शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
2
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
4
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
5
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
6
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
7
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
8
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
9
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
10
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
11
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
12
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
13
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
14
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
15
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
16
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
17
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
18
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
19
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
20
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण

दिवसाची प्रसन्न सुरुवात करायची असेल, तर 'असे' प्रात:स्मरण करावे!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: February 03, 2021 9:00 AM

प्रात:काली अंथरुणावरून उठल्यानंतर आपल्या इष्ट देवतांचे श्लोक व मंत्ररुपाने स्मरण करावे. या उपचाराला प्रात:स्मरण म्हणतात.

आपली सकाळ कशी होते, यावर आपला संपूर्ण दिवस अवलंबून असतो. सकाळ प्रसन्न तर दिवसही मजेत जातो. म्हणून सद्विचारांचे बीज सुपीक डोक्यात पेरून दिवसभर मनाची उत्तररित्या मशागत करावी. यासाठी आपल्या संस्कृतीने उत्तम संस्कार घातला आहे. तो कोणता, हे सविस्तर जाणून घेऊया. 

प्रात:काली अंथरुणावरून उठल्यानंतर आपल्या इष्ट देवतांचे श्लोक व मंत्ररुपाने स्मरण करावे. या उपचाराला प्रात:स्मरण म्हणतात. याविषयी एका श्लोकात वर्णन केले आहे,

ब्राह्मे मुहुर्ते चोथात्म चिन्तयेदात्मनो हितम् स्मरणं वासुदेवस्य कुर्यात् कलिमलावहम्

ब्राह्म मुहूर्ती उठून आत्मकल्याणाचे चिंतन करावे. त्याचप्रमाणे कलीदोष दूर करणारे वासुदेवाचे स्मरण करावे. प्रात:स्मरण करण्याचे काही विधीसंकेत आहेत. आपण काही ब्राह्म मुहूर्तावर उठणाऱ्यातले नाही. निदान, जेव्हा उठू, तेव्हा ईश स्मरणाने सुरुवात नक्कीच करता येईल. 

आदित्य गणनाथं च देवी रूद्रं यथाक्रममनारायणं विशुद्धाख्यमनोच कुलदेवताम

सूर्य, गणपती, देवी व विशुद्ध कीर्तीचा नारायण यांचे यथाक्रम स्मरण करून शेवटी आपल्या कुलदेवतेचे स्मरण करावे. ऋग्वेदीय ब्रह्मकर्मात सूर्यस्मरणाचे, गणपतीस्मरणाचे, देवी स्मरणाचे, शिवाच्या स्मरणाचे व भगवान विष्णूच्या स्मरणाचे श्लोक दिले आहेत.

नवग्रह, भृग्वादी ऋषी, सनत्कुमारादी देवर्षी, सप्तलोक, सप्तसमुद्र, सप्तर्षी, सप्तकुलपर्वत, पृथू, अश्वत्थामा, बळी, व्यास, हनुमान, बिभीषण, कृष्ण, परशुराम हे सप्तचिरंजीव, अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी या पतिव्रता, पाच पांडव, नल, युधिष्ठिर इ. पुण्यश्लोक राजे, अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका, द्वारावती ही मोक्षदायी तीर्थक्षेत्रे यांचे पुण्यस्मरण करावे. चारित्र्य, कर्तृत्व, श्रेष्ठत्व असलेल्या पुण्यशील विभूतींचे, श्रद्धा स्थानांचे पुण्यस्मरण, नामसंकीर्तन करावे. ज्यांच्या स्मरणाने मन:शांती प्राप्त होते. आपल्या जीवनातील अंध:कार जाऊन जीवन प्रकाशमय होईल अशा चैतन्यशील प्रेरणादायी श्रेष्ठतम गुणवर्धक रुपांचे चिंतन, स्मरण करावे. हा हिंदूंचा मूलाधार आहे. जीवन सुखसमृद्ध करणाऱ्या सृष्टीतल्या सर्व गोष्टी व भूतमात्रांबद्दलची कृतज्ञता हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे.

यथोचित प्रात:स्मरण झाल्यावर ज्या भूमीवर आपले सर्व जीवन व्यवहार चालतात, जिच्या आधअरावर आपले सर्वस्व उभारले, तारले जाते, अशा भूमीमातेला कृतज्ञतापूर्वक नमस्कार करून श्लोक म्हणावा. 

समुद्रवसने देवि पर्वतस्तनमंडले,विष्णुपत्नि नमस्तुभ्यं पादस्पर्श क्षमस्व मे।

समुद्राचे वस्त्र परिधान करणाऱ्या व पर्वतरूपी उरोजांनी शोभणाऱ्या हे विष्णूपत्नी भूमाते, तुला नमस्कार आहे. माझ्या पायाचा तुला स्पर्श होतो त्याबद्दल मला क्षमा कर. प्रात:स्मरण हे हिंदू जीवन संस्काराचा श्रीगणेशा आहे. अशा संस्कारांमुळे आपली संस्कृती टिकली. वर्धिष्णु झाली. यातच आपल्या परंपरेची चिरंतन थोरवी आहे. अंत:करणात आपली श्रद्धास्थाने व समाजाविषयी स्वधर्म, स्वसंस्कृती, आदर, निष्ठा व आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी प्रात:काली पवित्रसमयी मनावर व कुटुंबावर सुसंस्काराचे शिंपण घालण्यासाठी प्रात:स्मरणाच्या या अलौकिक परंपरेचे जतन घराघरात झाले पाहिजे.