शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
6
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
7
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
8
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
9
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
10
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
11
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
12
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
13
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
14
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
15
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
16
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
17
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
18
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
19
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
20
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा

'प्रयत्नांती परमेश्वर' का म्हटले जाते? हे सांगणारी महाभारतातील कथा 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 7:11 PM

आपण फक्त प्रयत्न करायचे बाकी भार देवावर सोडून द्यायचा; तो सगळं सांभाळून घेतो!   

प्रयत्न करणे आपल्या हातात आहे. परंतु, जिथे प्रयत्न संपतात, तिथे देवावर आणि दैवावर भार टाकण्याशिवाय आपल्याकडे पर्यायच उरत नाही. जो प्रयत्न करतो, त्याला परमेश्वर साथ देतो. म्हणून प्रयत्नांती परमेश्वर म्हटले आहे. कोणत्याही अवघड परिस्थितीत आपण प्रयत्नच केले नाहीत, ही खंत मनात राहता कामा नये. यासाठी आधी प्रयत्न करा, बाकी परमेश्वरावर सोपवा, जसे या छोट्याशा चिऊताईने सोपवले.

महाभारताचा प्रसंग होता. कुरुक्षेत्राची तयारी केली जात होती. कुठे काही खड्डे, खाच खळगे राहिले नाहीत ना, याची पाहणी करण्यासाठी स्वत: भगवान श्रीकृष्ण अर्जुनासह कुरुक्षेत्रावर पोहोचले. तेवढ्यात एक चिमणी उडत उडत श्रीकृष्णाजवळ आली. ती म्हणाली, 'भगवंता, या मनुष्यांच्या भांडणात आम्हा मूक जीवांना शिक्षा का? मी आणि माझी पिले कुणाच्याही अध्यात मध्यात नसताना या समराचे दुष्पपरिणाम आमच्या कुटुंबालाही झेलावे लागत आहेत. तुमच्या हत्तीदळातल्या एका हत्तीने एका ढुशात रणभूमीवरील झाड पाडले आणि झाडावरील माझे घरटे पिलांसकट जमीनिवर आले. माझ्या तान्ह्या बाळांना घेऊन मी कुठे जाऊ? भगवंता आता तुमच्याच आशेवर आम्ही आहोत. असे म्हणत चिमणी निघून गेली. श्रीकृष्णाचे डोळे पाणावले. अर्जुनाने कारण विचारले. श्रीकृष्ण काहीच बोलले नाहीत. दुसऱ्या दिवशीपासून युद्ध सुरू होणार होते.

सगळे रणधुरंधर कुरुक्षेत्रावर पोहोचले. त्यावेळेस श्रीकृष्णाला चिमणीची आठवण झाली. युद्ध सुरू झाले, की ते इवलेसे जीव हकनाक बळी पडतील. या विचाराने कृष्णाने अर्जुनाच्या हातातील धनुष्य आणि बाण घेतले आणि दूर अंतरावर उभ्या असलेल्या हत्तीवर निशाणा धरला. हे पाहून अर्जुनाने कृष्णाला आठवण करून दिली, `भगवंता तुम्ही शस्त्र हाती घेणार नाही, असे वचन घेतले आहे.'

यावर श्रीकृष्णांनी काही न बोलता बाण सोडला. तो बाण हत्तीला न लागता त्याच्या गळ्यातल्या घंटेला लागला आणि गळ्यातली दोरी तुटून घंटा जमीनिवर पडली. काही काळात घमासान युद्ध सुरू झाले. तब्बल अठरा दिवस चालले. अनेकांचे प्राण गेले. कौरव संपले. पांडव जिंकले. 

दुसऱ्या दिवशी श्रीकृष्ण आणि अर्जुन पुन्हा रणभूमीची पाहणी करण्यासाठी निघाले. कुरुक्षेत्रावर रक्त मांसाचा चिखल पडलेला. ते पाहून अर्जुनाचे मन विदीर्ण झाले. एके ठिकाणी कृष्णाने रथ थांबवून अर्जुनाला रथापुढे आलेली घंटा उचलायला सांगितली. अर्जुनाने प्रतिप्रश्न न करता रथातून उतरून जड घंटा उचलली. घंटा उचलताच त्यातून चिमणी आणि तिची पिल्लं भेदरलेल्या अवस्थेत दिसली. एवढ्या मोठ्या गदारोळातही या इवल्याशा जिवांना जीवदान कसे मिळाले, या विचाराने आश्चर्यचकित होत अर्जुनाने कृष्णाकडे पाहिले, तर त्यावेळेस त्या पिलांची आई उडत कृष्णाजवळ आली आणि त्यांचे जीव वाचवल्याबद्दल आभार मानत होती. 'भगवंता, जे कोणीही करू शकले नसते, ते तू करून दाखवलेस. आमच्यासारख्या चिमुकल्या भक्तांची एवढ्या कठीण प्रसंगात काळजी घेतलीस. माझा विश्वास आणि माझी भक्ती राखलीस. जसा माझ्या मदतीला धावून आलास, तसाच प्रत्येक भक्ताच्या हाकेला धावून जा. त्यांचे रक्षण कर आणि त्यांच्या प्रयत्नांना, जगण्याच्या उम्मेदीला बळ दे...!'