शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

हरितालिका तृतीया: ‘असे’ करावे पूजन; पाहा, पूजा साहित्य, मांडणी, व्रत विधी अन् व्रतकथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 15:03 IST

Hartalika Vrat Puja Vidhi In Marathi: हरितालिका व्रतासाठी काय तयारी करावी, कोणते साहित्य घ्यावे? हरितालिका व्रत कसे करावे? हरितालिका व्रताचा सोपा विधी, व्रतकथा जाणून घेऊया...

Hartalika Vrat Puja Vidhi In Marathi: हरितालिका हे व्रत भारतभरात केले जाते. पार्वतीसारखा आपल्याला चांगला नवरा मिळावा म्हणून अनेक ठिकाणी कुमारिका हे व्रत करतात. हे व्रत भाद्रपद शुद्ध तृतीयेला केले जाते. या दिवशी उपास करून गौरी आणि तिची सखी यांच्या मातीच्या मूर्तींची पूजा केली जाते. महाराष्ट्रात या व्रताला विशेष महत्त्व आहे. गणपतीच्या आधी म्हणजेच तृतीयेला हे व्रत केले जाते. 

हरितालिका तृतीया या दिवशी स्वर्ण गौरी व्रत करण्याची परंपरा प्रचलित आहे. ०५ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी भाद्रपद शुद्ध तृतीया सुरू होत आहे. तर, ०६ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी ३ वाजता भाद्रपद शुद्ध तृतीया समाप्त होत आहे. भारतीय पंचांगपद्धतीनुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा प्रचलित असल्यामुळे ०६ सप्टेंबर रोजी सकाळी हरितालिका पूजन करावे, असे सांगितले जात आहे. हरितालिका व्रतासाठी काय तयारी करावी, कोणते साहित्य घ्यावे? हरितालिका व्रत कसे करावे? हरितालिका व्रताचा सोपा विधी, व्रतकथा जाणून घेऊया...

हरितालिका व्रत पूजा साहित्य

हळद, कुंकू, गुलाल, रांगोळी, तांब्या, ताम्हन, पळी, भांडे, पाट, गंध, अक्षता, बुक्का, फुले, तुळशी, दूर्वा, उदबत्ती, कापूर, निरांजन, विड्याची पाने १२, कापसाची वस्त्रे, जानवे, सुपाऱ्या १२, फळे, नारळ२, गूळ, खोबरे, बांगडयाने फणी, गळेसरी, पंचामृत - साहित्य (दूध, दही, तूप, मध, साखर) ५ खारका, ५ बदाम. 

- सौभाग्यवाणाचे साहित्य: तांदूळ, १ नारळ, १ फळ, १ सुपली, आरसा, फणी, हिरव्या बांगडया ४, हळद, कुंकू डब्या २, सुटी नाणी पाच रुपयांची, सौभाग्यवाण देणे शक्य नसल्यास, यशाशक्ती रुपयांमध्ये दक्षिणा द्यावी. 

- हरतालिके पूजेतील पत्री: १) अशोकाची पाने २) आवळीची पाने ३) दूर्वाकुर पत्रे ४) कण्हेरीचीं पाने ५) कदंबाची पाने ६) ७) धोत्र्याची पाने ८) आघाड्याची पाने ९) सर्व प्रकारची पत्री १०) बेलाची पाने 

- हरतालिके पूजेतील फुले: १) चाफ्याची फुले २) केवडा, ३) कण्हेरीची फुले, ४) बकुळीची फुले, ५) धोतऱ्याची फुले ६) कमळाची फुले, ७) शेवंतीची फुले, ८) जास्वंदीची फुले, ९) मोगऱ्याची फुलें, १०) अशोकाचीं फुलें. 

।। अथ  हरितालिका व्रत पूजा प्रारंभः ।। 

प्रथम आपल्या इष्ट देवतांना हळद, कुंकू वाहून देवापुढे विडा ठेवावा. विड्याची पाने दोन, त्यावर एक नाणे व एक सुपारी ठेवून देवाला नमस्कार करावा. गुरुजींना व वडील मंडळींना नमस्कार करुन आसनावार बसावे. नंतर चौरंगावर अक्षता ठेवून त्यावर हरतालिकेच्या २ मूर्ति ठेवून, वाळूचे शिवलिंग तयार करावे. अन्यथा हरितालिका मूर्तींसोबत आणलेले शिवलिंग समोर ठेवावे. 

- घरातील देवांसमोर विडा ठेवून, अक्षता व हळदकुंकू वाहून नमस्कार करून प्रार्थना करावी. घरातील वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करून पूजेचा प्रारंभ करावा.

- सुरुवातीला काही तांदूळ घेऊन त्यावर सुपारी ठेवावी आणि गणपती म्हणून त्याचे आवाहन करून पंचोपचार पूजा करावी.

- चौरंग किंवा पाट मांडून केळीच्या खांबांनी चारही बाजू सुशोभीत कराव्यात. सुशोभित केलेल्या या चौरंगावर पार्वती आणि शंकराची स्थापना करून त्याची षोडशोपचारे पूजा करावी.

- हरितालिका पूजा करताना “सखे पार्वती, तुला जसा इच्छित वर मिळाला तसा आम्हाला मिळू दे. अखंड सौभाग्य लाभू दे”, अशी प्रार्थना करावी.

