शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"आपण *** मारायची आणि दुसऱ्याचं..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
4
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
5
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
6
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
7
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
8
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
9
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
10
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
11
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
12
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
13
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
14
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
15
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
16
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
17
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
18
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
19
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
20
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला

आपण झोपतो ती केवळ शय्या नाही तर मृत्यूशय्या आहे असे समजा; वाचा दाहक सत्य! - सद्गुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 1:39 PM

झोपेतून जागे होणे हे पुनर्जन्माहुन कमी नाही. झोपेचे आणि त्या अनुषंगाने आरोग्याचे महत्त्व अधोरेखित करत आहेत सद्गुरु!

ताण- तणाव, काळजी, चिंता, नैराश्य इ. अनेक कारणांमुळे आपण शांत झोप गमावून बसलो आहोत. परंतु लक्षात घ्या, झोपेपेक्षा आयुष्यात महत्त्वाचे काहीही नाही. कारण झोपेतून जागे होणे हे पुनर्जन्माहुन कमी नाही. सांगत आहेत सद्गुरू!

जगभरात जवळपास अडीच लाख लोक आदल्या रात्री झोपतात परंतु दुसऱ्या दिवशीही सकाळ बघू शकत नाहीत. कारण झोपेतच त्यांचा नैसर्गिक रित्या मृत्यू होतो. त्या अडीच लाखांमध्ये आपला क्रमांक लागला नाही, याहून मोठा आनंद दुसरा कोणत्या गोष्टीचा असू शकतो का? ही गोष्ट एखाद्या उत्सवातून कमी नाही. हा उत्सव कसा साजरा करायचा? तर सकाळी उठल्यावर छोटेसे स्मित करून! मात्र मुख्य समस्या हीच आहे, की आजच्या तणावयुक्त जगात आपण हसणे विसरलो. विषय, विचार, विकार आपल्यावर एवढे हावी झाले आहेत की आपण रात्री शांत झोपूही शकत नाही. 

आपला शेवट कसा घडणार आहे माहीत नाही, फक्त मागच्या २४ तासांचा विचार करा. आपण शय्येवर नाही तर मृत्यू शय्येवर बसलेलो आहोत असे समजा आणि स्वतःशी प्रामाणिक राहा. जर तुम्ही दिवसभरात कोणाशी खोटेपणाने वागला नसाल, कोणाला दुखावले नसेल, कोणाला फसवले नसेल, तर तुम्हाला पुढच्या दिवसाची भ्रांत करायची गरज नाही. तुमचे कर्म चांगले असेल तर फळ चांगलेच मिळेल याची खात्री बाळगा. आणि शांत झोप लागण्यासाठी पुढील उपाय करा. 

>>लहान मुलांसारखे फक्त झोपायचे आहे असे ठरवून त्या स्थितीचा आनंद घ्या. तुमचे मनच नाही तर शरीर आणि मुख्यतः डोकं हलके झाल्यासारखे वाटू लागेल. 

>>संध्याकाळी हलका आहार घ्या. मांसाहार किंवा जड पदार्थ खाणार असाल, तर झोपण्याच्या चार तास आधी खा. 

>>झोपण्याआधी कोमट पाण्याने स्नान करा. अंघोळीमुळे केवळ अंगावरचा मळ जातो असे नाही, तर त्यामुळे मनःशुद्धी सुद्धा होते.

>>ज्या खोलीत झोपता त्या खोलीत एखाद्या कोपऱ्यात तेलाचा दिवा लावा. छोटीशी वाटणारी ही गोष्ट खूप प्रभावी ठरेल, करून बघा. 

>>उत्तर दिशेला डोकं करून झोपू नका. कारण उत्तर दिशेला डोकं करून झोपल्याने मेंदूकडे रक्तस्त्राव होऊन अस्वस्थता वाढते. तुम्ही बर्फ़ाळ प्रदेशात राहात असाल तर दक्षिण दिशेला डोकं करून झोपू नका आणि उष्म प्रदेशात राहात असाल तर उत्तर दिशेला डोकं करून झोपू नका. हा साधा नियम लक्षात ठेवा. 

>>अलार्मच्या झटक्याने झोपेतून जागे होणे चांगले नाही. प्रत्येकाला आपल्या झोपेची गरज माहीत असते. त्यानुसार झोपेची वेळ पूर्ण करण्यासाठी लवकर झोपा आणि नैसर्गिक रित्या जाग येऊ द्या. 

>>विश्रांतीच्या अवस्थेतून तुम्ही  तेव्हा सक्रिय होण्यासाठी डाव्या कुशीवर वळून उठा. दोन्ही हात चोळून डोळ्यावर ठेवा. तुमची मज्जासंस्था जागृत होते. शरीर हलवण्याआधी मेंदू सक्रिय करणे गरजेचे असते. 

लक्षात ठेवा, दिवसापेक्षा रात्रीच्या झोपेत तुमचा व्यक्तिमत्त्व विकास वेगाने होतो. त्यामुळेच सकारात्मकता वाढते आणि आयुष्य आनंदी होते. त्यामुळे साधी झोप नाही तर शांत झोप महत्त्वाची असते हे कायम लक्षात ठेवा!

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सMental Health Tipsमानसिक आरोग्य