शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

Hanuman Jayanti 2023: वाल्मिकी रामायणानुसार काय आहे हनुमान जन्माची कथा? जाणून घ्या आणि जन्मोत्सवाच्या तिथीला पुर्नवाचन करा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2023 1:33 PM

Hanuman Jayanti 2023: वाल्मिकी रामायण हे अधिकृत रामायण आहे, त्यात रामजन्मकथेपासून हनुमंत जन्माची माहिती सापडते, ती जाणून घेऊ आणि जन्मोत्सव साजरा करू!

६ एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सव आहे. त्यानिमित्ताने हनुमंताची वाल्मिकी ऋषींनी लिहिलेली कथा जाणून घेऊया आणि जन्मोत्सवाच्या तिथीला अर्थात ६ एप्रिल रोजी पहाटे सूर्योदयाच्या वेळी ६. ४० मिनिटांनी कथेचे पुर्नवाचन करून हनुमंत जन्मोत्सव साजरा करू!

हनुमान हा अंजनी व केसरी यांचा पुत्र असून त्याची माता अंजना ही मूळची शापित अप्सरा होती. अत्यंत लावण्यवती असलेल्या या अप्सरेचे नाव `पुंजिकस्थला' होते. एकदा एका तपस्व्याचा अपमान केल्यामुळे त्या ऋषींकडून 'तू वानरी होशील' असा शाप मिळाला. तिने पुष्कळ विनवणी केल्यावर तिला `इच्छेनुसार वारी किंवा मानुषी रूप धारण करण्यास समर्थ होशील' असा उ:शाप मिळाला. त्यामुळे ही अप्सरा कपियोनीत 'कुंजर' या वानराची मुलगी `अंजना' म्हणून जन्माला आली.

अंजनाचा विवाह पुढे वाननराज केसरीशी झाला. तो सुमेरू पर्वतावर विहार करण्यासाठी पत्नी अंजनीसह आला असता तिथे मंदपणे वाहत असलेल्या वायूने तिचे अप्रतिम लावण्य पाहिले आणि तो काममोहित झाला. त्याने केसरीच्या शरीरात प्रवेश केला. यथावकाश एक दिवस पूर्व दिशेला बालरवि उदयाला आला आणि त्यावेळी अंजनेने एका तेजस्वी बालकाला जन्म दिला. मरुताचा पुत्र म्हणून बाळाचे नाव मारुती असे ठेवण्यात आले.

हनुमान कोणत्या दिवशी जन्माला आला याबाबत भिन्न मते आहेत. प्राचीन काळापासून वैदिक, तांत्रिक, पौराणिक, ललित सर्व प्रकारच्या वाङमयात हनुमानाच्या जन्मासंबंधी भिन्न भिन्न कथा दिल्या आहेत.

'वाल्मिकी रामायण' हे सर्व रामायणात आद्य मानले जाते. यात हनुमानाचा जन्म कोणत्या वेळी झाला याचा उल्लेख नाही, परंतु जन्मकथेचा उल्लेख तीन वेळेस आला आहे. यात हनुमानाने जन्मानंतर फळ समजून सूर्याचा ग्रास घेण्याचा यत्न केला असे वर्णन आहे. यावरून निष्कर्ष निघतो, की हनुमानाच्या जन्माच्या दुसऱ्या दिवशी अमावस्या असावी. सूर्यग्रहण असल्याने राहूचा उल्लेख आढळतो. 

आनंद रामायणात हनुमानाची जन्मवेळ सांगितलेली नाही, पण एका श्लोकात उल्लेख आहे, की हनुमानाचा जन्म चैत्रातील पौर्णिमेला अरुणोदयाचे वेळी झाला असावा.

या विवेवचनावरून हनुमानाच्या जन्मासंबंधी मतभिन्नता लक्षात येईल. मंगळवार आणि शनिवार दोन्ही दिवशी त्याची पूजा करण्याची प्रथा आहे. याचे कारण असे, की दोन्ही वार त्याचे जन्मदिवस वार मानले जातात. जन्मतिथी म्हणून शुद्ध एकादशी, पौर्णिमा, वद्य चतुर्दशी आणि अमावस्या अशा विविध तिथी व चैत्र आणि कार्तिक हे महिने त्याच्या जन्मसंदर्भात सांगितले जातात.

टॅग्स :Hanuman Jayantiहनुमान जयंतीramayanरामायण