अलीकडे नैराश्य या शब्दाशी आपली वरचेवर गाठभेट होते. परंतु जो कामात मग्न असतो, त्याच्या आसपासही हा शब्द फिरकत नाही. ज्यांच्याकडे काम भरपूर असते पण करायची तयारी नसते, उत्साह नसतो अशा लोकांच्या मानगुटीवर नैराश्याचं भूत जाऊन बसतं. ते प्रयत्नपूर्वक हाकलून लावायचे असेल तर केवळ मोटिव्हेशनल व्हिडीओ बघून भागायचे नाही, तर स्वयंप्रेरणा जागृत ठेवण्यासाठी स्वतःला हटकणेही गरजेचे आहे.
झाड अचल असते, आपण नाही. आपण आपल्या प्रगतीसाठी हात पाय मारू शकतो. दुसरे कोणी आपल्या मदतीला येईल याची वाट बघत बसाल तर आयुष्याची राख रांगोळी होईल आणि पश्चात्तापाशिवाय पदरात काहीच पडणार नाही. म्हणून स्वतःला सतत जागे करत राहा. त्यासाठी गीतकार तनवीर ग़ाज़ी यांच्या पुढील कवितेचाही आपल्याला आधार घेता येईल. ही कविता तोंडपाठ करून टाका आणि जेव्हा जेव्हा मरगळ येईल, तेव्हा ही कविता गुणगुणायला सुरुवात करा आणि आळस झटकून कामाला लागा.
तू खुद की खोज में निकलतू किस लिए हताश है,तू चल तेरे वजूद कीसमय को भी तलाश है
जो तुझ से लिपटी बेड़ियाँसमझ न इनको वस्त्र तू ये बेड़ियां पिघला केबना ले इनको शस्त्र तू
चरित्र जब पवित्र हैतो क्यों है ये दशा तेरीये पापियों को हक़ नहींकि ले परीक्षा तेरी
जला के भस्म कर उसेजो क्रूरता का जाल हैतू आरती की लौ नहींतू क्रोध की मशाल है
चूनर उड़ा के ध्वज बनागगन भी कंपकंपाएगा अगर तेरी चूनर गिरीतो एक भूकंप आएगा
तू खुद की खोज में निकलतू किस लिए हताश है,तू चल तेरे वजूद कीसमय को भी तलाश है