- शैलजा शेवडेरामकृष्ण हरी, गात होऊ दंग,मनी मानसी या सदा पांडुरंग।किती या जिवाला आस पंढरीची,जागेपणी स्वप्ने पडती वारीची,अरे विठ्ठला का परीक्षा अशी ही?डोळा धार लागे, काहिली जीवाची।कसे रे यायचे सांग पंढरीला.कसे रे मुकलो, संत संगतीला,काय ते चुकले, काय गुन्हा झाला?अगतिकता ही ग्रासी जीवनाला।मुखी नाम हाती टाळ, क्षेत्र प्रदक्षिणा,श्रवण कीर्तन, विठाईचा पान्हा,नादब्रह्मी दंग, दंग, चंद्रभागा तीर,विटेवरी हासतोहे, पंढरीचा राणा।सांग सांग विठूराया, कधी रे भेटशी,याचि देही याचि डोळा कधी रे दिसशी?भक्तांचा कैवारी, म्हणवून घेशीबंद का मार्ग मग, असा रे करीशी?खरंच ते समचरण परत कधी दिसतील? का बरे पंढरीची इतकी ओढ? तिथे तो सावळा पांडुरंग आहे. सम खूण ज्याचे पाय, उभा व्यापक विटे ठाय, म्हणे नभा परता, अणुचाही गाभा तिथे पांडुरंग अविचल, समचरण साम्यस्थितीत उभे आहेत. किती सुंदर आहे मूर्ती! नजर काढून घ्यावीशी वाटत नाही. सगळे संत महात्मे जाणत होते, परमेश्वराचं निर्गुणत्व! तरीपण पंढरीच्या या विठोबाची का त्यांना ओढ? खरोखर हा अनुभवच असतो. ज्याचा त्यानेच घ्यायचा असतो. गुळाची गोडी दुसऱ्याने सांगून कळते का कधी?तीर्थक्षेत्रे स्थिते विष्णौ शिलाबुद्धिं करोति य:स याति नरकं घोरं पुनरावृत्तिविर्जतं।काळ तर दबा धरून बसला आहे, हे प्रत्येकाला जाणवतंय. विठ्ठला, यावेळी पंढरीची वारी केवळ मनानेच! सतत फक्त नामस्मरण!
परमेश्वराचं निर्गुणत्व! तरीपण पंढरीच्या या विठोबाची का त्यांना ओढ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 2:35 AM