शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
3
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
4
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
5
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
6
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
7
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
8
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
9
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
10
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
11
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
12
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
13
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
14
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
15
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
16
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
17
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
18
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
19
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
20
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

कोरोना संकट काळात गरिबांची मदत कशी कराल?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 3:56 PM

कोरोना विषाणू महामारीमुळे भारताच्या सर्वात गरीब वर्गाचा भाग असलेल्या स्थलांतरित मजूर आणि दैनिक वेतन असलेल्या कामगार वर्गाला मोठ्या संकटात टाकणारी परिस्थिति निर्माण होत आहे. आपण समाजाचा एक भाग म्हणून त्यांची मदत करण्यासाठी समोर यायला हवे; त्याचवेळी आपण विषाणूचे वाहक होणार नाही याची काळजी सुद्धा घ्यायला हवी.

सद्‌गुरु: भारतात या विषाणू मुळे निर्माण झालेली एक मोठी चिंता गरीब आणि दैनिक वेतन कामावणार्‍या कामगार वर्गाची आहे. सुदैवाने भारत सरकारने शेतकरी, कामगार आणि मजूर लोकांसाठी तीन महीने आधार देऊ शकेल असं एक विस्तृत पॅकेज बनवलं आहे. याचा अर्थ असा नाही की त्यांच्या सगळ्याच अडचणी मिटतील, पण या लोकांना किमान भुखमरीला तरी सामोरे जावे लागणार नाही. पण तरीही बरेचशे लोक कुठल्याच पॅकेज मध्ये कदाचित बसणार नाहीत आणि त्यांच्यापर्यंत या सेवा पोचणार नाहीत. अश्यावेळी समाजाने पुढाकार घेण्याची गरज आहे.

भारताचे नागरिक म्हणून कोणी भुखमरीला तर सामोरे जात नाहीत ना, याकडे आपण डोळे उघडे ठेऊन लक्ष देऊ या. जर कोणी तशा परिस्थितीचा सामना करताना दिसला तर आपण त्यांना आधार कसा देऊ शकू हे बघायलाच हवं – आपल्या स्वत:च्या हिमतीवर किंवा किमान इतरांच लक्ष त्यांच्याकडे वेधून. आपण स्वत:ला असं वचन देऊ या की भूक हे दू:खाचं आणि मृत्युचं कारण आपण ठरू देणार नाही. ही आपली जिम्मेदारी आहे. बाहेर आधीच खूप सार्‍या समस्या आहेत, आपण आपलं जीवन सुद्धा यातनदायक बनवायला नको.

स्थलांतरित मजुरांची दैना

आतापर्यंत दक्षिण भारतामध्ये विषाणूचा प्रभाव जास्त दिसून आलेला नाही. पण ग्रामीण भागातून मोठ्या शहरात स्थलांतरित झालेले मजूर आपल्या गावी परत जाण्यासाठि उतावीळ झाले आहेत. अश्या प्रकारे स्थलांतरीत झालेल्यांमद्धे पुरुषांचीच संख्या जास्त दिसून येते. बहुतेक वेळी त्यांच्याकडे जमिनीचा एखादा तुकडा असतो; ते शहारामध्ये वर्षातले ६-८ महीने काम करत असतांना त्याच्याकडे त्यांच्या घरच्या बायका लक्ष देतात. पण आता त्यांना माहिती आहे की शहरात काही काम मिळणार नाही, तिथे जीवाचा धोका आहे आणि त्यांच कुटुंब कसं आहे हे देखील त्यांना माहीत नाही. सरकार त्यांच्यासाठी वसतिगृह, जेवण अश्या सुविधा बनवण्याचा प्रयत्न करते आहे पण त्यांना मात्र घरीच जायचंय. शहराकडून त्यांचे लोंढेच्या लोंढे गावाकडे परतंत आहेत. त्यांच्या भावना आपण समजू शकतो पण ते दुर्दैवाने ते विषाणू सुद्धा आपल्या सोबत शहारा कडून ग्रामीण भागाकडे घेऊन जाऊ शकतात. मी आशा करतो की त्यांनी खूप सारी लागण आतापर्यंत गावाकडे नेली नाहीये आणि जास्त नुकसान नं करता ही परिस्थिति टळेल.ईशा फाऊंडेशनचं योगदान

या जास्त लांबलेल्या लॉक-डाऊनमुळे अश्या असाहाय आणि असमर्थ लोकांची संख्या खूप वाढेल. आपले खूप सारे तरुण स्वयंसेवक खेड्यांमद्धे जाऊन तिथे काय करता येणं शक्य आहे ते बघत आहेत. ते योगा सेंटर मधून बाहेर पडत आहेत म्हणजे आता त्यांना हे सगळं संपल्याशिवाय इथं परत येता येणार नाही. आणि परत आल्यानंतर त्यांना १४ ते २८ दिवसांसाठी विलग ठेवण्यात येईल. हा एक प्रकारचा वनवासच आहे.

आपले स्वयंसेवक या भागात जेवण देऊ करत आहेत. आपण इतर सगळ्या गोष्टी पुढे ढकलू शकतो – दोन वेळचं जेवण सोडून. जे काही त्यांचं नेहमीच्या सवयीचं जेवण आहे ते तर आपण त्यांना देऊ शकत नाही पण किमान दोन वेळ पोट भरेल इतपत आपण देत आहोत. यासाठी जागेची जुळवाजुळव, मनुष्यबळ, किराणा सामान आणि भाजीपाला खरेदी इत्यादि गोष्टी युद्धं पातळीवर सुरू आहेत.आणि आपल्या चीन मधल्या स्वयंसेवकांनी मास्क, ग्लव्हज, वैद्यकीय कर्मचार्‍यांसाठी सुरक्षा सूटस अशी वैद्यकीय मदत आपल्याला पाठवली आहे. पण सगळ्यात मोठी समस्या औषध पुरवठा करण्याची होणार आहे जो आपल्याला कदाचित फार मोठ्या प्रमाणावर लागू शकतो.

आपल्यावरचा आर्थिक भार वाढतच जाणार आहे. खूप सार्‍या लोकांनी भरपूर यगदान करून मदतीचा हात दिलाय. यापुढेही आम्हाला सतत मदतीची अपेक्षा आहे कारण ही स्थिति लवकर आटोक्यात येणारी नाहीये.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या