देशभरात विविध ठिकाणी होळी (Holi 2021) सण साजरी करण्याची परंपरा, पद्धत वेगळी आहे. पहिल्या दिवशी होळी दहन केली जाते आणि दुसऱ्या दिवशी एकमेकांवर रंग उडवून रंगांची होळी खेळली जाते, याला धुलिवंदन असे म्हटले जाते. होळीला शिमगाही म्हटले जाते. भगवान शंकराची लीला, याला शिव-शिमगासुद्धा म्हटले जाते. शेवटचा मराठी महिना फाल्गुन आणि या महिन्यातील पौर्णिमेला येणारा सण म्हणजे 'होळी.' होळी हा वर्षातील शेवटचा सण.
दृष्ट प्रवृत्ती, वाईट, अमंगल विचार यांचा नाश करुन चांगली वृत्ती, चांगले विचार अंगी बाळगावे, हा या सणामागील उद्देश. होळीनिमित्त पुरळपोळी, रंग, धुडवड या सगळ्याचे आकर्षण तर असतेच. धरतीमातेला वंदन करणारा हा सण म्हणूनच आपल्या मातृभूमीवरील प्रेमाचा, आपल्या देशभक्तीचा द्योतक आहे. शास्त्रांनुसार फाल्गुन शुल्क अष्टमीपासून होलिका दहनापर्यंतच्या कालावधीला होलाष्टक असं म्हणलं जातं. होळीच्या आठ दिवस आधी होलाष्टक साजरे केले जाते. याच कालावधीत होळीच्या तयारीला सुरुवात केली जाते. यावर्षी होलाष्टक (Holashtak 2021) २२ मार्च ते २८ मार्च पर्यंत असणार आहे.
होलाष्टकाचे महत्व
होलाष्टकच्या कालावधीत भक्तीतील सामर्थ्य जाणवतं. या कालावधीत तप करणं चांगलं ठरतं. होलाष्टक सुरू झाल्यानंतर झाडाची फांदी तोडून जमीनीवर लावतात. यात रंगेबेरंगी कपड्यांचे तुकडेसुद्धा बांधले जातात. याला भक्त प्रल्हादाचे प्रतिक मानलं जातं. ज्या क्षेत्रात होलिका दहनासाठी झाडाची फांदी कापून जमिनीवर ठेवली जाते. त्या क्षेत्रात होलिका दहनापर्यंत कोणतंही शुभकार्य केलं जात नाही. मोक्ष मिळवणे आपल्या हाती आहे का? नक्कीच आहे; मोक्षाचा मार्ग कोणता, हे जाणून घ्या!
होलाष्टकात काय करू नये?
होलाष्टकाच्या ८ दिवसांत कोणतीही शुभकार्य करू नये. यादरम्यान लग्न, भूमि पूजन, गृह प्रवेश किंवा कोणताही नवा व्यवसाय, नव्या कामाची सुरूवात करू नये. शास्त्रानुसार होलाष्टक सुरू झाल्यानंतर १६ संस्कार, जनेऊ संस्कार, गृह प्रवेश, विवाह संस्कार यांसारखे भुभ कार्य रोखली जातात. पहाटेच्या पारी घ्यावे हनुमंताचे नाम, पूर्ण होईल अधुरे काम; दिवसाची सुरुवात करा या १२ नावांनी
होलाष्टकाात काय करायला हवं?
होलाष्टक आठ दिवसांचे पर्व आहे. अष्टमी तिथिपासून सुरूवात होत असल्यामुळे होलाष्टक असं म्हणतात. होळीची पूर्वसुचना होलाष्टकानं प्राप्त होते. होलाष्टक ज्योतिषांच्या दृष्टीनं अशुभ मानलं जातं. पण प्रत्येक पर्वासह वैज्ञानिक पैलूसुद्धा जोडलेले असतात. देवाकडे नेमके कसे मागणे मागावे? समर्थ रामदास स्वामींनी सांगितली योग्य पद्धत; वाचा...