शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

नक्कल करून अक्कल येत नाही; वाचा जादुई चष्म्याची गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2021 2:38 PM

ज्याच्याकडे ज्ञानाची दृष्टी नाही, तो जगाचे कल्याण करण्याची जादू कशी करणार?

एका गावात एक अडाणी शेतकरी होता. जमिनीच्या वादावरून त्याची कोर्टात केस चालू होती. आपल्या कागदपत्रांची फाईल घेऊन तो शहरात एका वकिलाकडे आला.

वकिलाने टेबलावरचा चष्मा उचलून डोळ्याला लावला आणि फायलींची पानं तो उलटू लागला. उलट सुलट कागद पाहिल्यानंतर तो म्हणाला, `तुमच्या केसमध्ये काही दम नाही, तरीही हा खटला तुम्ही नक्कीच जिंकाल'

शेतकऱ्याने विचार केला, की काय आश्चर्य आहे! वकिलाने चष्मा लावताच आपण केस जिंकणार असे सांगितले. नक्कीच त्या चष्म्यामध्ये काहीतरी जादू असणार! असा विचार करून त्याने वकिलाला विचारले, `साहेब, आपण हा चष्मा कोठून खरेदी केला?' वकिलाने त्याल दुकानदाराचे नाव सांगितले. शेतकरी त्या दुकानात गेला. त्याने अगदी तसाच चष्मा दुकानदाराकडून खरेदी केला. नंतर आपल्या गावी गेल्यावर त्याने घोषणा केली, की ज्याचा कोणाचा कोर्टात खटला चालू असेल, तो खटला ते जिंकणार की नाही, हे सांगण्यासाठी कोणालाही वकिलाकडे जाण्याची गरज लागणार नाही. मी तुम्हाला सांगेन की कोण जिंकणार आणि कोण हरणार!

सगळ्यांनीच नाही, पण काही लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. ते आपापल्या खटल्याच्या फाईली घेऊन त्याच्याकडे गेले. शेतकऱ्याने टेबलावर चष्मा ठेवला होता. तो उचलून त्याने डोळ्याला लावला. चष्मा लावून त्याने फाईल २-३ वेळा उलट-सुलट चाळून पाहिल्या. पण त्याला काही दिसले नाही. लिहिलेली अक्षरं मात्र मोठी दिसत होती. त्याला अक्षर ओळखही नव्हती. त्यामुळे त्याला काही कळेना. त्याला वाटले चष्मा पुढे काय घडणार याचे आगाऊ भविष्य सांगत असेल. पण तसे काहीही घडले नाही.

चष्मा तर तसाच आहे, मग चमत्कार का घडत नाही? त्याने शंभर वेळा फाईल चाळून पाहिली. पण...व्यर्थ! गावातल्या एका समजूतदार माणसाने त्याची अवस्था पाहिली आणि त्याला समजावले, `भाऊ, हा चष्मा फक्त अक्षर मोठे करून दाखवतो. तुम्हाला तर अक्षरओळखही नाही. मग या चष्म्याचा तुम्हाला काय उपयोग? केवळ वकिलासारखा चष्मा लावल्याने कोणी कायदेपंडित होत नाही. त्यासाठी कायद्याचे ज्ञान असावे लागते. शिवाय तुम्हाला फाईलीतलेही काही कळणार नाही. समजले?'शेतकऱ्याला आपल्या मूर्खपणाची खात्री पटली. त्याने आपली चूक मान्य करून सर्वांची माफी मागितली. 

भक्तीच्या बाबतीतही तीच गोष्ट आहे. बाह्य वेशभूषा पाहून आपण एखाद्याला `संत' `महात्मा' समजतो. परंतु त्याला जर ईश्वराचे ज्ञानच नसेल, तर त्याची अवस्था ही अशिक्षित शेतऱ्यासारखी होते. म्हणून महत्त्व बाह्य रूपाला नसून ज्ञानाला आहे. ज्याच्याकडे ज्ञानाची दृष्टी नाही, तो जगाचे कल्याण करण्याची जादू कशी करणार?