शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
7
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
8
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
9
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
10
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
11
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
12
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
14
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
15
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
16
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
17
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
18
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
19
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
20
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"

Hanuman Jayanti 2023:हनुमान जयंती की जन्मोत्सव यावर दाते पंचांगाने खुलासा करून दिला पूर्णविराम; सविस्तर वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2023 7:00 AM

Hanuman Jayanti 2023: हनुमान जयंती असा दिनदर्शिकेत उल्लेख आहे, मात्र भाविकांकडून हनुमान जन्मोत्सव अशा शब्द प्रयोगाची मागणी होते, त्यावर दाते पंचागाने दिलेले उत्तर!

६ एप्रिल रोजी हनुमान जयंती. काळानुकाळ आपण चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंतीच संबोधत आलो आहोत. मात्र अनेकदा शब्दच्छलामुळे उत्सवाचा आनंद बाजूला राहतो आणि विषयांतर घडते. हनुमान जन्मोत्सवाबद्दलदेखील जयंती की जन्मोत्सव हा नवीन वाद निर्माण झाल्यामुळे दाते पंचांगकर्ते मोहन दाते यांनी जयंती व जन्मोत्सवाबद्दल मत मांडून या वादावर पडदा टाकला आहे. आपणही सदर माहिती वाचून मनातील संभ्रम दूर करूया आणि या वादाला पूर्णविराम देत उत्सवाचा मूळ उद्देश सफल करूया. 

दाते पंचांगकर्ते मोहन दाते सांगतात -

◆जो जन्माला येतो त्याची जयंती केली जाते आणि जो मुत्यु पावतो त्याची पुण्यतिथी केली जाते आणि जे समाधि घेतात त्यांचा समाधि उत्सव केला जातो, त्यामुळे जयंती आणि जन्मोत्सव हे समानार्थी शब्द असून विनाकारण शब्दच्छल करुन वेगळा अर्थ काढला जात आहे ! 

◆ जो मृत्यु पावतो त्याची जयंती साजरी करावी असे कुठेही सांगितलेले नाही . मात्र जो मृत्यु पावतो त्याची जयंती व पुण्यतिथी दोन्ही करता येते 

◆जयंती ही सुद्धा उत्सव म्हणूनच साजरी केली जाते तेंव्हा जन्मोत्सव व जयंती हे समानार्थी आहेत, (परशुराम व मार्कण्डेय सुद्धा चिरंजीव आहेत तिथे सुद्धा श्री परशुराम जयंती व मार्कण्डेय जयंतीअसेच म्हटले आहे.) 

◆ तसेच अनेक ठिकाणी श्रीराम जन्मोत्सव आणि जयंती ऐवजी श्रीराम नवमी पण म्हंटले जाते आणि श्रीकृष्ण जयंती ऐवजी श्रीकृष्णाष्टमी असे सुद्धा शब्द प्रयोग केले जातात, तसेच गीता हा ग्रंथ असून मोक्षदा एकादशीला गीता जयंती पण साजरी होते,  तेव्हा विनाकारण शब्दच्छल करण्यात काहीच अर्थ नाही!

◆ देवता व अवतार यांच्याबाबत उत्सवापेक्षा जयंती  साजरी करणे हे अधिक योग्य असणार आहे.  कारण जयंतीचे पारणेसुद्धा महत्त्वाचे असते एखाद्या उत्सवाचे पारणे हा शब्दप्रयोग उचित वाटत नाही आता याविषयी विराम!

वरील माहिती वाचून आपल्याही मनातील संभ्रम दूर झाला असेल हे निश्चित! हनुमंताप्रमाणे शक्ती, युक्ती व भक्तीवर लक्ष केंद्रित करूया!

टॅग्स :Hanuman Jayantiहनुमान जयंती