>> योगेश काटे, नांदेड
रामनवमीतचा उत्सव झाला की हनुमान जयंतीचे वेध लागतात. हनुमंतराय म्हणजे बुद्धीमतं वरीष्ठम् असे आहेत वा.रामायणात तसे विविध रामायणात हनुमंताच्या पराक्रमाची गाथा लिहिले आहे तर संतांनी ती गाईला आहे. समर्थ रामदास स्वामी व तुसलीदास यांनी तर गाईलीईच पण ज्ञानोबराय, तुकाराम महाराज, एकनाथ महाराजांनी पण अनेक ठिकाणी हनुमंताच्या भक्ती शक्ती चे गुणवर्णन केले आहे.आज अशीच लोकाख्याईका आज लिहिणार आहे.
Hanuman Jayanti 2025: हनुमान जयंती की जन्मोत्सव? दरवर्षीचा वाद; त्यावर दाते पंचांगाचा खुलासा!
मारोतीराय जन्मल्या जन्मल्या सुर्याकडे झेप घेतली ते लाल फळ पाहिजे म्हणुन! ही घटना आपणा सर्वांना माहिती आहेच. इंद्राने वज्राचा प्रहार करत हनुमंतास बेशुद्ध केले हे आपल्याला माहिती आहे. पुढे अंजनीपुत्र मारोतीराय वेदशास्त्र संगीत शस्त्रास्त्राचे शिक्षण घेण्यासाठी भगवान सुर्यनारायणकडे गेले आणि सर्व शास्त्रात पारंगत झाले, त्यानंतर पुढे गुरुदक्षिणा देण्याचा दिवस आला काय बरं व कोणती गुरुदक्षिण दिली असेल हनुमंताने? तर सूर्यनारायणास हनुमंताने जी गुरुदक्षिणा ती जगास संजीवनी ठरली ती दक्षिणा म्हणजे सूर्यनमस्कार! सूर्याची बारा नावे घेऊन योग आसनात घातलेले नमस्कार सूर्यनमस्कार म्हणून ओळखले जाऊ लागले.
हनुमंताने सुर्यनारायणास सुर्यनमस्कार घालून अद्भुत अशी गुरुदक्षिणा दिली असं म्हणतात. सूर्यनमस्काराचे उगमकर्ता हनुमंतच आहेत म्हणून त्यांना बुद्धी, बल, तेज, उत्तम आयु, आरोग्य, सर्वकाही प्राप्त झाले आहे.
मानसशास्त्राचा नियम आहे, मानव ज्याचे चिंतन करतो, तसा तो होतो. आपल्या पूर्वजांनी सहस्त्र रश्मिची उपासना केली आणि स्वत:चे जीवन तेजस्वी तसेच प्रतिभासंपन्न बनवले. आपलेही जीवन तेजोमय व्हावे वाटत असेल, तर तत्काळ सूर्योपासना सुरू करा आणि फरक अनुभवा. सुरुवात एका सूर्यनमस्काराने करा, हरकत नाही. पण सुरुवात करा आणि रोज एक नमस्कार घालत त्यात भर घाला आणि मारुती रायासारखे आरोग्य संपन्न व्हा!
यंदा १२ एप्रिल २०२५ रोजी हनुमान जयंती आहे, त्यानिमित्ताने आपणही बलोपासनेची सुरुवात करूया. रोज सूर्यनमस्कार घालूया आणि आनंदी, निरोगी, दीर्घायुषी होऊया.