एखाद्या व्यक्तीच्या नावाचा त्याच्या आयुष्यावर थेट परिणाम होतो. विशेषत: नावाचे पहिले अक्षर एखाद्या व्यक्तीच्या स्वभावाबद्दल बरेच काही सांगू शकते. नावाचे पहिले अक्षर स्वभाव, नशीब आणि भविष्य वर्तवते. ज्योतिष तज्ज्ञांचे म्हणणे आहे की ज्याप्रमाणे मूलांक आणि भाग्यांक यांचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर होतो, तसाच व्यक्तीच्या नावाचाही होतो. इथे आपण काही मोजक्या अद्याक्षरांचे गुणविशेष जाणून घेणार आहोत. तुमच्या नावाचे आद्याक्षर आणि त्यानुसार दिलेला गुण तुमच्या व्यक्तिमत्त्वाशी जुळतोय का ते ताडून पहा.
A- जर तुमचे नाव A अक्षराने सुरू होत असेल तर याचा अर्थ तुम्ही खूप दृढनिश्चयी आणि धैर्यवान व्यक्ती आहात. हे अद्याक्षर खूप प्रभावशाली मानले जाते. मराठी व इंग्रजी बाराखडीत या अद्याक्षराची सर्वप्रथम वर्णी लागते. A नावाचे लोक आत्मविश्वासाने परिपूर्ण असतात. या लोकांना स्वतःच्या अटींवर आयुष्य जगायला आवडते. या लोकांना स्पष्ट बोलणे आवडते. नोकरी व्यवसायात प्रामाणिकता आणि नात्यांमध्ये प्रेम ते पदोपदी जपतात.
D- ज्यांचे नाव D अक्षराने सुरू होते ते लोक मेहनती असतात. या लोकांना स्वच्छता खूप आवडते आणि त्यांना सगळ्या गोष्टी नीट सांभाळून ठेवायला आवडतात. ते त्यांच्या ध्येयांबद्दल गोंधळलेले नसतात आणि यामुळे ते त्यांच्या आयुष्यात यशस्वी होतात.
G - या अक्षराचे लोक प्रामाणिक असतात. त्यांच्या स्वभावामुळे त्यांना समाजात मान-सन्मान मिळतो. या लोकांना स्पष्ट बोलणे आवडते आणि आडवळणाने बोलणारी माणसं त्यांना आवडत नाहीत. त्यांच्या सच्चा स्वभावामुळे त्यांना समस्यांनाही सामोरे जावे लागते.
K- ज्यांचे नाव K अक्षराने सुरू होते ते लोक खूप भाग्यवान असतात. त्यांचा स्वभाव अतिशय आनंदी असतो. त्यांना जीवनातील सर्व सुख प्राप्त होते. हे लोक इतरांना मदत करण्यावर खूप विश्वास ठेवतात. ते खुल्या मनाचे असतात आणि आयुष्यात भरपूर पैसे कमावतात.
M- ज्यांचे नाव M अक्षराने सुरू होते ते लोक खूप आकर्षक असतात. हे लोक स्वतःमध्ये रमतात, आनंदी असतात. हे लोक आपल्या कुटुंबावर खूप प्रेम करतात आणि बाहेरील लोकांशीही चांगले संबंध ठेवतात. हे लोक कमी काम करूनच मोठे यश मिळवतात. हे लोक आपल्या कामाबद्दल खूप प्रामाणिक असतात. त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होते.
P- या अक्षराचे लोक खूप हुशार मानले जातात. ते कोणतेही काम अतिशय हुशारीने करतात. त्यांना प्रत्येक गोष्टीत जिंकायला आवडते. जिंकण्याची उर्मीच त्यांना जीवनात यश मिळवून देते. हे लोक सहसा खूप भाग्यवान असतात, त्यांना जे हवे ते सहज मिळते.
S- ज्यांचे नाव S ने सुरू होते ते लोक खूप मेहनती असतात. त्यांच्याकडे विश्वासाने सांगितलेली कोणतीही गोष्ट कायम गोपनीय राहते म्हणून विश्वासू अशी त्यांची प्रतिमा तयार होते. हे लोक प्रेमाच्या बाबतीत विचार करूनच पुढे जातात. हे लोक अंतर्मुख असतात.
T - T अक्षर असलेले लोक हट्टी असतात. हे लोक खूप नाजूक मनाचे असतात आणि त्यांच्या कुटुंबावर आणि जोडीदारावर खूप प्रेम करतात. त्यांच्या जोडीदारांनी त्यांच्यावर सर्वात जास्त प्रेम करावे अशी त्यांची इच्छा असते. कोणतेही काम ते अतिशय मन लावून करतात. त्यांच्यात बुद्धिमत्ता भरपूर असते. या लोकांकडे बाकीचे लोक लवकर आकर्षित होतात.
V-V अक्षर असलेले लोक आनंदी, भाग्यवान आणि मेहनती असतात. ते त्यांच्या गोष्टी सगळ्यांसोबत शेअर करत नाहीत आणि सगळ्यांना मित्रही बनवत नाहीत. मोजक्याच लोकांशी मैत्री करतात तरी त्यांचे कोणावाचून अडत नाही. त्यांची कामे पूर्ण होतात. या लोकांना कधीही पैशाची कमतरता नसते.