शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर साळवींना उमेदवारी नाकारल्याने शिवडीत ठाकरे गटात नाराजी, राजीनामा देण्याची तयारी
2
महायुतीचा २७८ जागांचा फॉर्मुला ठरला; देवेंद्र फडणवीसांनी काढला मविआला चिमटा
3
काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 
4
जस्टीस संजीव खन्ना होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश; 11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार...
5
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
7
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
8
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
9
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
10
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
11
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
12
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला
13
इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार
14
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
15
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
16
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
17
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
18
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
19
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
20
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग

कीर्तन चांग, कीर्तन चांग

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 2:00 AM

नारद व नामदेव हे कीर्तन परंपरेचे आद्य प्रवर्तक समजले जातात. वीणा या वाद्याला यात अनन्यसाधारण महत्त्व आहे.

- प्रा.डॉ. प्रकाश खांडगे, मुंबई विद्यापीठाच्या शाहीर अमरशेख अध्यासनाचे समन्वयकनारद व नामदेव हे कीर्तन परंपरेचे आद्य प्रवर्तक समजले जातात. वीणा या वाद्याला यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. उदा. संत तुकाराम महाराजांची वीणा निळोबारायांकडे व त्यांच्याकडून वास्कर महाराजांकडे आल्याचे उल्लेख संप्रदायाच्या इतिहासात आहेत. वारकरी कीर्तन, हरिदासी कीर्तन, समर्थ संप्रदायाचे कीर्तन, गाडगे महाराज संप्रदायाचे कीर्तन असे वर्गीकरण करता येते.कीर्तन संस्था ही महाराष्ट्रातील अतिशय प्राचीन अशी सांस्कृतिक संस्था असून, नवविधा भक्तीमध्ये कीर्तनाचा उल्लेख दुसरी भक्ती म्हणून केला जातो. भगवद्गीतेमध्ये कीर्तन महिमा सांगितलेला आहे. तो असा-सततं कीर्तयन्तो मां यतत्नश्च दृढव्रता:। नमस्यन्तश्च मां भक्तया नित्ययुक्ता उपासते।।तरी कीर्तनाचेनि नटनाचे। नाशिले व्यवसाय प्रायश्चित्तांचे।जे नामचि नाही पापाचें। ऐसे केले।।असा कीर्तनाचा महिमा ‘ज्ञानेश्वरी’च्या नवव्या अध्यायात ज्ञानेश्वरांनी सांगितलेला आहे. विष्णुपुराण, स्कंदपुराण, आदित्यपुराण, आदी पुराणांमध्ये संकीर्तनाचे उल्लेख आहेत.भागवत संप्रदायी संतांनी कीर्तनाचा महिमा अनेकवार विशद केला आहे. ‘कीर्तन चांग, कीर्तन चांग, होय अंग हरिरूप’ असे संतांनी म्हटले आहे. ‘नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी।’ असे संत नामदेवांनी म्हटले आहे.कीर्तन करणे ही एक उपासनाच आहे. भगवंताची भक्ती करून त्याच्या चरित्राचे गायन करणे हे जरी कीर्तनाचे मुख्य अंग असले, तरी जगाला सन्मार्गाला लावणे, त्याला यथायोग्य उपदेश करून हे प्रवर्तित झालेले अनादिधर्मचक्र यापुढे तसेच चालले पाहिजे, अशी व्यवस्था करणे, हाही कीर्तनाचा एक प्रधान हेतू आहे. तो हेतू साधण्याकरिता म्हणून कीर्तनात देवाच्या व भक्ताच्या निरनिराळ्या कथांचा आदर्श पुढे ठेवण्याची रीत पडली आहे.कीर्तनाचे संप्रदायसापेक्ष वर्गीकरण करता येते. वारकरी कीर्तन हे भागवत संप्रदायाचे कीर्तन म्हणून ओळखले जाते, तर हरिदासी कीर्तन अर्थात नारदीय कीर्तनावर दत्त संप्रदायाचा मोठा प्रभाव आहे. राम आणि हनुमान ही समर्थ संप्रदायाची दैवते आहेत. समर्थ संप्रदायाची कीर्तनपद्धती ही नारदीय अर्थात हरिदासी कीर्तन पद्धतीसारखीच असते. समर्थ संप्रदायांच्या कीर्तनात राष्ट्रीय आणि सामाजिक विषयांवर निरूपण केले जाते.गाडगे महाराज संप्रदायाचे कीर्तन हे समाजप्रबोधनपर असून, भक्तीचा सोपा मार्ग, सोप्या भाषेतून या कीर्तनाद्वारे सांगितला जातो. कीर्तनाच्या प्रकारांमधून महाराष्ट्रात आजही आध्यात्मिक उद्बोधन आणि समाजप्रबोधन घडविले जाते आहे. नशाबंदी, साक्षरता प्रसार, हुंडाबंदी, अंधश्रद्धा निर्मूलन, जातीयता निर्मूलन, ग्रामस्वच्छता, स्त्रीभ्रूणहत्या, जलसंवर्धन, आदी सामाजिक प्रश्नांसंबंधीचे उद्बोधन कीर्तनातून घडते. ‘कीर्तनाची गोडी देव निवडी आपण’ असा कीर्तनाचा महिमा आहे.