दरवर्षी रंगांची उधळणीचा सण असलेल्या धुलिवंदनाआधी होलिकेचं दहन करण्याची प्रथा आहे. होलिका दहन म्हणजे वाईटावर सत्याच्या विजयाचं प्रतिक मानलं जातं. त्यामुळे होलिका दहनावेळी आपल्या मनातील नकारात्मक विचारांना आहुती दिली जाते. असं मानलं जातं की होलिका दहनाच्या अग्निसमोर हात जोडून नमस्कार करुन मनातील सर्व नकारात्मक भावना दूर केल्यास जीवनातील सर्व नकारात्मकता संपुष्टात येते. यंदा १८ मार्च २०२२ रोजी होळीचा सण साजरा केला जाणार आहे. होलिका दहनाच्या वेळी काही उपाय केल्यास जीवनातील सर्व समस्या संपतात. या उपायांबद्दल जाणून घेऊयात.
सुख समृद्धीसाठी काय करावं?होलिका दहनाच्या वेळी धान्य अर्पण केल्यास कुटुंबात सुख-समृद्धी टिकून राहते. अशा परिस्थितीत तुम्ही मका, उडीद, गहू, मसूर, हरभरा, तांदूळ किंवा जव यापैकी कोणतीही एक वस्तू देऊ शकता.
आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठीजर तुमच्या कुटुंबात आर्थिक संकट असेल तर देशी तुपात भिजवलेले दोन बताशे, दोन लवंग आणि एक सुपारी अर्पण करावी. यामुळे घरातील पैशाचे संकट हळूहळू संपते आणि आर्थिक समस्या दूर होतात.
वैवाहिक जीवनातील अडथळे दूर करण्यासाठीखूप प्रयत्न करूनही लग्न ठरत नसेल हा अडथला दूर करण्यासाठी अख्ख्या सुपारीवर हळद टाकून होलिका दहनाच्या अग्नीत नैवेद्य दाखवावा. यासह भगवान महादेव आणि माता पार्वतीचे ध्यान करा आणि ही समस्या दूर करण्यासाठी त्यांना प्रार्थना करा.
रोगापासून मुक्त होण्यासाठीरोगापासून मुक्ती मिळवण्यासाठी होलिका दहनाच्या रात्री एका पांढऱ्या रंगाच्या कपड्यात 11 गोमती चक्र, नागकेसरच्या 21 जोड्या आणि 11 गोवऱ्या बांधून त्या कपड्यावर चंदनाचं अत्तर लावावं. यानंतर रुग्णाच्या डोक्यावरून सात वेळा काढावं. होळीच्या दुसऱ्या दिवशी ते शिव मंदिरात ठेवावं. हा उपाय अत्यंत गुप्तपणे करावा. याचा खूप फायदा होईल.
दीर्घ आयुष्यासाठीआपल्या उंची एवढा काळ्या धागा घ्यावा. त्याच उंचीच्या आकाराचे समान लांबीच्या समान दोन ते तीन वेळा गुंडाळून तोडून टाका. होलिका दहन करताना हा धागा आगीत टाका. याने तुमच्यावरील सर्व अडचणी दूर होतील आणि तुम्हाला दीर्घायुष्य मिळेल.(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)