शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

श्रद्धा आणि अढळ विश्वास असेल तर देवही भेटतो; वाचा साधू महाराज आणि शिकाऱ्याची गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 7:00 AM

ध्येयप्राप्ती असो नाहीतर ईश्वरप्राप्ती, त्यासाठी समर्पण भाव कसा असायला हवा हे शिकवणारी गोष्ट!

एक शिकारी शिकारीसाठी जंगलात गेला. त्याला हवी ती शिकार मिळेना. तो कंटाळून जंगलात सावज शोधत फिरत होता. तिथे त्याला एक झोपडी दिसली. तो आत डोकावला तर त्या झोपडीत एक साधू महाराज बसले होते. त्यांच्या समाधीत व्यत्यय आणत शिकारी झोपडीत शिरला. त्याने विचारले, तुम्ही इथे का राहता?

साधू महाराज थोडक्यात उत्तर आटोपण्यासाठी म्हणतात, 'मी सुद्धा शिकारीच आहे. माझ्या सावजाची वाट बघत मी इथे थांबलोय!'शिकारी कुतूहलाने म्हणाला, 'अरे वाह, कोणाची शिकार करणार आहात? मला सांगा मी पण मदत करतो. तशीही माझी शिकार मला मिळत नाहीये, तर निदान तुमची शिकार शोधायला तरी मदत करेन.'

साधू महाराज मनात म्हणतात, 'याच्याकडून सोडवणूक करायला खोटे बोललो तर याने आणखीनच खोटे बोलायला भाग पाडले. शिकारी वर्णन विचारू लागला. त्यावर साधू महाराज म्हणाले, 'माझे सावज सावळ्या रंगाचे आहे. त्याच्या डोक्याला मोरपीस आहे. ते कोणाच्या हाती लागत नाही.'

शिकारी म्हणाला मी शोधून आणतो. तुम्ही शांत चित्ताने झोपडीतच थांबा. त्याच्यापासून सुटका झाली म्हणून साधू महाराज हसत आपल्या झोपडीत जाऊन तपश्चर्येत मग्न झाले. शिकारी सावजाच्या शोधात निघाला. त्याने त्या सावजाचा ध्यासच घेतला. दिवस रात्र जंगल पिंजून काढले. पाण्याचा थेंबसुद्धा ग्रहण केला नाही. खाण्याची भ्रांत राहिली नाही. असे चार दिवस गेले. शिकाऱ्याचा शोध सुरूच होता. शेवटी कृष्णाला दया आली. त्याचा भोळा भाव पाहून कृष्णाने त्याला दर्शन दिले. शिकारी खुश झाला. तो कृष्णाचा हात धरून त्याला साधू महाराजांकडे घेऊन आला. 

साधू महाराज आश्चर्य चकित झाले. त्यांनी कृष्णाला नमस्कार केला व म्हणाले, देवा एवढी वर्षं या जंगलात राहून मी तुझे ध्यान करतोय, पण तू मला न भेटता या शिकाऱ्याला भेटलास, ते कसं काय?'' कृष्ण म्हणाले, 'शिकारी इतर कोणत्याही विषयांचा विचार न करता माझा ध्यास घेत मलाच शोधत होता. तो स्वतःची भूक तहान विसरला होता. ध्येय प्राप्तीसाठी जो कोणी एवढे समर्पण करतो, त्यालाच मी प्राप्त होतो. तुम्ही एवढी वर्षं ध्यान करत असलात तरी इतर विषयांमुळे तुमचे मन विचलित होते. याउलट या शिकाऱ्याने पूर्ण समर्पित भाव ठेवून मला प्राप्त करून घेतले.'

म्हणूनच म्हणतात प्रयत्नांती परमेश्वर; प्रयत्नांच्या आधी नाही! त्यामुळे तुमचाही भाव सच्चा असेल, प्रयत्न प्रामाणिक असतील आणि भगवंताच्या भेटीची ओढ असेल तर तो परमेश्वर तुम्हालाही नक्कीच भेटेल. 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी