शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, उगाच नाक खुपसू नये”; संजय राऊतांची टीका
4
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
5
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
6
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
7
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
8
Maharashtra Election 2024 Live Updates: निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रकाश आंबेडकर यांच्या बॅगची तपासणी
9
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
10
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
11
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
12
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
13
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
14
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
15
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
16
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
17
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
18
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
19
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
20
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा

लक्ष्मी मातेच्या परीक्षेत उत्तीर्ण झालात, तर ती तुमचे गतवैभव मिळवून देते; वाचा ही गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 7:00 AM

लक्ष्मीप्राप्तीसाठी तुमचीही धडपड सुरू आहे? मग ही गोष्ट वाचाच!

एके दिवशी वैकुंठात नारायण लक्ष्मी बोलत बसले असता लक्ष्मीने प्रश्न केला, `देवा, पृथ्वीवर तुमच्या भक्तांची संख्या जास्त, की माझ्या भक्तांची? मला तरी वाटते, की माझेच भक्त जास्त असतील' यावर नारायण म्हणाले, `तू म्हणतेस तुझ्या भक्तांची संख्या जास्त, मी म्हणेन माझ्या भक्तांची संख्या जास्त. त्यापेक्षा आपण दोघेही पृथ्वीवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून येऊ.'लक्ष्मी म्हणाली, `देवा, तुम्ही पुढे व्हा आणि शास्त्री बुवांचे सोंग घेऊन एका खेड्यात प्रवेश करा. मी सुद्धा पाठोपाठ तुमची जोडीदार म्हणून वेषांतर करून येते.' दोघांनी वेषांतर केले. पृथ्वीवर आले. नारायणांनी धोतर नेसलेले असून, अंगावर उपरणे पांघरले होते. कपाळाला गंध लावले असून काखेत भागवताची पोथी घेतली होती. शास्त्रीबुवांनी एका खेडेगावात प्रवेश केला. त्यांनी एका श्रीमंताच्या दारात जाऊन घरमालकाला सांगितले, `मी शास्त्री आहे. मला चातुर्मासाात पुराण सांगण्याची इच्छा आहे. तेव्हा गावात जागेची कुठे सोय होईल?' श्रीमंताने उत्तर न देता, शास्त्रीबुवांना पिटाळून लावले. 

शास्त्रीबुवा प्रत्येक घराचे निरीक्षण करीत चालले होते. अर्धा दिवस फिरण्यात गेला. परंतु कोणीही त्यांची आपुलकीने चौकशी केली नाही. त्यावर त्यांनी वैकुंठात परण्याचा विचार केला. तेवढ्यात बुवांना एक गृहस्थ दिसला. त्याची बायको, मुले घराचे छत कोसळून ठार झाली होती. दुकानाचेही दिवाळे निघाल्यामुळे तो दु:खी, कष्टी झाला होता. मन:शांतीच्या शोधात फिरत असताना, त्याला शास्रीबुवा नजरेस पडले. तो सगळे दु:ख विसरून बुवांना म्हणाला, `तुम्ही कोण, कुठले?' सगळी विचारपूस करून, गावभर दवंडी पिटवून त्याने गावातल्या नारायण मंदिरात बुवांची सोय लावून दिली. पुराण सुरू झाले. गावकरी येऊ लागले. देवळातली जागा अपुरी पडू लागली.

आता लक्ष्मी परीक्षा घेण्यासाठी वेषांतर करून गावात प्रगट झाली. तिने सगळी घरे धुंडाळली, परंतु सगळ्या दारांना कुलूप होते. मंडळी पुराण ऐकण्यासाठी गेली होती. लक्ष्मीला तहान लागली होती. ती नाईलाजाने देवळाकडे वळली. तेवढ्यात एका झोपडीत दिवा दिसला. तिथली एक आजी, गुडघेदुखीमुळे देवळात जाऊ शकली नाही. लक्ष्मीने आजीकडे पाणी मागितले. आजीने विचारपूस केली आणि पाण्याबरोबर दहीपोहेदेखील खायला दिले. लक्ष्मी पाहुणचार घेऊन निघून गेली. थोड्यावेळाने आजीची सून घरी आली. पाहते तर काय, पाण्याचा पेला सोन्याचा झाला होता.  आजीने घडलेली हकीकत सांगितली.

दुसऱ्या दिवशी लक्ष्मी पुन्हा येईल, या विचाराने सुनबाई पुराण ऐकायला न जाता, घरीच थांबली. म्हणता म्हणता गावभर ही वार्ता पसरली. लक्ष्मीची वाट बघत गावकरी देखील दाराकडे डोळे लावून बसले. लोकांचा स्वार्थ भाव पाहून लक्ष्मी खिन्न मनाने देवळाकडे वळली. तिथे शास्त्रीबुवांच्या रूपाने नारायण आणि त्यांची सोय लावून देणारा गृहस्थ एकटाच श्रोता म्हणून बसला होता. त्याला पाहता, लक्ष्मी आणि नारायण यांनी मनोमन स्पर्धेचा निकाल लावला. त्या गृहस्थाची निष्काम सेवा पाहून नारायणाने त्या आशीर्वाद आणि लक्ष्मीने त्याचे गतवैभव प्राप्त करून दिले. 

तात्पर्य हेच, की जग लक्ष्मीच्या प्राप्तीसाठी धडपडते. परंतु, लक्ष्मीचे नारायणावर निस्सिम प्रेम असल्यामुळे ती नारायणाला प्राप्त केल्याशिवाय प्राप्त होणार नाही. म्हणून श्री तिथे सौ...!