- धूप, दीप आणि नैवेद्य दाखवून वेगवेगळ्या प्रकारची पत्री, फुले वाहावित. पूजा करत असताना उमामहेश्वराचे ध्यान करावे.

- पूजा झाल्यावर  झाल्यावर माता पार्वती आणि महादेव यांना मनोभावे नमस्कार करावा. आरती करावी आणि प्रसादाचे वाटप करावे.

हरितालिका उत्तर पूजा किंवा व्रताची सांगता 

हरितालिका व्रतामध्ये दुसऱ्या दिवशी पहाटे उत्तरपूजा करावी. आचमन करून पंचोपचाराने पूजा करावी. दहीभाताचा नैवेद्य दाखवून मग आरती करावी आणि अक्षता वाहाव्या. यानंतर देवतांचे विसर्जन करावे. हरितालिकेचे पारणे उत्तरपूजेच्या दिवशी करतात.

हरितालिकेची कहाणी व्रत कथा

एके दिवशी ईश्वरपार्वती कैलासपर्वतावर बसली होती. पार्वतीनं शंकराला विचारलं, "महाराज, सर्व व्रतांत चांगलं व्रत कोणतं? श्रम थोडे, आणि फळ पुष्कळ, असं एखादं व्रत असलं, तर मला सांगा. आणि मी कोणत्या पुण्याईनं आपल्या पदरी पडले हेही मला सांगा." तेव्हा शंकर म्हणाले, "जसा नक्षत्रांत चंद्र श्रेष्ठ, ग्रहांत सूर्य श्रेष्ठ, चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवांत विष्णू श्रेष्ठ, नद्यांत गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणं हरितालिका हे व्रत सर्वांत श्रेष्ठ आहे, ते तुला सांगतो. तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस, आणि त्याचा पुण्यानं तू मला प्राप्त झालीस, ते ऐक.' 

हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करावं. ते पूर्वी तू केलंस, ते मी तुला आता सांगतो. तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस. चौसष्ट वर्षे तर झाडाची पिकलेली पानं खाऊन होतीस, थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही दुःखं सहन केलीस. हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झालं, आणि अंशी कन्या कोणास द्यावी, अशी त्याला चिंता पडली. इतक्यात तिथं नारदमुनि आले. हिमालयानं त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं, तेव्हा नारद म्हणाले, "तुझी कन्या उपवर झाली आहे, ती विष्णूला द्यावी. तो तिच्यायोग्य नवरा आहे. त्यांनीच मला तुजकडे मागणी करण्यास पाठविलं आहे. म्हणून मी इथं आलो आहे." हिमालयाला मोठा आनंद झाला. त्यानं ही गोष्ट कबूल केली. 

नंतर नारद तिथून निघून विष्णूकडे आले. त्यांना ही हकिकत कळविली व आपण निघून दुसरीकडे गेले. नारद गेल्यावर तुझ्या बापानं ती गोष्ट तुला सांगितली, ती गोष्ट तुला रुचली नाही. तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागावण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंल, महादेवावाचून मला दुसरा पती करणं नाही; असा माझा निश्वय आहे. असं असून माझ्या बापानं मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे. ह्याला काय उपाय करावा? मग तुझ्या सखीनं तुला एका घोर अरण्यात नेलं. तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली. जवळच एक गुहा आढळली. त्या गुहेत जाऊन तू उपास केलास. तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापिलंल. त्याची पूजा केलीस. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता. 

रात्री जागरण केलंस. त्या पुण्यानं इथलं माझं आसन हललं, नंतर मी तिथं आलो. तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं. तू म्हणालीस, "तुम्ही माझे पती व्हावं, याशिवाय दुसरी इच्छा नाही," नंतर ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो. पुढं दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जन केलीस. मैत्रिणीसह त्याचं पारणं केलंस. इतक्यात तुझा बाप तिथं आला. त्यानं तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं. मग तू झालेली सर्व हकिकत त्याला सांगितलीस. पुढं त्यानं तुला मलाच देण्याचं वचन दिलं. तुला घेऊन घरी गेला. मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केलं. अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली. त्याला हरितालिका व्रत असं म्हणतात. 

याचा विधी असा आहे : ज्या ठिकाणी है व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधाव केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं. पुढं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं. षोडशोपचारे त्याची पूज करावी. मनोभावे त्याची प्रार्थना करावी. नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावं. या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो. सात जन्मांचं पातक नाहीसं होतं. राज्य मिळतं. स्त्रियांचं सौभाग्य वाढतं. ह्या दिवशी बायकांनी जर काही खालं. तर त्या जन्मबंध्या व विधवा होतात. दारिद्रय येतं व पुत्रशोक होतो. कहाणी केल्यावर सुवासिनींना यथाशक्ती बाण यावं. दुसऱ्या दिवशी उत्तरपूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं ही साठा उत्तरांची कहाणी, पाचा उत्तरी, देवाब्राह्मणाच्या द्वारी, गाईच्या गोठी, पिंपळाच्या पारी, सुफळ संपूर्ण. 

टॅग्स :Hartalika Vratहरतालिका व्रतPuja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३spiritualअध्यात्मिकchaturmasचातुर्मास