया भयंकर संकटातून सुटका करून घेण्याचे मार्ग शोधत असतात; म्हणून सुखात उतू नये आणि दु:खात रडू नये.